Ashakar failure : असहकार चळवळीच्या अपयशाची कारणे

  • Ashakar failure फेब्रुवारी 1922 मध्ये चौरी चौरा दुर्घटनेनंतर महात्मा गांधींनी मोहीम संपवण्याचा निर्णय घेतला.
  • उत्तर प्रदेशातील चौरी चौरा येथे पोलीस आणि आंदोलन आंदोलकांमध्ये झालेल्या चकमकीदरम्यान हिंसक जमावाने पोलीस स्टेशनला आग लावली.
  • त्यात 22 पोलीस अधिकारी ठार झाले. अहिंसेच्या माध्यमातून जनता सरकार पाडण्यास तयार नाही असे सांगून गांधीजींनी हे आंदोलन थांबवले.
  • इतक्या मोठ्या देशव्यापी आंदोलनामध्ये स्थानिक जनतेने शिस्त राहणे अवघड होते आणि तशा स्वरूपाचे प्रशिक्षण जनतेला नव्हते आणि सरकारच्या दडपशाही विरुद्ध जनता प्रतिक्रिया देत होती. या सर्व गोष्टींचा विचार करून ही चळवळ थांबवण्यात आली.
  • असहकार चळवळीतील महत्त्वाचा ठराव होता की. शासनाने दिलेल्या पदव्या मानसन्मान यांचा त्याग करावा. कायदेमंडळाच्या निवडणुकांवरती बहिष्कार घालावा. पण सर्वांनीच या ठरावाची अंमलबजावणी केली नाही.
  • भारतातील सर्व सुशिक्षितांनी सरकारची असहकार पुकारला असता तर एका वर्षात स्वराज्य मिळाले असते.
  • पण मोठ्या प्रमाणात लोकांनी सरकारी शाळेतून मुलांना बाहेर काढले नाही, वकिली सोडली नाही, स्वदेशी वस्तूंचा वापर केला नाही,काहीजणांनी निवडणूक लढवली त्यामुळे असहकार चळवळीला अपयश आले.

Post Comment

You May Have Missed