Parabhani Jilha : परभणी जिल्हा

Parabhani Jilha परभणी जिल्हा छ. संभाजीनगर या प्रशासकीय विभागात येतो.

मुख्यालय – परभणी

महानगरपालिका – परभणी

क्षेत्रफळ – 6251 चौकीमी

स्थान व विस्तार – परभणीच्या पूर्वेस नांदेड, पश्चिमेस बीड व जालना, नैऋत्यस बीड, ईशान्येस हिंगोली

तालुके(9) – परभणी, पाथ्री, पालम, पूर्णा, जिंतूर, गंगाखेड, सेलू, सोनपेठ, मानवत.

नद्या – गोदावरी ही मुख्य नदी. पूर्णा, दुधना, कापरा, धोंड, मुदगल या इतर नद्या.

संगमस्थळ कोठेश्वर (गोदावरी-पूर्णा), हट्टागाव (पूर्णा-दुधना).

धरणे – सिद्धेश्वर (पूर्णा नदीवर), कापरा (कापरा नदीवर), लोअर दुधना.

नदीकाठावरील ठिकाण – गंगाखेड (गोदावरी), पालम (पूर्णा), सोनपेठ (वान)

जलविद्युत केंद्र – येलदरी

तलाव – आळंद, मासोळी

डोंगररांगा –  अजिंठा-बालाघाट

लेणी – जिंतूर, बामणी

पिके – ज्वारी हे प्रमुख पीक आहे. परभणी जिल्ह्याला ज्वारीचे कोठार म्हणतात. 2019 मध्ये ज्वारीची नवीन जात विकसित करण्यात आली “परभणी शक्ती”.

मृदा – जिल्ह्यात रेगुर मृदा आढळते. जी ज्वारीसाठी उपयुक्त आहे.

शैक्षणिक – डॉ. वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी (18 मे 1972).

  • परभणी हे मनमाड-काचीगुडा लोहमार्गावरील प्रमुख जंक्शन आहे.
  • परभणी येथे छत्रपती शिवाजी उद्यान, हजरत शाह ताराबुल-हक दर्गा, रोशनखान गढी, प्रभावती मंदिर आहे.
  • जिंतूर येथे गुहेतील जैन शिल्पकला प्रसिद्ध आहे.
  • गंगाखेड गोदावरीकाठी आहे. याला “दक्षिण काशी” असे म्हणतात. हे संत जनाबाईचे जन्मस्थळ आहे.
  • मुदगल नदीतील मुदगलेश्वर मंदिर आहे.
  • मानवत येथे कापडाची व्यापार पेठ आहे.
  • जिंतूर तालुक्यात चारगणा येथे दगडी झुलता मनोरा आहे.
  • पालम तालुक्यात गोदावरी पात्रात “जांभुळबेट” आहे. जांभुळबेट मोरासाठी प्रसिद्ध आहे
  • जिंतूरजवळ नेमगिरी हे जैनतीर्थ क्षेत्र आहे. येथे 22 वे तीर्थकर “नेमिनाथ” यांची मूर्ती आहे.
  • परभणी येथील श्री पारदेश्वर मंदिर प्रसिद्ध आहे.
  • श्री पारदेश्वर मंदिर येथे भारतातील सर्वात मोठे मृत्युंजय महादेव शिवलिंग आहे.
  • कुलपाख या ठिकाणी जैन धर्मियांचे प्रसिद्ध मंदिर आहे
  • पेडगाव येथे पिंगळेश्वराचे मंदिर आहे.
  • पाथरी हे साईबाबा यांचे जन्मगाव आहे.
  • परभणी शहराचे जुने नाव प्रभावतीनगर असे होते.
  • अजिंठा डोंगररांगांना उत्तर भागात “जिंतूर टेकड्या” म्हणतात.
  • मराठवाड्यातील मध्यवर्ती जिल्हा परभणी आहे.
  • परभणी जिल्ह्यातील “गोंधळ” या लोककलेला साता समुद्रापार राजाराम कदम यांनी प्रसिद्धी मिळवून दिली.

Leave a comment