रायगड जिल्हा Rayagad Jilha हा महाराष्ट्र राज्याच्या पश्चिम भागातील जिल्हा आहे. या जिल्ह्याचे जुने नाव कुलाबा असे होते. जिल्ह्यातील कुलाबा नावाच्या किल्ल्यावरून ते नाव पडले होते. बॅरिस्टर अंतुले महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असताना 1981त्यांनी हे नाव बदलून Rayagad Jilha रायगड असे केले.
पूर्वीच्या मराठा साम्राज्याची पहिली राजधानी असलेल्या किल्ल्यावरून किल्ल्याचे नाव रायगड असे ठेवण्यात आले.
मुख्यालय – अलिबाग
क्षेत्रफळ – 7152 किमी.
स्थान व विस्तार – उत्तरेस ठाणे जिल्हा, पूर्वेस पुणे जिल्हा, आग्नेयेस सातारा जिल्हा, दक्षिणेस रत्नागिरी जिल्हा व पश्चिमेस अरबी समुद्र.
तालुके(15) – अलिबाग, उरण, रोहा, पनवेल, पेन, कर्जत, खालापूर, महाड, सुधागड (पाली), माणगाव, पोलादपूर, म्हसळे, श्रीवर्धन, मुरुड, तळा
नद्या – उल्हास(उगम लोणावळा), पातळगंगा(उगम खंडाला ), कुंडलिका(उगम हिरडेवादी), काळ(उगम लिंगाणा किल्ला), सावित्री(उगम महाबळेश्वर), आंबा (उगम जांभूळपाडा), गांधार(उगम लिंगाणा किल्ला ).
नद्यांचा संगम – महाड या ठिकाणी गांधार व सावित्री नद्यांचा संगम आहे. हरिहरेश्वर या ठिकाणी गायत्री व सावित्री नद्यांचा संगम आहे.
धरणे – काळ, बाळगंगा, कोंढाणे, पाली भूतवली, खार आंबोली, हेटवणे, महान (साबरकुंड)
खाडी – धरमतर खाडी पाताळगंगा नदीच्याकाठी, राजापूरची खाडी काळ नदीच्याकाठी ,रोहाची खाडी कुंडलिका नदीच्याकाठी बानकोटची खाडी सावित्री नदीच्याकाठी.
गरम पाण्याची झरे – कडे, उन्हेरे(ता.पाली ), सव(ता.महाड ), वडवली(ता.महाड).
पिके – रायगड जिल्ह्यातील भात हे प्रमुख पीक आहे.
धबधबे –तपालवाडी, गरांभी, पांडवकडा(खारघर), कुंभे(मानगाव), भिवपुरी, झेनीत(खोपोली).
रायगड जिल्ह्यातील किनारे – अलिबाग तालुक्यात किंवा आवास बीच (समुद्रकिनारे), हरिहरेश्वर, कोरलाई बीच, काशीद, वर्सोली, आक्षी, नागाव, मांडवा, सासवणे, रेवास हे समुद्रकिनारे प्रसिद्ध आहेत. रेवदंडा बंदर.
थंड हवेची ठिकाणे – माथेरान, राजमाची, कनकेश्वर.
अभयारण्य – फणसाड पक्षी अभयारण्य (अलिबाग 1986),
कर्नाळा पक्षी अभयारण्य (पनवेल 1986), सुधागड (ता. सुधागड 2014)
लेणी – घारापुरी, तळे, कुडाळ, अंबिवली, कोंढाणे, खडसांबळे, ठाणाळे (नादसुर), पालेल, रामधरण, कोल,
खनिजे – रायगड जिल्ह्यात बॉक्साईट चे साठे आढळतात.
किल्ले – रायगड, कर्नाळा, लिंगाणा, खांदेरी, उंदेरी, मुरुड जंजिरा (सागरी किल्ला), सुधागड, सरसगड.
- थळ-वायशेत येथे राष्ट्रीय केमिकल्स अँड फर्टीलायझर्स हा खत कारखाना आहे.
- रायगड येथे छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी आहे.
- रायगड किल्ला हा छत्रपती शिवाजी महाराजांची राजधानी होती येथे त्यांचा 6 जून 1674 रोजी त्यांचा राज्याभिषेक झाला होता.
- पनवेल जवळ रासायनी कारखाना आहे.
- रायगड जिल्ह्यात माथेरान (ता. कर्जत) हे थंड हवेचे ठिकाण आहे.
- रायगड जिल्ह्यात कर्नाळा पक्षी अभयारण्य आहे.
- अष्टविनायकापैकी बल्लाळेश्वर पाली, वरदविनायक महाड हे दोन विनायक रायगड जिल्ह्यात आहेत.
- रायगड जिल्ह्यातील पेन येथील गणेश मूर्ती जगप्रसिद्ध आहे.
- खोपोली हे धबधब्यांचे शहर आहे.
- हरिहरेश्वर किनाऱ्यावर सागरी कडा हे भुरूप आढळते. हरिहरेश्वरला देवघर (House Of God) म्हणतात.
- महाड येथे पंचतारांकित औद्योगिक वसाहत आहे.
- खोपोली येथे कागद उद्योग आहे.
- श्रीवर्धन येथे सुपारी संशोधन केंद्र आहे.
- अलिबाग हे कलिंगडसाठी प्रसिद्ध ठिकाण आहे.
- रायगड जिल्ह्याला तांदळाचे कोठार असे म्हणतात.
- रायगड हा जलदुर्ग व डोंगरी किल्ल्यांचा जिल्हा आहे.
- उरण तालुक्यात घालापुरी येथे एलिफंटा लेणी आहेत.
- पेण तालुक्यात आचार्य विनोबा भावे यांचे जन्मस्थान आहे.
- शिराढोण (ता.पनवेल) हे आद्य क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके यांचे जन्मगाव आहे.
- कर्जत येथे कोंडवे, कोंढाणा लेणी आहे.
- खोपोली हे धबधब्यांचे शहर आहे.
- पुंडलिका नदीवर कोलाड येथे जलक्रीडा केंद्र आहे.
- हरिहरेश्वर येथील शिवमंदिर प्रसिद्ध आहे.
- शिवथरघळ (सुंदरमठ) येथे समर्थ रामदास स्वामींनी दासबोध हा ग्रंथ लिहिला.
- रायगड जिल्ह्याला “मिठागारांचा जिल्हा” म्हणून ओळखला जातो.