महाराष्ट्रातील सहा प्रशासकीय विभागापैकी Amrawati Jilha अमरावती हा एक प्रशासकीय विभाग असून यामध्ये विदर्भातील पाच जिल्ह्यांचा समावेश होतो.
जिल्ह्याचे व प्रशासकीय विभागाचे मुख्यालय – अमरावती
महानगरपालिका – अमरावती
क्षेत्रफळ – 12210 चौकिमी.
स्थान व विस्तार – पूर्वेस नागपूर व वर्धा जिल्हा, पश्चिमेस व नैऋत्येस अकोला, दक्षिणेस यवतमाळ.
तालुके(14) – अमरावती, अचलपूर, अंजनगाव-सुर्जी, चांदूर-बाजार, चांदुर-रेल्वे, चिखलदरा, तिवसा, दर्यापुर, धारणी, धामणगाव-रेल्वे, नांदगाव-खंडेश्वर, मोर्शी, भातकुली, वरुड.
नद्या – तापी, पूर्णा, वर्धा या मुख्य नद्या व त्यांच्या उपनद्या.
जिल्ह्यातील तापी नदीच्या उपनद्या गाडगा, कापरा, सिपना.
जिल्ह्यातील पूर्णा नदीच्या उपनद्या चंद्रभागा, शहानुर, पेढी. जिल्ह्यातील वर्धेच्या उपनद्या चुडामण, माडू, वेंबळा, विदर्भा, चारघड, खोलाट.
मेळघाटातून वाहणाऱ्या पाच नद्या सिपना, गाडगा, खंडू, खापर, डोलार.
नदीकाठावरील ठिकाण – अचलपूर(चंद्रभागा), शेणगाव(शहानुर), अंजनगाव-सुर्जी(शहानुर), कोंडीण्यपूर(वर्धा).
राष्ट्रीय उद्यान – गुगामल राष्ट्रीय उद्यान
व्याघ्र प्रकल्प – मेळघाट व्याघ्र प्रकल्प
अभयारण्य – मेळघाट, वाण
धबधबा – मुक्तागिरी
जलसिंचन प्रकल्प – अप्पर वर्धा (वर्धा नदीवर 1993)
गरम पाण्याचा झरा – सालबर्डी
तलाव – दाभेरी, घाटखेडा, पिंपळगाव, मांडवा, वाई, सादावाडी, सावली, वडाळी, छत्री, शेवदरी.
शिखर – वैराट, चिखलदरा.
डोंगररांगावर/टेकड्या – सातपुडा, पोहरा, जिनगड, गाविलगड, चिरोडी.
लेणी – वडनेरा, खंडेश्वर, नांदगाव.
गड/किल्ले – अचलपूर, आमनेर.
वने – जिल्ह्यात विविध प्रकारची वने आढळतात.
मृदा – जिल्ह्यात सुपीक मृदा आढळते
अमरावती जिल्ह्यात “तिखाडी” हे प्रसिद्ध गवत सापडते.
मोर्शी व वरूड तेंदू पानाच्या उत्पादनासाठी प्रसिद्ध आहे.
धरणे – शहानूर, सापन, पूर्णा, चंद्रभागा, बगाजी सागर, वर्धा नदीवरील मोर्शी प्रकल्प पूर्णत्वाच्या प्रतीक्षेत आहे.
पिके – पिके जिल्ह्यात प्रामुख्याने ज्वारी, कापूस, सोयाबीन, गहू इत्यादी प्रकारचे पिके घेतात. मोर्शी परिसरात संत्री, मोसंबीचे उत्पादन केले जाते.
औद्योगिक – कापसाच्या उत्पादनामुळे जिनिंग व प्रेसिंग उद्योग, कापड गिरणी. सातुर्णा येथे औद्योगिक वसाहत आहे. नांदगाव-पेठ येथे औद्योगिक नागरी संकुल आहे.
