प्रशासकीय दृष्ट्या पूर्व विदर्भातील Gondiya गोंदिया हा जिल्हा नागपूर प्रशासकीय विभागात येतो. 1 मे 1999 रोजी भंडारा जिल्ह्याच्या विभाजनातून Gondiya गोंदिया जिल्ह्याची निर्मिती झाली. महाराष्ट्राच्या ईशान्येस हा जिल्हा आहे.
मुख्यालय – गोंदिया
महानगरपालिका – नाही
क्षेत्रफळ – 5435 चौकिमी.
स्थान व विस्तार – गोंदियाच्या पूर्वेस छत्तीसगड, उत्तरेस मध्य प्रदेश हे राज्य, पश्चिमेस भंडारा जिल्हा, दक्षिणेस गडचिरोली जिल्हा.
तालुके(8) – गोंदिया, गोरेगाव, आमगाव, तिरोडा, देवरी, सालेकसा, सडक-अर्जुनी, अर्जुनी-मोरगाव.
नद्या – वैनगंगा हि सर्वात मोठी नदी आहे. वैनगंगेच्या उपनद्या गाढवी, पांगोली, बाघ, बावनथाडी, चुलबंद.
संगमस्थळ – काटी (वैनगंगा-वाघ).
अभयारण्य – नागझिरा (ता.गोरेगाव 1970), नवेगाव (ता. अर्जुनी-मोरगाव 2012), नवीन नागझिरा (ता. गोरेगाव 2012).
व्याघ्र प्रकल्प – नवेगाव नागझिरा.
तलाव – परसवाडा, चोरखमारा, सिलीहुरकी, रेंगेपार, सिरपार,
बोदलकसा, खळबंदा, नवेगाव.
डोंगररांगा व टेकड्या – दरकेसा, प्रतापगड, नवेगाव, चिंचगड, गंगाझरी, गायखुरी.
वने – उष्णकटिबंधीय सदाहरित वने आढळतात. यात साग, हळदू, तेंदू, ऐन, खैर, बांबू इत्यादी वृक्ष आढळतात.
मृदा – काळी व सुपीक मृदा आढळते. चुनखडी मिश्रित मृदा आढळते.
उद्योगधंदे – गोंदिया विडी उद्योगासाठी प्रसिद्ध आहे. गोंदिया तालुक्यात अंभोरा या ठिकाणी मत्स्यबीज प्रजनन केंद्र आहे.
धरणे – गाढवी नदीवरील “इटियाडोह प्रकल्प” अर्जुनी मोरगाव तालुक्यात आहे. चुलबंद धरण गोरेगाव तालुक्यात आहे.
पिके – भात हे प्रमुख पीक आहे.
खनिजे – खुर्सीपार, आंबेतलाव येथे लोहखनिजाच्या खाणी आढळतात. ग्रॅनाईट, सिझियम इत्यादी खनिजे गोंदिया जिल्ह्यात आढळतात.
औद्योगिक –
गोंदिया, तिरोडा येथे तेंदूच्या पानापासून विड्या वळण्याचा उद्योग व भात सडण्याच्या गिरण्या आहेत.
- राज्यातील तांदळाच्या उत्पादनात प्रथम क्रमांकाचा जिल्हा गोंदिया आहे.
- गोंदिया हे मुंबई-कोलकाता लोहमार्गावरील जंक्शन आहे.
- गोंदिया हे तेंदुपत्तिचे महत्त्वाचे व्यापार केंद्र आहे.
- तिरोडा हे तांदळाची बाजारपेठ व विडी उद्योगाचे केंद्र आहे.
- प्रतापगढ येथील तिबेटी कॅम्प प्रसिध्द आहे.
- पद्मपूर येथे हाजरा फॉल्स धबधबा आहे.
- नवेगाव बांध हे राष्ट्रीय उद्यान अर्जुनी-मोरगाव तालुक्यात आहे.
- पद्मपूर (ता.आमगाव) हे संस्कृत लेखक भवभूती यांचे जन्मस्थान आहे. आमगाव या ठिकाणी नाटककार भवभोवती यांचे स्मारक आहे
- डाक्राम सुकडी (ता.तिरोडा) येथे चक्रधर स्वामी मंदिर, सूर्यसेव व मांडोदेवी मंदिर, बोधलकसा धरण आहे.
- डाकराम सुकडी या ठिकाणी महानुभाव पंथाचे तीर्थक्षेत्र आहे.
- गोंदिया ची राईस सिटी( Rice City) म्हणून ओळख आहे.
- गोंदिया येथे बिर्सी विमानतळ आहे.
- कचारगढ येथे 25 हजार वर्षांपूर्वीच्या प्राचीन नैसर्गिक गुहा आहेत.
- गोंदिया जिल्ह्याला “तलावांचा जिल्हा” असे म्हणतात.
- सालेकसा या ठिकाणचे गढ मातेचे मंदिर प्रसिद्ध आहे.
- गोंदिया जिल्ह्याची सीमा मध्य प्रदेश व छत्तीसगड या दोन राज्यांना लागते.
- महाराष्ट्राच्या ईशान्य सीमेवर असणाऱ्या टेकड्यांना “दरकेसा टेकड्या” असे म्हणतात.
- गोड्या पाण्यातील मत्स्य व्यवसायात अग्रेसर असणारा जिल्हा असणारा गोंदिया जिल्हा आहे.
- नवेगाव बांध तलाव “सेव्हन सिस्टर्स” म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सात टेकड्यांनी वेढला आहे.
- गोंदिया जिल्हा सध्या “लाल पट्टाचा भाग” समजला जातो.
- प्रतापगढ येथील प्राचीन किल्ला व शिवमंदिर प्रसिद्ध आहे.
- सडक अर्जुनी या ठिकाणी बांबूच्या कलात्मक आणि विविध उपयोगी वस्तू निर्मितीचे केंद्र आहे.