Ahilyanagar : अहिल्यानगर (अहमदनगर) जिल्हा

Ahilyanagar अहिल्यानगर हा जिल्हा नाशिक प्रशासकीय विभागात येतो. 31 मे 2023 रोजी Ahilyanagar अहमदनगर जिल्ह्याचे नामकरण अहिल्यादेवी नगर करण्याची घोषणा करण्यात आली. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या 298 व्या जयंतीनिमित्त चोंडी जि. अहमदनगर येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घोषणा केली होती. अहमदनगर हा क्षेत्रफळानुसार महाराष्ट्रातील सर्वात मोठा जिल्हा आहे.

क्षेत्रफळ – 17048 चौकिमी

मुख्यालय – अहिल्यानगर

महानगरपालिका – अहिल्यानगर

स्थान व विस्तार – पूर्वेस बीड जिल्हा, अग्नेय-पूर्वेस उस्मानाबाद, आग्नेय-दक्षिणेस सोलापूर, दक्षिण, पश्चिम व नैऋत्येस पुणे जिल्हा, पश्चिमेस ठाणे, उत्तरेस नाशिक व औरंगाबाद जिल्हा.

तालुके(14) – अहमदनगर, अकोले, कर्जत, कोपरगाव, जामखेड, पाथर्डी, पारनेर, राहुरी, शेवगाव, संगमनेर, श्रीरामपूर, श्रीगोंदे, राहता, निवासे.

नद्या – गोदावरी ही प्रमुख नदी तसेच प्रवरा ही गोदावरीची उपनदी याशिवाय भीमा, घोड, सीना, कुकडी.

धरणे – प्रवरा नदीवर भंडारदरा (ता.अकोले) येथे मोठे धरण आहे ते विल्सन बंधारा (आर्थर लेक) या नावाने प्रसिद्ध आहे. धबधबे – धरण परिसरात प्रवरा नदीवर “रांधा धबधबा” व त्यापुढे अम्ब्रेला फॉल्स हे धबधबे आहेत.

संगमस्थळ – टोके (गोदावरी-प्रवरा), नेवासे(प्रवरा-मुळा), सांगवी (भीमा-घोड),संगमनेर (प्रवरा-म्हाळुंगी).

नदीकाठावरील ठिकाणे –  नेवासा-प्रवरा, संगमनेर-प्रवरा, पुणतांबे-गोदावरी, दायमाबाद-प्रवरा, अकोले-प्रवरा.

अभयारण्य – देऊळगाव रेहेकुरी (कळवीट), हरिशचंद्र कळसुबाई, माळढोक.  

प्रमुख पिके – गहू, ज्वारी, बाजरी, भुईमूग, ऊस.

ळे – मोसंबी, डाळिंब, द्राक्ष, श्रीरामपूर ची मोसंबी जगप्रसिद्ध आहे.

खनिज – बॉक्साईट, ॲसबेस्टोस.

शिखर – कळसुबाई, हरिशचंद्रगड, नोणघाट.

गड – हरिशचंद्र, रतनगड, खर्डा, बहादूरगड धर्मवीरगड, पेडगाव,मुंगी.

लेणी – हरिशचंद्र, भातोडी, पळशी, भंडारदरा, टाकळी.

मृदा – नदीकाठी सुपीक मृदा.

औद्योगिक – साखर उत्पादनात अहमदनगरचा राज्यात प्रथम क्रमांक लागतो. इलेक्ट्रॉनिक उद्योग व वाहन उद्योगही अस्तित्वात आहे.

शैक्षणिक – राहुरी येथे महात्मा फुले कृषी विद्यापीठ आहे स्थापना 29 मार्च 1968.

