Ashakar Chalval features : असहकार चळवळीची वैशिष्ट्ये
- Ashakar Chalval features असहकार चळवळ मुळात भारतातील ब्रिटिश सरकार विरुद्ध शांततापूर्व आणि अहिंसक निषेध होता.
- निषेध मधून भारतीयांना त्यांच्या पदव्या सोडून देण्यास आणि स्थानिक स्वराज्य संस्थांमधील नामनिर्देशित जागांवरून राजीनामा देण्यास सांगण्यात आले.
- लोकांना त्यांच्या सहकारी नोकऱ्यांमधून राजीनामा देण्यास सांगण्यात आले.
- लोकांना त्यांच्या मुलांना सरकारी नियंत्रित किंवा अनुदानित शाळा आणि महाविद्यालयातून काढून घेण्यास सांगण्यात आले.
- लोकांना परदेशी वस्तूंवर बहिष्कार टाकून फक्त भारतीय बनावटीच्या वस्तू वापरण्यास सांगण्यात आले.
- लोकांना विधान परिषदेच्या निवडणुकांवर बहिष्कार टाकण्यास सांगण्यात आले.
- लोकांनी ब्रिटिश सैन्यात सेवां न करण्याचे ठरवले.
- काँग्रेसने स्वराज्याची मागणी केली. मागण्या पूर्ण करण्यासाठी केवळ पूर्णपणे अहिंसक मार्गाचा वापर केला जाईल असे सांगितले.
- असहकार चळवळ ही स्वतंत्र चळवळीतील एक निर्णायक पाऊल होती. कारण पहिल्यांदाच काँग्रेसने स्वराज्य मिळवण्यासाठी संवैधानिक मार्गाचा त्याग करण्यास सांगितले. जर ही चळवळ पूर्णत्वास गेली तर एक वर्षात स्वराज्य मिळेल असे गांधीजींनी आश्वासन दिले होते.
- असहकार चळवळीत स्वदेशी वस्तूंचा पुरस्कार, स्वदेशी उद्योगधंद्यांना उत्तेजन, सुतकताई, खादीचा वापर, हिंदू-मुस्लिम एक्य निर्माण करणे, अस्पृश्यता नष्ट करणे, दारूबंदीचा प्रचार करणे इत्यादी उपक्रम हाती घेतले.
- असहकार चळवळ संपूर्ण देशभर पसरली होती. हजारो लोक पोलीस लाठीकाठी, तुरुंग किंवा बंदुकीची गोळी याला न घाबरता चळवळीमध्ये सामील झाले होते. ब्रिटिश सरकारने मात्र ही चळवळ दडपून टाकण्याचा कसोटीने प्रयत्न केला. चौरी-चौरा येथील घटनेमुळे असहकार चळवळ थांबवली गेली.
- असहकार चळवळ फक्त शहरी किंवा मध्यमवर्गीय लोकांपुरती मर्यादित न राहता ती देशाच्या सामान्य लोकांपर्यंत जाऊन पोहोचली. खेड्यापाड्यातील जनता उत्साहाने या चळवळीत सहभागी झाली. निष्ठावान कार्यकर्ते मिळाल्यामुळे या चळवळीचे बळ वाढले.
- असहकार चळवळीमध्ये सामान्य माणसांनी सहभाग घेतल्यामुळे तुरुंगवासाची, लाटांची व बंदुकीच्या गोळीची भीती नाहीशी झाली होती. हजारो माणसे लाटा खात तुरुंगात जात होते. बंगाल सारख्या प्रांतात तुरुंग भरून गेले व कॅम्प ही भरून गेले. तेव्हा त्यांना सोडून देण्यात आले. सत्याग्रहींशी कसे वागावे हे सरकारला कळेनासे झाले हा या चळवळीचा मोठा विजय होता.
- आतापर्यंत राष्ट्रसभेने ज्या सुधारणांची राष्ट्रीय पातळीवरून मागणी केली होती त्यामध्ये स्वराज्य हे महत्त्वाचे ध्येय होते. या मागणीने राष्ट्रीय चळवळीत एक नवचैतन्य निर्माण झाले. या चळवळीमुळे अनेक नेते कार्यकर्ते तयार झाले.
Post Comment