महाराष्ट्रातील वने व त्यांचे उपयोग

  • महाराष्ट्रातील सर्वाधिक वनांचा प्रादेशिक विभाग -विदर्भ
  • महाराष्ट्रातील कमी वनांचा प्रादेशिक विभाग -मराठवाडा
  • महाराष्ट्रातील सर्वाधिक वनांचा प्रशासकिय विभाग -नागपूर
  • महाराष्ट्रातील कमी वनांचा प्रशासकीय विभाग -औरंगाबाद
  • महाराष्ट्रातील सर्वाधिक वनांचे प्रमाण असणारा जिल्हा -गडचिरोली
  • महाराष्ट्रातील सर्वाधिक दुस-या क्रमांकाचा वनांचा जिल्हा -चंद्रपूर
  • महाराष्ट्रातील सर्वात कमी वनांचा जिल्हा (शहरी) -मुंबई शहर
  • महाराष्ट्रातील कमी वनांचे प्रमाण असणारा जिल्हा-लातूर ,उस्मानाबाद

महाराष्ट्रातील वनांचे प्रकार:Types of Forests in Maharashtra

1.उष्ण कटिबंधीय सदाहरीत वने:
उष्ण कटिबंधीय सदाहरीत वने ही ज्या भागात 2०० सेमी पेक्षा जास्त पाऊस पडतो त्या भागात सदाहरित वने आढळतात.
*वनांचे प्रदेश: सहयाद्री पर्वताच्या दक्षिण भागात, सहयाद्रीचा पश्चिम उतार जास्त पावसाच्या घाटमाथा येथे ही वने आढळतात. सिंधुदुर्ग, रत्नागिरी व सातारा जिल्हयातील महाबळेश्वर येथे ही वने आढळतात.
*वनांची वैशिष्टे: या भागात अनेक प्रकारचे वृक्ष असल्याने ही वने वर्षभर हिरवी दिसतात, म्हणून त्यांना सदाहरीत
वने असे म्हणतात. या वनातील वृक्षांची उंची साधारण ४५ ते ६० मी . असते . या वनात वृक्षांची विविधता जास्त आढळते. या प्रदेशातील वृक्षांना फांदया व पाने जास्त असतात.तसेच या वृक्षाचे लाकूड जड असते.
*वृक्षांचे प्रकार- अंजन, आंबा, पिसा, नागचंपा, फणस, जांभुळ, तेलताड इ. प्रमुख वृक्ष तसेच वेत व बांबू सा वनस्पती आढळतात. उष्ण कटिबंधीय सदाहरीत वने आर्थिक दृष्ट्या महत्वाची नसतात.

२) उष्ण कटिबंधीय निमसदाहरीत वने:
उष्ण कटिबंधीय निम सदाहरीत वने ही २०० सेमी पेक्षा कमी पावसाच्या प्रदेशात तसेच वार्षीक सरासरी तापमान २० अंश ते ३० अंश से. असलेल्या प्रदेशात ही वने आढळतात.

  • वनांचे प्रदेश : ही वने राज्यात सिंधुदुर्ग ,रत्नागिरी ,ठाणे जिल्ह्याच्या पूर्व भागात व कोल्हापूर, सातारा, पुणे जिल्ह्याच्या पश्चिम भागात ही वने आढळतात.
    *वनांचे स्वरुप: ही वने रुंदपर्णी असतात. या प्रदेशात वनस्पतीची विविधता आढळते. झाडांची पाने रुंद असून लाकूड कठीण असते. ही वने एकसलग नसतात व उंच वाढलेली नसतात. वृक्षाची उंची 20 ते ३० मी. असते . वने वर्षभर हिरवी नसतात.
    *वृक्षांची नावे :नारळ, सुपारी ,आंबा,किंजल ,साल ,साग ,कुसुम, अंजन,हिरडा ,बेहडा ,कदंब , बिबला , ऐन इ. वनस्पती आढळतात .
    *वनांचे उपयोग- उष्ण कटिबंधीय निमसदाहरित वने ही आर्थिक दृष्टया महत्वाची आहेत. या वनस्पतीच्या लाकडाचा उपयोग शेती अवजारे,घरबांधण्यासाठी होतो .झाडांची पाने, फुले ,फळे यांचा उपयोग वन औषधी घटक म्हणून केला जातो.
  • ३) उपउष्ण कटिबंधीय सदाहरित वने:
    ही वने सह्याद्री पर्वत रांगेच्या १२००मी.पेक्षा जास्त उंचीच्या प्रदेशात आढळतात . उहाला कडक व हिव्हाला थंड अशा प्रदेशात हि वने आढळतात . पूस ३५०सेमी . ते ४५०सेमी . असते.
    *वनांचे प्रदेश : अस्त्भा डोंगर ,सातपुडा (नंदुरबार),गाविलगड टेकड्या (अमरावती), भीमाशंकर, महाबळेश्वर, पाचगणी.
  • वनांचे स्वरूप :वृक्षाचे लाकूड मऊ असते . अनेक प्रकारची वृक्ष वेळी या भागात असतात. त्यामुळे ती हिरवी दिसतात. वृक्षाची विविधता या ठिकाणी जास्त असते.
    *वृक्षाची नावे : अंजन, जांभूळ ,बेहडा, हिरडा, आंबा ,करवी ,शेंदरी, काटेकवट, तेजपान ,लव्हेंडर इ.
  • वनांचे उपयोग: वन औषधी तयार करणे ,मध गोळा करणे .

