Kolhapur : कोल्हापूर जिल्हा

Kolhapur कोल्हापूर जिल्हा हा पुणे प्रशासकीय विभागात येतो. करवीर नगरी तसेच दक्षिण काशी असा Kolhapur कोल्हापूरचा लौकिक आहे.

क्षेत्रफळ – 7685 चौकिमी

मुख्यालय – कोल्हापूर

स्थान व विस्तार – कोल्हापूरच्या पूर्वेस व दक्षिणेस कर्नाटक राज्य, पश्चिमेस सिंधुदुर्ग व रत्नागिरी जिल्हा, ईशान्य उत्तरेस सांगली जिल्हा आहे.

तालुके(12) –  करवीर, कागल, गडहिंग्लज, आजरा, चंदगड, भुदरगड, राधानगरी, गगनबावडा, शाहूवाडी, पन्हाळा, हातकणंगले, शिरोळ.

नद्या – पंचगंगा, कृष्णा, दूधगंगा, वेदगंगा, हिरण्यकेशी, घटप्रभा, वारणा. पंचगंगा ही कुंभी, कासारी, तुळशी, भोगावती, व सरस्वती या पाच नद्यांपासून बनलेली आहे.

धरणे

  • फेजिवडे (ता.राधानगरी) येथे भोगावती नदीवरील राधानगरी धरण(जलाशयसागर),
  • आसगाव (ता.राधानगरी) येथे दूधगंगा नदीवर महाराष्ट्र कर्नाटक यांचा काळमवाडी प्रकल्प आहे. बेबी बोगद्यातून या धरणाचे पाणी दूधगंगेत सोडले आहे.
  • तिल्लारी (ता. चंदगड)येथे गोवा व महाराष्ट्र यांचा तिलारी प्रकल्प (लक्ष्मीसगर)आहे.
  • वारणा नदीवर चांदोली धारण ,
  • आजरा तालुक्यात हिरण्यकेशी धारण हिरण्यकेशी नदीवर आहे.

संगमस्थळे – नृसिंहवाडी(नरसोबाची वाडी) ता.शिरोळ , कुरुंदवाड (कृष्णा,पंचगंगा)

नदीकाठावरील ठिकाणे – कोल्हापूर- पंचगंगा, राधानगरी-भोगावती, कागल-दूधगंगा, इचलकरंजी-हिरण्यकेशी

पिके – भात या प्रमुख पिकाबरोबर ज्वारी, गहू, तंबाखू यांचे उत्पादन होते.

फळपीके – चंदगड तालुक्यात काजू हे प्रमुख फळ आहे.

खनिज संपत्ती – चंदगड तालुक्यात नांगरतास व कासारवाडा येथे, राधानगरी तालुक्यात दुर्गमनवाड येथे तसेच शाहुवाडी तालुक्यात बॉक्साईटच्या खाणी आहेत. बॉक्साइट पासून बेळगाव (कर्नाटक) येथील इंदोर फॅक्टरीत अल्युमिनियम चे उत्पादन केले जाते.

तलाव – रंकाळा, राधानगरी, पाटगाव.

जलविद्युत केंद्र – तिल्लारी (तिल्लारी), राधानगरी(भोगावती), दूधगंगा(दूधगंगा)

गड  –  पन्हाळा, भुदरगड, चंदनगड, विशाळगड, गगनगड, पांडवगड, मनोहरगड, पारगड, सामानगड.

लेणी –  खिद्रापूर, कुंभोज, कोल्हापूर.

औद्योगिक – कोल्हापूर जवळ गोकुळ शिरगाव व पुलाची शिरोळी येथे औद्योगिक वसाहत आहे.

छत्रपती शिवाजी उद्यमनगर ही औद्योगिक वसाहत शहरात मध्यवर्ती ठिकाणी आहे.

कागल येथे नव्यानेच पंचतारांकित औद्योगिक वसाहत सुरू झाली आहे.

फौंड्री व्यवसाय हा कोल्हापुरातील एक प्रसिद्ध उद्योग आहे.

