मध्य उत्तर महाराष्ट्रात मराठवाड्यातील (औरंगाबाद) छत्रपती संभाजीनगर या प्रशासकीय विभागातील हा जिल्हा आहे. मे 1981 मध्ये छत्रपती संभाजीनगरच्या (औरंगाबाद) विभाजनातून Jalana Jilha जालना जिल्ह्याची निर्मिती झाली.
मुख्यालय – जालना
महानगरपालिका – नाही
क्षेत्रफळ – 7687 चौकीमी
स्थान व विस्तार – जालनाच्या पूर्वेस व ईश्न्येस बुलढाणा जिल्हा, पूर्वेस परभणी जिल्हा हिंगोलीची सीमा ,दक्षिणेस बीड जिल्हा, पश्चिमेस औरंगाबाद जिल्हा, उत्तरेस जळगाव जिल्हा.
तालुके(8) – जालना, जाफराबाद, अंबड, बदनापूर, भोकरदन, परतूर, मंठा, घनसावंगी.
नद्या – गोदावरी ही येथील मुख्य नदी आहे. पूर्णा, गल्हाटी, धामणा, खेळणा, दुधना, जुई इतरा नद्या.
तलाव – घाणेवाडी मोती
डोंगररांगा – अजिंठा, जांबुवंत टेकड्या (ता.अंबड)
लेणी – भोकरदन
धरण – बदनापूर तालुक्यात दुधना धरण. जीवरेखा नदीवर जीवरेखा धरण, अकोलादेव.
वने – जिल्ह्यात वनांची संख्या खूप कमी आहे.
मृदा – जालना जिल्ह्यात काळी व सुपीक मृदा आढळते
पिके – जिल्हा सोयाबीन, कापूस, बाजरी, गहू, हरभरा, ज्वारी, मोसंबी, डाळिंब, इत्यादी पिके घेतली जातात. भोकरदन तालुक्यात मिरचीचे उत्पादन सर्वाधिक आहे. मोसंबीच्या क्षेत्रात जालना जिल्हा अग्रेसर आहे.
औद्योगिक – संकरित (हायब्रीड) बी-बियाणे निर्मिती उद्योग (बियाणांची पंढरी), स्टील हब. जालना येथे शटर्स (गुंडाळी दरवाजे) तयार करण्याचे कारखाने आहेत.
- मंठा येथील जनावरांचा बाजार प्रसिद्ध आहे.
- जालना कुंडलिका नदीकाठी वसलेले शहर आहे.
- जालना येथे गणपती मंदिर, मोती तलाव, मोतीबाग, स्वामी जनार्दन स्मारक ही स्थळे प्रसिद्ध आहेत.
- जांब (ता.घनसांगी) ही समर्थ रामदासांची जन्मभूमी आहे.
- अंबाड येथे खंडोबा व मत्सोदरी देवी मंदिर आहे.
- टाको-डोणगाव येथे बोहरी समाजाचा दर्गा आहे.
- राजुर येथे प्रसिद्ध गणेश मंदिर आहे.
- जयदेववाडी येथे महानुभाव पंथाचे तीर्थक्षेत्र आहे.
- रोहीलगड येथे जालना जिल्ह्यातील एकमेव डोंगरी किल्ला आहे.
- महाराष्ट्र हायब्रीड सीड्स कंपनी (महिको) जालना जिल्ह्यात आहे.
- गोदावरी नदी जालना व बीड जिल्हा यांच्यात सीमा बनवते.
- कुंडलिका ही नदी जालना शहरातून वाहते.
- नरोळा ही जालना जिल्ह्यातील पुनरुज्जीवीत नदी आहे.
- अंबड तालुक्यात कुंपनलिकांची संख्या सर्वाधिक आहे.
- घाणेवाडी तलाव जालना शहरास पाणीपुरवठा करतो.
- भोकरदन तालुक्यात पानमळे आहेत.
- बदनापूर येथे शेतीविषयक संशोधन केंद्र आहे.
- मंठा येथे जनावरांचा मोठा बाजार भरतो.
- जालना जिल्ह्यातला लमाणी व भिल या जाती आढळतात.
- जालना हे शहर बी बियाण्यांच्या उत्पादनासाठी व व्यापारासाठी विशेष प्रसिद्ध आहे.