- *महाराष्ट्राचा ९० टक्के भूभाग हा भारतीय पठारी प्रदेशाचाच एक भाग असल्यामुळे महाराष्ट्राचे हवामान उष्मीय सोममी प्रकारचे आहेत.
- * कोकण किनारपट्टीचे हवामान सम व दमट असून राज्याच्या पूर्व भागातील हवामान विषम व कोरडे असून दक्षिण कोकणातून उत्तर कोकणाकडे गेल्यावर पावसाचे प्रमाण कमी कमी होत जाते… Maharashtra Climate G.K
- *महाराष्ट्र राज्यात सरासरी वार्षिक पर्जन्यमान १३५ सेमी इतके आहे. महाराष्ट्र राज्याच्या पठारी भागात
- * डिसेंबर आणि जानेवारी महिन्यात सरासरी किमान तापमान १६ से. ते २० से. इतके असते.
- * महाराष्ट्रात नैऋत्य मोसमी वाऱ्यापासून पडणान्या पावसाचे प्रमाण ८५ टक्के आहे.
महाराष्ट्राचे हवामान Maharashtra Climate G.K दृष्ट्या ६ विभाग पडतात ..
१) कोकणचे सागरी हवामान : हे सागरीय सम न या प्रदेशात हवामान असून त्यावर अरबी समुद्राचा प्रभाव आहे. करते. महाराष्ट्र कोकणातील हवामान उष्ण, सम व दमट आहे. येथील हवामानामध्ये वर्षभर वाष्प असल्यामुळे दमटपणा जास्त जागवतो. कोकण किनारपट्टीत अरबी समुद्राजवळ असल्यामुळे हवामान वर्षभर वाष्पयुक्त असते.
२) सह्याद्रीचे हवामान : या प्रदेशातील आकाश बकाळ ढगांनी झाकलेले असते त्यामुळे तापमान कमी अ दक्षिणेकडून उत्तरेकडे पावसाचे प्रमाण कमी होते. येथील उन्ह थंड असतात तर हिवाळे अधिक कडक असतात. हा स जास्त पर्जन्याचा घाटमाथ्याचा विभाग आहे. पावसाचे प्रम ३०० ते ५०० सें.मी. असून प्रदेशाची उंची ६०० ते १५ आहे. सह्याद्री पर्वतरांगेत हवामान आर्द्र व थंड असते. समुद्र सपाटीपासून जसजसे उंच जाये तसतसे हा थंड होत जाते
३) पठारावरील कोरडे हवामान: येथे कोरडे हवामान आढळते. उन्हाळे उबदार व उष्ण असतात. पाऊस जरी कमी असला तरी पावसाचे दिवस जास्त असतात. या पावसाचा उपयोग सुरुवातीच्या खरीप पिकापेक्षा रब्बी पिकांना जास्त होतो. दैनंदिन कमाल सरासरी तापमान ३२ डिग्री सेल्सिअस पेक्षा जास्त असते.
हा अवर्षणाचा खरीप व रब्बी पिकांचा विभाग आहे. हा विभाग दक्षिणेस सांगली व सोलापूरपासून उत्तरेस नंदुरबारपर्यंत पसरलेला आहे. पावसाचे प्रमाण अत्यंत कमी ५० ते ७० सें.मी. आहे व अनिश्चित आहे. येथे मध्यम काळी चुनखडीयुक्त मृदा आहे. संपूर्ण सांगली जिल्हा, सोलापूरचा पश्चिम व मध्यम भाग, पुणे जिल्ह्याचा पूर्व भाग, संपूर्ण अहमदनगर जिल्हा, त्याचप्रमाणे नाशिक, धुळे व नंदुरबार जिल्ह्याच्या पूर्व भागाचा यात समावेश होतो.
४) तापी खोऱ्यातील हवामान (खानदेश) हवामान:
• येथे उन्हाळे अतिशय कडक असतात. हे संक्रमण हवामान वि असून वार्षिक तापमान कक्षा १४ ते १५ डिग्री सेल्सिअस असते. पावसाचे वार्षिक प्रमाण ९० ते १०० सेमी. आहे. तर यात अकोला व अमरावतीचा काही भाग, जळगाव, धुळे व का नंदूरबार यांचा समावेश होतो.