कोल्हापुरी चप्पल ही जगप्रसिद्ध आहे.

इचलकरंजी येथील सूतगिरणी आशियातील पहिली सूतगिरणी आहे.

प्रमुख ठिकाण

  • कोल्हापूर – पंचगंगेच्या काठावरील शहर आहे व महाराष्टाची ऐतिहासिक राजधानी आहे. महालक्ष्मी (अंबाबाई) मंदिर, रंकाळा तलाव, शाहूपुरी गुळाची बाजारपेठ, मोतीबाग तालीम, खासबाग कुस्ती आखाडा, चित्रनगरी, न्यू पॅलेस, जयप्रभा व शालिनी स्टुडिओत चित्रपटाचे चित्रीकरण, शिवाजी विद्यापीठ, चंद्रकांत मांडरे कलादालन, सिद्धगिरी ग्रामजीवन संग्रहालय (कणेरीवाडी)
  • पन्हाळा – हे थंड हवेचे ठिकाण.
  • वाडी-रत्नागिरी (ता.पन्हाळा) येथे ज्योतिबा देवस्थान.
  • नरसोबाची वाडी (नृसिंहवाडी) – कृष्णा-पंचगंगा संगम, दत्ताचे देवस्थान.

प्रमुख साखर कारखाने – शाहू सहकारी साखर कारखाना (कागल), दूधगंगा-वेदगंगा (बिद्री), कुंभी-कासारी (कुडित्रे), पंचगंगा (गंगानगर, ता.हातकणंगले), वारणा (वारणानगर), दत्त (शिरोळ), राजाराम (कसबा बावडा), दौलत (हलकर्णी, ता. चंदगड) व गडहिंग्लज तालुका सहकारी साखर कारखाना.

दूध संघ – गोकुळ शिरगाव (ता.करवीर) येथील गोकुळ दूध प्रकल्प.

शैक्षणिक – शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर(1962), गारगोटी (ता. भुदरगड) येथे मौनी विद्यापीठ.

  • नृसिंहवाडी येथे दर बारा वर्षांनी श्रावणात ‘कन्यागत महापर्वकाळ’ संपन्न होतो. 12 ऑगस्ट 2016 रोजी उत्सव संपन्न झाला. गुरु ग्रहाने कन्या राशीत प्रवेश केल्यानंतर हा उत्सव सुरू होतो.
  • खिद्रापूर (ता. शिरोळ) येथील प्राचीन कोपेश्वर मंदिर प्रसिद्ध आहे.
  • कुंभोज (ता. हातकानंगले) येथे जैन धर्मियांचे “1008 भगवान बाहुबली” हे तीर्थक्षेत्र आहे.
  • चंदगड जवळील किल्ले पारगड ही प्रसिद्ध पर्यटन स्थळे आहेत.
  • इचलकरंजी हे शहर यंत्रमाग उद्योगामुळे “महाराष्ट्राचे मँचेस्टर” म्हणले जाते.
  • हुपरी (ता.हातकणंगले) येथे चांदी व्यवसाय आहे.
  • कोल्हापूर शहरात “गुजरी” ही सराफी पेढी आहे.
  • शाहूवाडी तालुक्यात आंबा येथे ‘पोलसन इंडिया लिमिटेड’ या कारखान्यात जंगली हिरड्या पासून टॉनिन बनवले जाते.
  • राधानगरी तालुक्याची “धरणांचा तालुका” अशी ओळख आहे.
  • राज्यात दुध उत्पादनात आघाडीवर असणारा जिल्हा कोल्हापूर आहे.
  • कोल्हापूरमधील शाहूपुरी येथे गुळ संशोधन केंद्र आहे.
  • कोल्हापूरला गुळाचा जिल्हा म्हणतो.
  • “छप्परबंद” हि बोलीभाषा कोल्हापूरमध्ये बोलली जाते.
  • कोल्हापूर फेटा, चपला, पैलवान, गुळ इत्यादी बाबींसाठी प्रसिद्ध आहे.

Leave a comment