- अमरावती येथे संत गाडगेबाबा विद्यापीठ, कापसाची प्रमुख बाजारपेठ, डॉ. शिवाजीराव पटवर्धन यांनी कुष्ठरोग्यांसाठी स्थापन केलेले तपोवन, डॉ. पंजाबराव देशमुख यांची शिवाजी शिक्षण संस्था व श्रद्धानंद छात्रालय, गाडगेबाबांची समाधी, गुरु हनुमान आखाडा आहे.
- चिखलदरा हे थंड हवेचे ठिकाण आहे. हे विदर्भाचे नंदनवन विदर्भाचे काश्मीर आहे.
- चिखलदरा येथे कॉफीचे मळे आहेत व बांबू उत्पादनासाठी प्रसिद्ध आहे.
- मोर्शी तालुक्यात रिथपूर (रिद्धपूर) येथे चक्रधर स्वामींचे गुरु श्री गोविंदप्रभू यांची समाधी आहे.
- यावली हे संत तुकडोजी महाराजांचे जन्मगाव आहे.
- चिखलदरा येथे भिमाने कीचकाचा वध केला अशी आख्यायिका आहे.
- मोझरी येथे राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचा “गुरुकुंज आश्रम” व तुकडोजी महाराजांची समाधी आहे.
- वरुड तालुक्यात वर्धा नदीकाठी श्रीक्षेत्र झुंज आहे.
- शेंडूरजनाघाट (ता.वरुड) येथे शेंदूर, कुंकू यांची निर्मिती केली जाते. येथे विदर्भातील सर्वात मोठी हळद व मिरचीची ही बाजारपेठ आहे. येथे “पानेरी” ही संत्र्याच्या झाडाची रोपे तयार केली जातात.
- महिमापूर येथील सात मजल्यांची विहीर आहे.
- ऑक्टोबर 2015 मध्ये मेळघाटातील गुगामल वन्यजीव विभागातील “रोरा” हे 450 लोकवस्तीचे गाव ग्रामपरिसर विकास समितीच्या माध्यमातून सरपणमुक्त व चराईमुक्त गाव ठरले.
- चिखलदरा येथे भीमकुंड धबधबा, पंचधारा धबधबा आहे.
- मेळघाट हे “कोरकु” आदिवासी जमातींचे निवासस्थान आहे.
- अमरावती येथे राष्ट्रीय अपंग कल्याण संस्था आहे.
- लासुर, ता.दर्यापूर येथील यादवकालीन मंदिर प्रसिद्ध आहे.
- अमला (ता. दर्यापूर) हि संत गाडगेबाबा यांची कर्मभूमी आहे.
- देवी रुक्मिणी व दमयंतीचा जिल्हा म्हणून अमरावती जिल्ह्याला ओळखले जाते.
- अमरावती येथील अंबादेवीचे मंदिर प्रसिद्ध आहे.
- अचलपूर येथे शाहडोल रहमान शहा गाझीचा दर्गा आहे.
- भातकुली या ठिकाणी प्रसिद्ध जैन मंदिर आहे.
- कौंडीण्यपूर हे रुक्मिणी देवी व दमयंती यांचे माहेरघर आहे.
- अमरावती जिल्ह्यातील पूर्णा नदीच्या मैदानी प्रदेशाला “पयनघाट” असे म्हणतात.
- अमरावती मधील आंबा मंदिर खुले व्हावे म्हणून डॉ. पंजाबराव देशमुख यांनी 1928 मध्ये सत्याग्रह केला होता.
- अमरावती येथे पुर्वी उंबराची झाडे मोठ्या प्रमाणात होती उंबराच्या या झाडावरून उंदुबरावती हे अमरावतीचे प्राचीन नाव होते. कालांतराने उंदुबरावतीचे अमरावती हे नाव उदयास आले.
- डॉ. शिवाजीराव पटवर्धन यांची कर्मभूमी, डॉ. पंजाबराव देशमुख, वीर वामनराव जोशी, संत तुकडोजी महाराज व गाडगेबाबा अशा थोर पुरुषांची जन्मभूमी म्हणून अमरावती जिल्ह्याला ओळखले जाते.
- अमरावती विद्यापीठाचे नामकरण संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ असे करण्यात आले.