1 मे 1960 रोजी महाराष्ट्र राज्य अस्तित्वात आल्यानंतर त्यात एकूण 26 जिल्हे व 4 प्रशासकीय विभाग होते. Maharashtratil Jilhe आता 36 जिल्हे व 6 प्रशासकीय विभाग आहेत. त्यानंतर अनेक कारणांनी जुन्या जिल्ह्यांचे भाग पडत नवीन 10 जिल्हे तयार करण्यात आले. असे सगळे मिळून आज महाराष्ट्रात एकूण 36 जिल्हे Maharashtratil Jilhe आहेत. आणखी काही जिल्हे नव्याने तयार होणार आहेत. त्यांची कोकण, पुणे, नाशिक(खानदेश), छत्रपती संभाजीनगर, अमरावती आणि नागपूर अशा सहा प्रशासकीय विभागात विभागणी करण्यात आली आहे. मुंबई शहर आणि मुंबई उपनगर ही 100% शहरी जिल्हे असल्यामुळे या जिल्ह्यांना जिल्हा परिषद नाहीत. महाराष्ट्रात 36 जिल्हे असले तरी 34 जिल्हा परिषदा आहेत.
महाराष्ट्र राज्याचे भौगोलिक दृष्ट्या 5 प्रमुख प्रदेश आहेत.
1.विदर्भ
2.मराठवाडा
3.खानदेश
4.कोकण
5.पश्चिम महाराष्ट्र
महाराष्ट्र राज्य एकूण 26 जिल्ह्यांसोबत स्थापन झाल्यानंतर पुढील 10 जिल्हे नव्याने तयार झाले.
सिंधुदुर्ग जिल्हा – 1 मे 1981 रोजी रत्नागिरी मधून
जालना जिल्हा -1 मे 1981 रोजी संभाजीनगर(औरंगाबाद) मधून
लातूर जिल्हा – 16 ऑगस्ट 1982 उस्मानाबाद(धाराशिव) मधून
गडचिरोली जिल्हा – 26 ऑगस्ट 1982 चंद्रपूर मधून
मुंबई उपनगर – 1 ऑगस्ट 1990 मुंबई मधून
गोंदिया जिल्हा – 1 मे 1999 भंडारा मधून
हिंगोली जिल्हा – 1 मे 1999 परभणी मधून
नंदुरबार जिल्हा – 1 जुलै 1998 धुळे मधून
वाशिम जिल्हा – 1 जुलै 1998 अकोला मधून
पालघर जिल्हा – 1 ऑगस्ट 2014 ठाणे मधून
कोकण प्रशासकीय विभागातील 7 जिल्हे :
- पालघर
- ठाणे
- मुंबई उपनगर
- मुंबई शहर
- रायगड
- रत्नागिरी
- सिंधुदुर्ग
पुणे प्रशासकीय विभागातील 5 जिल्हे
1.पुणे
2.सातारा
3.सांगली
4.कोल्हापूर
5.सोलापूर
नाशिक प्रशासकीय विभागातील 5 जिल्हे
1.नाशिक
2.अहमदनगर
3.धुळे
4.नंदुरबार
5.जळगाव
नागपूर प्रशासकीय विभागातील 6 जिल्हे
1.नागपूर
2.वर्धा
3.भंडारा
4.गोंदिया
5.गडचिरोली
6.चंद्रपूर
छत्रपती संभाजीनगर(औरंगाबाद) प्रशासकीय विभागातील 8 जिल्हे :
1.छत्रपती संभाजी नगर
2.जालना
3.बीड
4.धाराशिव
5.परभणी
6.हिंगोली
7.लातूर
8.नांदेड