Dharashiv : धाराशिव(उस्मानाबाद) जिल्हा

Dharashiv धाराशिव(उस्मानाबाद) हा जिल्हा छ, संभाजीनगर प्रशासकीय विभागात येतो. Dharashiv धाराशिव गोदावरी आणि कृष्णा या दोन नदी खोऱ्यांची शिवसीमा म्हणून धाराशिव हे नाव पडले.

मुख्यालय – धाराशिव

महानगरपालिका – नाही

क्षेत्रफळ – 7569 चौकीमी

स्थान व विस्तार – उस्मानाबादच्या पूर्वेस लातूर, आग्नेय व दक्षिणेस कर्नाटक राज्य, नैऋत्येस व पश्चिमेस सोलापूर, वायव्येस अहमदनगर जिल्हा, उत्तरेस बीड जिल्हा.

तालुके(8)-  उस्मानाबाद, उमरगा, कळंब, तुळजापूर, परांडा, भूम, लोहारा, वाशी.

नद्या – तेरणा मुख्य व सर्वात लांब नदी आहे. तेरणा नदीचा उगम तेरखेड (ता.कळंब) येथे होतो. भोगावती, बोरी, बाणगंगा.

नदीकाठावरील ठिकाण – उस्मानाबाद(भोगावती), भूम (बानगंगा).

धरणे

  • रामगंगा, बानगंगा (ता.भूम)
  • खेडेश्वर, चांदणी, खासापुर (ता.परांडा)
  • रायगव्हाण धरण (ता.कळंब)
  • कुरनूर, खंडाळा, हरणी धरण (ता.तुळजापूर)
  • जळापूर (ता.उमरगा)

अभयारण्य – नवीन माळढोक अभयारण्य, येडशी-रामलिंग घाट.

तलाव – बानगंगा, भारती, भरोबा, हरणी, बोरी.

डोंगररांगा – बालाघाट, नळदुर्ग डोंगर.

लेणी – धाराशिव, तुळजापूर, तेर.

वने – वनामध्ये बांभूळ, बोर, लिंब, चिंच, हिवर इत्यादी वृक्ष आढळतात. तुळजाई-येडाई वनीकरण योजना राबवली जाते.

मृदा – जिल्ह्यात काळी मृदा आढळते.

पिके – जिल्ह्यात खरीप ज्वारी, रब्बी ज्वारी (शाळू),  तांदूळ, सोयाबीन, ऊस, तूर, गहू, हरभरा, मुग, उडीद मका, कापूस इत्यादी पिके घेतात. येथे रब्बी ज्वारीला “शाळू” असे म्हणतात.

Read more……

Maharashtratil Jilhe : महाराष्ट्रातील जिल्हे – MPSC INFO

  • तुळजापूर येथे महाराष्ट्राचे आराध्य दैवत माता तुळजाभवानीचे मंदिर आहे.
  • उस्मानाबाद भोगावती नदीकाठी आहे.
  • उस्मानाबाद हे मराठवाड्याचे प्रवेशद्वार आहे.
  • धाराशिव येथे हजरत ख्वाजा शमसुद्दीन दर्गा आहे.
  • धाराशिव (उस्मानाबाद) येथे हातलादेवी मंदिर आहे.
  • तेर हे (ता.उस्मानाबाद) संत गोरोबाकाकांचे जन्मगाव आहे व येथे त्यांची समाधी आहे.
  • परांडा येथे माणकेश्वर मंदिर आहे.
  • नळदुर्ग (ता.तुळजापूर) येथे भुईकोट किल्ला आहे. या किल्ल्यात बोरी नदीवर नर-मादी धबधबा व पाणी महाल प्रसिद्ध आहे. वास्तुविशारद मीर महम्मद इमादिन यांनी हा पाणी महाल बांधला.
  • राज्यात सूर्यफुलाचे सर्वाधिक क्षेत्र असणारा जिल्हा उस्मानाबाद (धाराशिव) आहे.
  • राज्यात कडधान्यांच्या पिकांचे सर्वाधिक क्षेत्र असणारा जिल्हा उस्मानाबाद(धाराशिव) आहे.
  • करडईचे सर्वाधिक उत्पादन घेणारा जिल्हा धाराशिव (उस्मानाबाद) आहे.
  • येडशी येथे रामलिंग मंदिर व दुर्गादेवी मंदिर आहे.
  • परांडा येथे हंसराज स्वामींचा मठ व कल्याण स्वामींची समाधी आहे.
  • भूम येथे आलम प्रभूंचे मंदिर आहे.
  • कुंथलगिरी येथे जैन धर्मीय मंदिर आहे व जैन मुनि शांतीसागर यांची समाधी आहे.
  • येरमाळा येथे येडेश्वरी मातेचे मंदिर आहे.
  • डोणगाव येथे कल्याण स्वामींचा मठ आहे.
  • आणदुर येथे प्रसिद्ध खंडोबाचे मंदिर आहे.
  • सोनारी येथे भैरवनाथ मंदिर आहे.
  • तुळजापूर येथे कोरडवाहू साळ संशोधन केंद्र आहे.
  • नळदुर्ग येथे तांदूळ संशोधन केंद्र आहे.
  • कवडगाव येथे नियोजित सौर ऊर्जा प्रकल्प आहे.
  • भवानी मातेचा जिल्हा म्हणून उस्मानाबाद(धाराशिव) जिल्ह्याला ओळखले जाते.
  • तेर येथे पुराण वस्तुसंग्रहालय आहे.
  • उस्मानाबादची शेळी राज्यात प्रसिद्ध आहे.
  • तेर या ठिकाणी तेरणा नदीच्या काठावर श्री संत गोरोबा काका यांचे समाधी मंदिर आहे.
  • उस्मानाबादचे पूर्वीचे नाव धाराशिव असे होते. 1910 मध्ये निजाम मीर उस्मानअली यांनी या शहरात स्वतःचे नाव दिले तेव्हापासून हे शहर उस्मानाबाद म्हणून ओळखले जाते.
  • उस्मानाबाद हा जिल्हा प्राचीन लेण्यासाठी प्रसिद्ध आहे.
  • उस्मानाबाद जिल्ह्यातील तेर येथे उत्खननात रोमन संस्कृतीशी जुळणाऱ्या वस्तू सापडल्या यावरून प्राचीन धाराशिवचा ग्रीक व रोमन संस्कृतीशी संबंध असावा.

Leave a comment