नाम व सर्वनाम यांना जोडून येणाऱ्या अविकारी शब्दांना शब्दयोगी अव्यय-Shabdyogi avyay असे म्हणतात.
जे अव्यय शब्दाला जोडल्याने त्या शब्दाचा इतर दुसऱ्या शब्दाशी असलेला संबंध दाखवला जातो ,त्या अव्यायास शब्दयोगी अव्यय असे म्हणतात.
शब्दयोगी अव्यये शब्दाला जोडून येतांना त्याच्या मागील शब्दांचे सामान्य रूप होते.
सामान्यतः शब्दयोगी अव्यय नाम किंवा नामाचे कार्य करणाऱ्या शब्दांना जोडून येतात.
शब्दयोगी अव्यय नसली तर वाक्याचा अर्थ नीट लागला नसता.
यामध्ये लिंग, वचन, विभक्ती, पुरुष यामुळे बदल होत नाही, म्हणून त्यांना अविकारी किंवा शब्दयोगी अव्यय असे म्हणतात.
शब्दयोगी अव्यय स्वतंत्र असा शब्द नाही.
उदाहरण-
- देवासमोर दिवा लावला.
- सूर्य ढगामागे लपला.
- शाळेपर्यंत रस्ता आहे.
- टेबलवर मांजर बसली आहे.
वरील उदाहरणांमध्ये समोर, मागे, पर्यंत, वर ही शब्दयोगी अव्यय आहेत.
*शब्दयोगी अव्ययाचे प्रकार
१)कालवाचक शब्दयोगी अव्यय
जे शब्दयोगी अव्यय आपल्याला वाक्यातील वेळ दाखवतात, त्यांना आपण कालदर्शक शब्दयोगी अव्यय असे म्हणतो.
उदाहरण-
आज दुपारनंतर खेळाला सुरुवात होईल.
जेवणाआधी गोळी घे.
वर्षापूर्वी मी पुण्याला गेलो होतो.
वरील उदाहरणांमध्ये नंतर, आधी, पूर्वी, पुढे हे कालदर्शक शब्दयोगी अव्यय आहेत.
२)गतीवाचक शब्दयोगी अव्यय:
उदाहरण-
परवापासून शाळा उघडणार आहे.
उदाहरण पासून, आतून, पर्यंत, मधून, खालून इत्यादी
३)स्थलवाचक शब्दयोगी अव्यय
जे शब्दयोगी अव्यय वाक्यामध्ये स्थळ ,ठिकाण किंवा जागा दाखवण्याचे काम करतात, त्यांना स्थलवाचक शब्दयोगी अव्यय असे म्हणतात.
उदाहरण-
नेहा माझ्याजवळ बसली होती.
माझी गाडी घरासमोर उभी आहे.
जवळ,समोर,मध्ये ,आलीकडे,पाशी,नजीक इत्यादी .
४)करणवाचक किंवा साधनदर्शक शब्दयोगी अव्यय
एखादी क्रिया घडण्यासाठी जो घटक कारणीभूत आहे, त्याला आपण करणवाचक शब्दयोगी अव्यय असे म्हणतो.
उदाहरण-
पावसामुळे सगळीकडे पाणी साचले.
त्याच्याकडून मी पेन घेतला.
उदाहरण-
मुळे, करवी, योगे, हाती, द्वारा, करून , कडून इत्यादी.
५)हेतूवाचक शब्दयोगी अव्यय:
जे शब्दयोगी अव्यय आपल्याला एखादा हेतू दाखवण्याचे काम करतात, त्यांना आपण हेतू वाचक शब्दयोगी अव्यय असे म्हणतो.
उदाहरण-
तो झाडे पाहण्यासाठी सगळीकडे फिरला.
उपचारानिमित्त तो शहरात गेला.
जगण्याकरिता अन्नाची गरज असते.
स्तव, करिता, साठी, कारणे, अर्थी, प्रित्यर्थ,निमित्त इत्यादी.
६)व्यतिरेकवाचक शब्दयोगी अव्यय
उदाहरण-
पाण्याशिवाय आपण जगू शकत नाहीत.
अभ्यासाविना परीक्षेत पास होणे शक्य नाही.