५) पश्चिम विदर्भ (वऱ्हाड) हवामान : येथील उन्हाळे उष्ण व हिवाळे थंड असतात. आर्द्रतेचे प्रमाण ५०% वि असून एप्रिल मध्ये ते २५% पेक्षाही कमी होते. हा मध्यम पर्जन्याचा काळ्या मृदेचा विभाग आहे. पावसाचे प्रमाण ९० ते १२५ सें.मी. आहे. येथे तपकिरी-काळी मृदा आहे. यात नागपूर, वर्धा, यवतमाळ, बुलढाणा या जिल्ह्यांचा, नांदेडचा उत्तर भाग, हिंगोली, परभणीचा पूर्व भाग, वाशिम व अकोल्याच्या दक्षिण भागाचा यात समावेश होतो.खरीप व रबी हंगामात तांदूळ, ज्वारी, बाजरी यांची लागवड करतात.गव्हाचे पीक घेतले जाते. तेलबियांत सोयाबीन, तीळ व जवस महत्त्वाचे आहेत. नागपूरची संत्री प्रसिद्ध आहेत.
६) पूर्व विदर्भ (वर्धा-वैनगंगा खोरे) हवामान: या प्रदेशावर हवामानदृष्ट्या बंगालच्या उपसागरावरील हवेचा परिणाम होतो. मान्सूनच्या दिवसात हवा बरीच थंड असते दृ तर उन्हाळ्यात रात्रीचे तापमान बरेच खाली येते. सप्टेंबर व ऑक्टोबर हे महिने जास्त उकाड्याचे असतात.
जानेवारी-फेब्रुवारी महिन्यात येथे गारांचा पाऊस पडतो. भरपूर पाऊस आणि पावसांच्या दिवसांची भरपूर संख्या यामुळे येथे वनस्पतींचे विपुल वितरण आढळते. वृक्ष हा जास्त पर्जन्याचा तपकिरी मृदेचा विभाग आहे. वन या विभागात पावसाचे प्रमाण १२५ ते १७० सें.मी.आहे.
महाराष्ट्रात प्रमुख तीन ऋतू –
१) पावसाळा:- जुन ते सप्टेंबर
२) हिवाळा :-ऑक्टोबर ते फेब्रुवारी
३) उन्हाळा :- मार्च ते मे
- मे च्या शेवटच्या व जुनच्या पहिल्या आठवड्यात अरबी समुद्रावरून वाहणाऱ्या नैऋत्य मान्सून वान्यापासून राज्यावा पश्चिम किनारी भागात पावसाची सुरूवात होते.
- १ जूनला देशात नैऋत्य मान्सूनचे आगमन केरळ राज्यात होते.
● महाराष्ट्रात सिंधुदूर्ग जिल्ह्यात सर्व प्रथम मान्सून वाऱ्याचे आगमन होते.
- महाराष्ट्रात मोसमी पावसाची सुरूवात ७ जुन पासून होते.
- महाराष्ट्रात दक्षिण-पश्चिम मान्सूनचे आगमन जुनच्या दुस-या आठवडयात होते
- सिंधुदुर्ग जिल्ह्यात अंबोली येथे ७२० सेमी पेक्षा अधिक पाऊस पडतो.
- महाराष्ट्रात पावसाचे दिवस गगनबावडा (१०८ दिवस), महाबळेश्वर (१०३ दिवस), आंबोली (२८ दिवस), . (१९ दिवस सर्वात कमी)
- जानेवारी महिन्यात राज्यात सर्वात कमी तापमान असते. कोल्हापूर जिल्यात गगनबावडा या ठिकाणी सर्वात जास्त दिवस पावसाची नोंद राहते.
- एप्रिल व मे महिन्यात पठारी प्रदेशात तापमान जास्त असते.
- जून ते सप्टेंबर हा पावसाचा कालावधी असतो.
- प्रतिरोध पाऊस :-नैऋत्य दिशेने येणारे मोसमी वारे हे सह्याद्री पर्वत रांगेत अडविले जातात. व सह्याद्रीच्या पश्चिम उतारावर मोठया प्रमाणात पाऊस देतात. त्यानंतर हे वारे पर्वतावर चढतात. व पर्वताच्या वर जास्तीचा पाऊस देतात त्यास प्रतिरोध पाऊस म्हणतात.