  • खांडके व शाहाजहापूर हे दोन पवनविद्युत प्रकल्प  आहेत.
  • मोहटादेवी येथे रेणुका मताचे मंदिर आहे. 
  • कै. विठ्ठलराव विखे-पाटील यांनी प्रवरा लोणी येथे 1950 साली  देशातील पहिला सहकारी साखर कारखाना सुरू केला.
  • सर्वाधिक साखर कारखाने अहमदनगर जिल्ह्यात आहेत.
  • उसाच्या क्षेत्र व उत्पादनात अहमदनगरचा राज्यात दुसरा क्रमांक आहे.
  • हारीशचन्द्रगड हे आहिल्यानगरचे महाबळेश्वर आहे.
  • प्रवरा नदीकाठी नेवासे येथेच ज्ञानेश्वरांनी “ज्ञानेश्वरी” सांगितली.
  • अहमदनगर येथे  चांद बीबीचा महाल, ऐतिहासिक भुईकोट किल्ला, संरक्षण मंत्रालयाचा वाहन संशोधन विकास विभाग, भिंगार छावणी, कारागृह आहे.
  • आहिल्यानगराचा भुईकोट किल्ला येथे  पंडित जवाहरलाल नेहरू यांनी भारताचा शोध (डिस्कवरी ऑफ इंडिया) हा ग्रंथ लिहिला.
  • राहुरी येथे महात्मा फुले कृषी विद्यापीठ आहे.
  • अकोले येथे अगस्तीऋषींचे आश्रम आहे.
  • शनिशिंगणापूर (ता.नेवासे) येथे प्रसिद्ध शनी मंदिर आहे.
  • हरेगाव (ता.श्रीरामपूर) येथील “सेंट तेरेसा चर्च” महाराष्ट्राचे “जेरुसलेम” म्हणून प्रसिद्ध आहे.
  • राळेगणसिद्धी येथे पारनेर तालुक्यात जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांची कर्मभूमी आहे.
  • नगर तालुक्यात सरपंच पोपटराव पवार यांनी हिवरे-बाजार या गावाला आदर्श गाव बनवले.
  • चौंडी (ता.जामखेड) ही पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची जन्मभूमी आहे.
  • मढी (ता.पाथर्डी) या गावाची “भटक्यांची पंढरी” अशी ओळख आहे. कानिफनाथ महाराज मंदिर आहे. येथील यात्रेतील गाढवांचा बाजार प्रसिद्ध आहे.
  • प्रवरा नदीवर रांधा धबधबा आहे. (170 फूट)
  • राहता तालुक्यात शिर्डी येथे साईबाबांचे प्रसिद्ध मंदिर आहे.
  • कोपरगाव तालुक्यात पुणतांबे येथे संत चांगदेवांची समाधी आहे.
  • पारनेर ही सेनापती बापटांची जन्मभूमी आहे.
  • भंडारदरा हे थंड हवेचे ठिकाण अकोले तालुक्यात आहे.
  • अष्टविनायकापैकी श्री सिद्धिविनायक हा गणपती कर्जत तालुक्यात सिद्धटेक येथे आहे.
  • भंडारदरा हे थंड हवेचे ठिकाण आहे. भंडारदरा येथील “काजवा महोत्सव” प्रसिद्ध आहे.
  • कळसुबाई (उंची 1646 मीटर) हे सह्याद्री पर्वतातील राज्यातील सर्वोच्च शिखर आहे.
  • देऊळगाव रेहेकुरी येथील काळवीट अभयारण्य  कर्जत तालुक्यात आहे.
  • अहमदनगर-सोलापूरच्या सीमेवर नान्नज येथे माळढोक पक्षी अभयारण्य आहे.
  • निघोज (ता.पारनेर) येथे कुकडी नदीपात्रातील “रांजण खळगे” आहेत.  
  • कान्हूर (ता.पारनेर) येथे अधोमूखी व उर्ध्वमुखी लावणस्तंभ आहेत.
  • अहिल्यानगर हा कालव्यांचा व सिंचनाचा जिल्हा आहे.
  • महाराष्ट्रातील सर्वाधिक जिल्ह्यांची(7) सीमा लागणारा जिल्हा आहे.

Leave a comment