शिवाय, विना, वाचून, खेरीज ,व्यतिरिक्त,परता इत्यादी.
७)तुलनावाचक शब्दयोगी अव्यय
जे शब्दयोगी अव्यय दोन नामामध्ये तुलना करतात, त्यांना तुलना वाचक शब्दयोगी अव्यय असे म्हणतात.
उदाहरण-
दगडा परी वीट मऊ.
राजापेक्षा नेहा उंच आहे.
पेक्षा, तर, मध्ये, परिस ,तम इत्यादी.
८)योग्यतावाचक शब्दयोगी अव्यय
उदाहरण-
ही सायकल माझ्या मनाजोगी आहे.
हे पाणी पिण्यायोग्य आहे.
समान, सारख्या, सयान ,प्रमाणे ,सम योग्य इत्यादी.
९)कैवल्यवाचक शब्दयोगी अव्यय
जे शब्द नामाला जोडून येतात, त्यांना कैवल्यवाचक शब्दयोगी अव्यय असे म्हणतात,
उदाहरण-
रमेशच उंच उडी मारू शकतो.
नेहाच हे गणित सोडू शकते.
च, मात्र, पण, फक्त,केवळ ,ना इत्यादी.
१०)संग्रहवाचक शब्दयोगी अव्यय
उदाहरण-
राजा देखील खो-खो खेळतो.
नेहा सुद्धा अभ्यास करते.
सुद्धा, देखील, ही, पण बारीक, केवळ ,फक्त इत्यादी.
११)संबंधदर्शक शब्दयोगी अव्यय
जे शब्दयोगी अव्यय दोन घटकातील संबंध दाखवतात, त्यास संबंध दर्शक शब्दयोगी अव्यय असे म्हणतात.
उदाहरण-
खेळाविषयी तिला आवड आहे.
किल्लासंबंधि त्याला माहित आहे.
विषयी,संबंधी,विशी इत्यादी.
१२)सहचार्यवाचक शब्दयोगी अव्यय
जे शब्दयोगी अव्यय एका घटकाबरोबर दुसऱ्या घटकाचा अर्थ बोध करतात, त्यांना आपण सहचार्य वाचक शब्दयोगी अव्यय असे म्हणतो.
उदाहरण-
मुलांसंगे मन रमते.
मुलांबरोबर मी सहलीला गेलो होतो.
संगे, सह, बरोबर, सवे, निशी, सकट, सहित इत्यादी.
१३)विनिमयवाचक शब्दयोगी अव्यय
उदाहरण-
गणेशऐवजी रमेशची निवड संघात झाली.
माझ्याबद्दल गणेश कार्यक्रमाला गेला.
ऐवजी, बद्दल, जागी, बदली इत्यादी.
१४)दिकवाचक शब्दयोगी अव्यय
उदाहरण-
रामने देवाकडे प्रार्थना केली.
माझी देवाप्रत श्रद्धा आहे.
प्रती,कडे,लागी,प्रत इत्यादी.
१५)परिमाणवाचक शब्दयोगी अव्यय
जे शब्द नामाला जोडून येतात आणि नामाचे परिणाम दर्शवण्याचे काम करतात, त्यांना परिमाणवाचक शब्दयोगी अव्यय असे म्हणतात.
उदाहरण-
गणेश दिवसभर खेळत होता.
ती तासभर अभ्यास करत होती.
१६)विरोधवाचक शब्दयोगी अव्यय
उदाहरण-
मी नेहमी उलट बोलतो.
तो नेहमी माझ्या मनाविरुद्ध करतो.
मला आईविन करमत नाही.
विरुद्ध, विन, उलट, उलटे इत्यादी.
१७)भागवाचक शब्दयोगी अव्यय
जे शब्दयोगी अव्यय दोन घटकांमध्ये भाग पाडण्याचे काम करतात, त्यांना भागवाचक शब्दयोगी अव्यय असे म्हणतात.
उदाहरण
शंभरातून एखादा चांगला निघतो.
दहा पैकी चार पक्षी उडून गेले.
मुलांपैकी राजा सगळ्यात हुशार आहे.
रामने जमिनीतून पिक उगवले.
पैकी ,आतून ,पोटी इत्यादी.