- पर्जन्यछायेचा प्रदेश :-सह्याद्री पर्वत पार करून मोसमी वारे सह्याद्रीच्या पूर्वेकडे वाहतात तेका मात्र पावसाचे प्रमाण कमी होते. तो प्रदेश पर्जन्यछायेचा प्रदेश म्हणून ओळखला जातो.
● पर्जन्यछायेच्या प्रदेशात महाराष्ट्रातील सोलापूर, पुणे, अहमदनगर जिल्ह्याचा समावेश होतो.
- ढगफुटीमुळे मुंबई येथे २६ जुलै २००५ रोजी तासात ९९४ मि.मीटर इतका पाऊस पडला.
- कोकणात आव्रतेचे प्रमाण नेहमी जास्त असते कारण कोकणाला समुद्र किनारा लाभला आहे.
● हिवाळ्याच्या कालावधीत आकाश निरभ्र असते.
- महाराष्ट्रात सर्वाधिक पाऊस जुलै महिन्यात पडतो.
- महाराष्ट्रात पडणारा पाऊस हा नैरत्य मान्सून वान्यापासून पडतो.
- पूर्व विदर्भात यवतमाळ , चंद्रपूर, नागपूर, गोंदिया, भंडारा, अमरावती या भागात पडणारा पाऊस ईशान्य मोसमी परतीच्या वाऱ्या पासून पडतो.
- पश्चिम घाटावर सातारा जिल्हा येथे ६०० सेमीच्या आसपास पाऊस पडतो.
- पुणे बारामती येथे ४८ से.मी. पाऊस पडतो. तर त्याच पुणे जिल्ह्यातील लोणावळा येथे ४३० से.मी.नोंद होते.
- पर्जन्याचे प्रमाण पश्चिमेकडून मध्य महाराष्ट्राकडे कमी होत जाते. तर पूर्वेकडून मध्य महाराष्ट्राकडे पर्जन्य कमी होते.
- सातारा जिल्ह्यातील वाई येथे अत्यंत कमी पाऊस पडतो. म्हणून वाई पर्जन्यछायेचे ठिकाण म्हणून ओळखले.
- राज्यात सर्वाधिक पाऊस नैऋत्य मान्सून यान्यापासून पडतो.
- नागपूर येथे दैनिक तापमान कक्षा सर्वाधिक असते.
- कोकण व पश्चिम घाट प्रदेशात सर्वात जास्त पाऊस पडतो.
- अंबोलीला महाराष्ट्राचे चेरापुंजी असे म्हणतात..
- पावसाचा व हिवाळा यांचा दरम्यानचा ऑक्टोबर हा संक्रमणाचा महिना असतो.
- अजून माहितीसाठी वाचा
- मध्य महाराष्ट्रात ३० ते ५० दिवस पाऊस पडतो.
- उन्हाळ्यातील पाऊस:-महाराष्ट्रात एप्रिल व मे महिन्यात अधूनमधून वळवाचा पाऊस पडतो. काही वेळेस ढगांचा गडगडाट व विजांचा कडकडाट होवून वारे वाहतात. त्यामुळे कधीकधी पाऊस पडतो..
- उन्हाळ्याच्या शेवटी मान्सूनपूर्व एप्रिल व मे महिन्यात पडणाऱ्या पावसाला ‘अंबेसरी पाऊस’ म्हणतात
- महाराष्ट्रातील विदर्भ प्रदेशात नैऋत्य मान्सून पायाच्या दोन्ही शाखापासून पाऊस पडतो. पावसाचे प्रमाण पश्चिमेकडून मध्य महाराष्ट्राकडे कमी होत जाते. तसेच पूर्वकडून मध्य महाराष्ट्राकडे पावसाचे प्रमाण कमी होत जाते. पर्जन्यछायेच्या प्रदेशात बाईचा (जि. सातारा) समावेश होतो.
- महाराष्ट्र हवामान दृष्ट्या सर्वात महत्वाचा काळ नेऋत्य मान्सूनचा असतो.
- महाराष्ट्र पठारावरील हवामान कोरडे असतो.
- अवर्षण प्रवेशात रखी ज्वारीचे पिक अधिक चांगल्या प्रकारे येते.
- सह्याद्रीच्या घाट माथ्यावर हवामान आई व दंड प्रकारचे असते.
- ऑगस्ट महिन्यात विदर्भात सर्वात जास्त पाऊस पडतो.