1857 cha uthav : 1857 च्या उठावाची पार्श्वभूमी
- 1857 cha uthav ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीच्या विस्तारवादी धोरणामुळे जमीनदारांची वतने खालसा केल्यामुळे व अनेक सत्याधीशांना आपल्या सत्ता गमवाव्या लागल्यामुळे, असंतुष्ट झालेल्यांनी आपल्या कुवतीप्रमाणे कंपनी सरकारच्या विरोधात शस्त्र उचलले. मध्य व पूर्व हिंदुस्थानातील आदिवासींनी उठाव केले.
- संन्याशांचे बंड–
1763 ते 1780 या काळातील बंगाल प्रांतातील संन्याशांचे व फकिरांचे बंड. सतरा वर्षे चाललेल्या या बंडास शेतकऱ्यांचा पाठिंबा मिळाला. बंकीमचंद्र चॅटर्जी यांच्या ‘आनंदमठ’ मध्ये या कादंबरी संन्याशांच्या बंडाचे वर्णन आढळते.
- 1765 ते 1786 या काळात बंगालमधील मिदनापूर जिल्ह्यात चुआर येथे आदिवासी बांधवांचे दोन उठाव झाले.
- ओडिसा 1804 ते 1817 मध्ये गोंडांचा उठाव झाला.
- हिंदुस्तानातील छोटा नागपूर भागातील कोलरी आदिवासींनी 1827 मध्ये तर, मुंडा आदिवासींनी 1831 मध्ये उठाव केला.
- 1844 मध्ये कोल्हापूर येथे गडकर्यांचा उठाव झाला.
- पूर्व हिंदुस्थानात उत्तर-पूर्व भागातील खासी टेकड्यांवरील आदिवासींनी 1829 मध्ये ब्रिटिशांच्या विरोधात उठाव केला.
- ओरिसा येथील खोंडा आदिवासी तसेच, बिहार मधील संथाळांचा उठाव हा ब्रिटिशांना हादरा देणारा ठरला.
- संथाळानी झारखंड व पश्चिम बंगाल मध्ये जमीनदारांविरुद्ध उठाव केला. संथाळ उठाव सिद्धू, कान्हू, चांद आणि भैरव या चार भावांच्या नेतृत्वाखाली संथाळांचा उठाव झाला.
- संथाळानी सत्याचे राज्य स्थापन करण्याचा निर्णय घोषित केला. ओ मॉली (O Mouli) या अधिकाऱ्याने संथाळाच्या चमकमकीचा वृत्तांत दिला आहे.
- महाराष्ट्रातील खानदेशातील आदिवासींनी त्रिंबकची डेंगळे यांच्या प्रोत्साहनाने दुसऱ्या बाजीरावास पेशवे पदावर पूर्ण प्रस्थापित करण्याचा प्रयत्न केला. परंतु, ब्रिटिशांपुढे त्यांचा निभाव लागला नाही.
- आंध्र प्रदेशात पाळेगारांचे उठाव झाले.
- बंगालमध्ये पागलपंथी व फरेजी अनुयायांचे बंड झाले.
- उत्तर भारतात जाटांचे, राजपुतांचे व बुंदेल्यांचे उठाव झाले.
- 1828 ते 1833 मध्ये आसाम मध्ये अहोम सरदारांचे बंड झाले.
- कोकणात फोंड-सावतांचा उठाव झाला.
- ठाणे जिल्ह्यातील कोळी व आदिवासी लोकांनी मराठी सत्तेच्या पुनरुज्जीवनासाठी 1839 मध्ये ब्रिटिशांच्या विरोधात बंड केले.
- 1840 मध्ये साताऱ्याचे छत्रपती प्रतापसिंह यांनी तर, 1841 मध्ये कोल्हापूर भागातील गडकर्यांनी उठाव केले.
- भारतीय सैनिकांनी 1806 मध्ये मद्रास प्रांतातील वेल्लोर येथे मोठा उठाव केला. इंग्रजांविरुद्ध त्यांच्या सेनेतील भारतीय सैनिकांचा हा पहिला मोठा उठाव होय.
- 1824 मध्ये बराकपूर छावणीतील भारतीय शिपायांनी ही असाच उठावाचा प्रयत्न केला.
- 1803 साली ब्रिटिशांनी पाईकांच्या वंश परंपरागत जमिनी काढून घेतल्या. त्यामुळे 1817 मध्ये पाईकांनी ब्रिटिशांविरुद्ध उठाव केले. बक्षी जगनबंधू विद्याधर महोपात्रा यांनी पाईकांच्या उठावाचे नेतृत्व केले.
- ब्रिटिशांच्या विरोधात घडून आलेले वरील सर्व उठाव ब्रिटिश सरकारने मोडून काढले.
- वरील सर्व उठाव दडपून टाकण्यात कंपनी सरकारला यश आले असले तरी, भारतीयांमधील असंतोष दिवसेंदिवस वाढत गेला.
- 1757 ते 1857 या शंभर वर्षाच्या कालखंडात कंपनी सरकारने आपला प्रचंड साम्राज्यविस्तार केला होता. कंपनीच्या धोरणामुळे प्रजा, संस्थानिक, जहागीरदार, जमीनदार असंतुष्ट झाले.
- राजकीय, आर्थिक, सामाजिक, धार्मिक व लष्करी क्षेत्रातील असंतोषांमधून 1857 चा उठाव घडून आला.
- 1857 च्या उठावाची सुरुवात 10 मे या दिवशी झाली.
- ईस्ट इंडिया कंपनीच्या मेरठ येथील सैनिकांनी बंड पुकारले व युरोपियन अधिकाऱ्यांना ठार मारले. नंतर ते दिल्लीवर चाल करून गेले.
- त्यांनी लाल किल्ल्यात प्रवेश केला व मोगलांची प्रतिष्ठेचे नाव लावणाऱ्या दुसऱ्या बहादूर शाहाच्या नावे भारताच्या सम्राट म्हणून द्वाही फिरवली.
- सेवेच्या अधिकाधिक जाचक होत चाललेल्या अटी, धार्मिक बाबतीत हस्तक्षेप आणि अधिकाऱ्यांचा वर्णीय अहंकार असे त्यांचे स्वरूप होते. पण मुळात त्या सर्वांना मागे ब्रिटिश सत्तेविरुद्धचा असंतोष होता. कारण हे शिपाई झाले तरी भारतीय समाजातलेच होते.
- भारतीय समाजाच्या अन्य घटकांमध्ये ज्या आशा. आकांक्षा, निराशा, असंतोष होता त्याचेच प्रतिबिंब त्यांचा अंतकरणात पडलेले होते.
tags
1857 च्या उठावाची पार्श्वभूमी, 1857 chya uthawachi parshwabhumi, संन्याशांचा बंड, गोडांचा उठाव, गडकर्यांचा उठाव, पाळेगारांचे उठाव, 1857 चा उठाव, 1857 cha uthaw, snyashyancha uthaw,godancha band,gadakaryancha uthaw,palegaranche uthaw.
Post Comment