1857 cha uthav :1857 च्या उठावाच्या अपयशाची कारणे
1857 cha uthav उठावाचे क्षेत्र मर्यादित
1857 चा उठाव सर्व भारतात एकाच वेळी झाला नाही. दिल्ली, आयोध्या, बिहार, मध्यप्रदेश, बुंदेलखंड इत्यादी प्रदेशात या बंडाचा फायदा झाला. नर्मदेच्या दक्षिणेकडे मोठ्या प्रमाणात उठाव झाला नाही. या उठावाचे क्षेत्र मर्यादित होते. मध्य व पूर्व बंगाल शांत राहिला. शिंदे, होळकर तसेच हैदराबाद इत्यादी भागाचे संस्थानिक इंग्रजांशी एकनिष्ठ राहिले. पंजाबी, शीख व गोरखे यांनी इंग्रजांना पाठिंबा दिला त्यामुळे देशाचा काही भागच या उठावात गुंतला होता. त्यामुळे इंग्रजांनी आपली शक्ती उत्तरेस एकवटून हा उठाव दडपून टाकला.
योग्य नेतृत्वाचा अभाव
या उठावात योग्य नेतृत्वाचा अभाव होता. अन्यथा हा उठाव यशस्वी होऊ शकला असता. इंग्रजांकडे सेनापती हे अत्यंत हुशार व अनुभव होते. हिंदी सैनिकात अनेकांनी शिपायांचे नेतृत्व स्वीकारले परस्परांना सहकार्यही केले मात्र, यामधून सर्वसामान्य नेतृत्व तयार होऊ शकले नाही. क्रांतीला योग्य दिशा देण्याची कामगिरी पार पाडणारा नेता पुढे येऊ शकला नाही.
एकाच ध्येयाचा अभाव
या उठावात एकाच ध्येयाचा अभाव होता. 1857 चा उठाव उच्च राष्ट्रीय ध्येयाने प्रेरित होऊन झालेला नव्हता. उठावात समन्वय राखून मार्गदर्शन करणारे एकमुखी नेतृत्व उठाव वाल्यांकडे नव्हते. त्यामुळे उठावात विस्कळीतपणा आला. हिंदी सैनिकांना ब्रिटिशांवरती सूड उगवायचा होता. बादशहा यास आपली बादशाही पुन्हा निर्माण करायची होती तर, नानासाहेब पेशव्यास आपली पेशवाई पुन्हा मिळवायची होती. झाशीची राणी “मेरी झाशी मै नही दूंगी” अशी गर्जना करून मैदानात उतरली होती. सर्व नेत्यांमध्ये एकाच ध्येयाचा अभाव असल्यामुळे उठाव यशस्वी होऊ शकला नाही.
नियोजनाचा अभाव
ब्रिटिशांच्या विरुद्ध उठाव करण्याबाबत नियोजनबद्ध तयारी नव्हती. इतिहासकारांच्या मते 31 मे 1857 ही उठावाची नियोजित तारीख होती. परंतु, तत्पूर्वीच मिरत मधील सैनिकांनी व त्यापाठोपाठ इतर ठिकाणच्या सैनिकांनी उठाव केले. एकाच वेळी नियोजनबद्ध उठाव न झाल्यामुळे इंग्रजांनी उठाव दडपून टाकला. उठाववाल्यात शिस्तीचा अभाव, शस्त्रांची कमतरता होती.
जनतेच्या पाठिंब्याचा अभाव
1857 च्या उठावात सामान्य जनता काही प्रमाणात सहभागी झाली होती. परंतु, ज्या प्रमाणात सामान्य माणसांचा पाठिंबा मिळायला हवा होता त्या प्रमाणात तो मिळाला नाही. उठावाल्यांनी प्रदेश आपल्या ताब्यात आल्यानंतर लुटा लूट सुरू केली. यामुळे सामान्य जनतेची त्यांना सहानभूती मिळाली नाही.
स्वार्थी व फुटीर लोकांची इंग्रजांना मदत
‘फोडा आणि जोडा’ ही ब्रिटिशांची राजकीय नीती होती. या धोरणाचा अवलंब ब्रिटिशांनी केला क्रांतिकारकांच्या हालचाली, त्यांचे डावपेच, सैन्य याबाबतीत माहिती पुरवणाऱ्यांना बक्षीस हे जहागीर देण्याचे धोरण स्वीकारले. दुर्दैवाने स्वार्थापोटी क्रांतिकारकांची माहिती पुरवणारे देशद्रोही तयार झाले. फितुरीमुळे तात्या टोपे सारखे रणधुरंदर सेनानी ब्रिटिशांच्या हाती लागले. उठाव दडपून टाकण्याकरता इंग्रजांनी कोणतेही विधी निषेध न बाळगता भयंकर अत्याचार केले.
लष्करी साहित्यातील तफावत
लष्करी साहित्यांच्या बाबतीत इंग्रज वरचढ होते. त्यांच्याकडे आधुनिक पद्धतीची शस्त्रास्त्रे होती. तर बंड वाल्यांकडे पारंपारिक शस्त्रास्त्रे होती. ब्रिटिशांना शस्त्रे, दारुगोळा यांचा पुरवठा कायम राहिला. शस्त्रास्त्रामधील या तफावतीमुळे इंग्रजांनी केवळ दोन हजार सैन्यानिशी लढून तात्या टोपे यांच्या 20000 फौजेचा पराभव केला.
दळणवळणाच्या साधनातील प्रगती
लॉर्ड डलहौसीने दळणवळणामध्ये अभूतपूर्व क्रांती केली. रेल्वे, तारायंत्र, पोस्ट, रस्ते यांच्या सोय उपलब्ध केल्या. 1857 चा उठाव दडपून टाकण्यासाठी या साधनाचा उपयोग झाला. तारायंत्राच्या द्वारे ठिकठिकाणीच्या बंडाची बातमी त्यांना मिळू शकली. तर रेल्वेद्वारे उठावाच्या ठिकाणी लष्करी कुमक पाठवणे ब्रिटिशांना शक्य झाले.
अनुभवी ब्रिटिश सेनापती
उठावाचे नेतृत्व करणारे नानासाहेब तात्या टोपे, बहादूरशाह, झाशीची राणी हे पराक्रमी व सहासी होते. परंतु रणनीतीत ते मागे पडले. याउलट इंग्रजांकडे असणारे सेनानी हॅवलॉक, कॅम्बेल निलेश हे अत्यंत पराक्रमी अनुभवी होते. त्यांच्या लष्करी हालचाली अत्यंत जलद व नियोजनबद्ध होत्या त्यामुळे त्यांचा विजय झाला.
इंग्लंडची मदत
1857 चा उठाव दडपून टाकण्यासाठी गव्हर्नर जनरल लॉर्ड कॅनिंगने इंग्लंड मधून एक लाख 12 हजारांची फौज आणली. आंतरराष्ट्रीय परिस्थिती ब्रिटिशांना अनुकूल होती. ब्रिटिश साम्राज्यात यावेळी शांतता होती त्यामुळे 857 च्या उठावाकडे बारकाईने लक्ष देऊन हा उठाव दडपून टाकण्यात आला.
Tags
1857 चा उठाव, राष्ट्रीय उठाव, भारताचे पहिले स्वातंत्र्य युद्ध, शिपाई विद्रोह, 1857 cha uthaw, rashtriy uthaw,phile swatantry yuddh,shipai vidroh, 1857 revolt, 1857 ki kranti , 1857 च्या उठावाच्या अपयशाची कारणे, 1857 chya uthawachya upyashachi karane,
Post Comment