उत्तर महाराष्ट्रात खानदेशातील तापी खोऱ्यात वसलेला नाशिक या प्रशासकीय विभागातील Dhule Jilha धुळे हा जिल्हा आहे. क्षेत्रफळाच्या दृष्टीने राज्यात 21 वा तर लोकसंख्येच्या दृष्टीने 23 वा क्रमांक आहे.
मुख्यालय – धुळे
महानगेपालिका(1) – धुळे
क्षेत्रफळ – 7195 चौकीमी
स्थान व विस्तार – धुळे जिल्ह्याच्या उत्तरेस नंदुरबार जिल्हा व मध्य प्रदेशची सीमा मेवाड जिल्हा, पूर्वेस जळगाव जिल्हा, दक्षिणेस नाशिक जिल्हा, पश्चिमेस गुजरात सीमा व नंदुरबार जिल्हा.
तालुके(4) – धुळे, साक्री, शिंदखेड, शिरपूर.
नद्या – तापी, पांझरा, अनेर, अरुणावती, बुराई, अमरावती, बोरी, कान.
संगमस्थळ – सिंदखेडा(तापी-बुराई), मुडावद(तापी-पांझरा).
नदी काठावरील ठिकाणे – धुळे(पांझरा), शिंदखेड(बुराई), साक्री(कान), शिरपूर(अरुणावती).
धरणे – शिरपूर तालुक्यात अरुणावती नदीवर करवंद धरण , .
प्रमुख पिके – भुईमुगाच्या उत्पादनात धुळे जिल्हा आघाडीवर आहे.
प्रमुख ठिकाणे – तापी-पांझरा संगमावर मुडावद (ता. शिंदखेड) येथे कपिलेश्वर मंदिर आहे.
अभयारण्य– शिरपूर तालुक्यात अनेर अभयारण्य
गरम पाण्याची झरे – दाराविपूर, इंदेव.
तलाव – जामफळ, डेडरगाव, नाकाने, कुळूथे.
गड – सोनगीर किल्ला, लळींग किल्ला, भामेर, गाळणा.
मृदा – हलक्या प्रतीची मृदा व काही ठिकाणी काळी मृदा आढळते.
- धुळे शहर पांझरा नदीकाठी आहे.
- हाजीरा-धुळे-कोलकत्ता(NH-6) या राज्यातील सर्वाधिक लांबीच्या राष्ट्रीय महामार्गावरील धुळे हे शहर आहे.
- धुळे येथे वि.का. राजवाडे वस्तुसंग्रहालय व संशोधन मंडळ आहे.
- एकविरा देवीचे मंदिर, समर्थ वाग्देवता मंदिर, गांधी तत्त्वज्ञान केंद्र, धम्म सरोवर धुळे येथे आहे.
- दौंडाईचा (ताल.शिंदखेड) येथे मिरचीचा मोठा बाजार आहे.
- धुळे हे दिल्ली-मुंबई औद्योगिक कॅरीडोर मधील शहर आहे.
- “दुधा-तुपाचा जिल्हा” म्हणून धुळे जिल्ह्याची ओळख आहे.
- धुळे शहराचा आराखडा सर मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या यांनी तयार केला.
- पूर्वी जळगाव आणि धुळे मिळून खानदेश हा एक जिल्हा होता. या जिल्ह्याचे मुख्यालय धुळे येथे होते. पुढे 1961 ला पश्चिम खानदेशाला धुळे जिल्हा असे नाव देण्यात आले.
- धुळे जिल्ह्याचे पूर्वीचे नाव पश्चिम खानदेश असे होते.
- धुळे जिल्ह्यातील शिरपूर येथे शेतीमालाची मोठी बाजारपेठ आहे.
- शिरपूर मधील बालाजी मंदिर प्रेक्षणीय स्थळ आहे. दोंडाई येथे स्टार्चचा कारखाना आहे.
- धुळे जिल्हा हा राज्यातील तिसऱ्या क्रमांकाचा आदिवासी जिल्हा आहे.
- चार तालुके असणारा एकमेव जिल्हा धुळे आहे.
- धुळे जिल्ह्याला आपण “आदिवासींचा जिल्हा” म्हणतो.
- शिरपूर तालुक्यात राज्यातील पहिला सोने शुद्धीकरण कारखाना आहे.