४. उष्ण कटिबंधीय आर्द्रपानझडी वने :
उष्ण कटिबंधीय आर्द्र पानझडी वने ही साधारणपणे सरासरी तापमान २० अंश ते ३० अंश से. दरम्यान असलेल्या प्रदेशात वने आढळतात. उष्ण कटिबंधीय पानझडी वनांना मोसमी वने असे म्हणतात.
*वनांचे प्रदेश :उष्ण कटिबंधीय आर्द्र पानझडी ही पूर्व विदर्भातील भंडारा ,गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर तसेच नाशिक, पुणे, कोल्हापुर, धुळे,अमरावती, नंदुरबार या जिल्हयात आढळतात.

  • वनांचे स्वरुप :ही वने पावसाळ्यात वाढतात व उन्हाळयाच्या सुरुवातीला पाने गळतात. या वनांमधील वृक्षामध्ये विविधता आढळते. झाडांची उंची ३० ते ४० मी . असते.
  • वृक्षांचे नावे :कांचन, साल, साग, चंदन, पळस, कुसुम, अर्जुन, हिरडा, वड, शिसव, धावडा इ. वनस्पती आढळतात.
    *वनांचे उपयोग: पानझडी वने आर्थिक दृष्टीकोनातून महत्वाची असतात. या वृक्षापासून डिंक, लाख, मद्य, फळे तेंदुची पाने व औषधासाठी उपयोग होतो. ५. उष्ण कटिबंधीय शुष्क पानझडी वने:
    उष्ण कटिबंधीय शुष्क पानझडी वने तीव्र उन्हाळा असणार्या व जास्त तापमानाच्या व कमी पर्जन्याच्या प्रदेशात आढळतात . ही वने साधारणपणे ५० ते १०० सेमी पावसाच्या प्रदेशात तसेच सरासरी ३५ अंश ते ४० अंश से. तापमानाच्या प्रदेशात ही वने आढळतात.
    *वनांचे प्रदेश: उष्ण कटिबंधीय शुष्क पानझडी वने राज्यात जळगाव, धुळे, बुलढाणा ,अमरावती ,नागपूर ,भंडारा ,गोंदिया ,अकोला इ. जिल्हयात आढळतात.
    *वनांचे स्वरूप :या प्रदेशात झाडांची उंची कमी असते .वने अतिशय विरळ असतात .तसेच या प्रदेशातील वने एकाच जातीची नसतात.
  • उदा. पळस ,बेल ,अंजन ,शिसव ,साग ,खैर ,आंबा ,तेंदू इ .वृक्ष आढळतात .

5.उष्ण कटिबंधीय काटेरी वने :
उष्ण कटिबंधीय काटेरी वने ५० सेमी पेक्षा कमी पावसाच्या प्रदेशात आढळतात .
*वनांचे प्रदेश :या प्रदेशात उन्हाळे अति कोरडे असतात .सामान्यपाने हि वने सह्याद्रीच्या पूर्वेकडील राज्याच्या पर्जन्यछायेच्या प्रदेशात या प्रकारची वने आढळतात .अहमदनगर ,पुणे ,सांगली ,सातारा,या जिल्ह्यात हि वने आढळतात .

  • वनांचे स्वरुप: वनस्पतींना पोषक हवामान नसल्याने त्यांची पुरेशी वाढ होत नाही. या वनस्पती खुरटया व काटेरी
    असतात. उन्हाळयात या झाडांची पाने गळतात. या वृक्षांची पाने व साली जाड असतात. व त्यांची मुळे जमीनीत
    खोलवर जातात. त्यामुळे ती उन्हाळ्यात ही तग धरून राहतात.
  • उदा- बाभुळ, बोर, निंब , चिंच, साग, खेर, खैर, हिरडा, निवडुंग इ. वृक्ष या वनांत आढळतात.
  • वनांचे उपयोग :बाभुळ, निंब यांच्या लाकडाचा उपयोग शेती अवजारे तयार करण्यासाठी तर सालीचा उपयोग कातडी कमावण्यासाठी केला जातो. कोरेंड औषधी म्हणुन उपयुक्त आहे.

६. खारफुटीची वने:
महाराष्ट्र राज्याच्या किना-यालगतच्या भागात भरती व ओहोटीच्या पाण्याच्या पातळीच्या दरम्यान तसेच खाडयांच्या मुखाशी दलदलयुक्त भुमीवर असलेल्या वनांना खारफुटीचे वने म्हणतात.

  • वनांचे प्रदेश: ही वने महाराष्ट्राच्या पश्चिम समुद्र किना-यालगत रत्नागिरी, सिंधुदुर्ग, ठाणे, रायगड, पालघर, या जिल्हयाच्या किना-यावर आढळतात.
    *वृक्षांची नावे : या प्रदेशात चिंपी, मारंडी, कांदळ व तिवर जातीच्या वनस्पती आढळतात. ही वने किना-यावर घनदाट
    असतात. या वनांची उंची कमी असते तसेच ही वने फारशी महत्वाची नसतात.
  • वनांचे उपयोग :लाकूड हलके असल्यामुळे व पाण्याच्या संपर्कात वाढल्यामुळे होड्या व बोटी तयार करण्यासाठी लाकडाचा वापर होतो .
  • महाराष्ट्र राज्यात चंद्रपुर व गडचिरोली जिल्हयात पूर्व भागातील वनांना आल्लापल्ली वने असे म्हणतात.
    *महाराष्ट्रात खंडाळा, महाबळेश्वर, या ठिकाणी समशितोष्ण पर्वतीय वने आढळतात.
    वनांचे उपयोग :
  • वनांचे उपयोग- कागद निर्मिती, तेल सुगंधी तेल, सावण, विडी निर्मिती, फर्निचर, इमारतीचे लाकुड, कागदाचा लगदा, चटई, टोपल्या, खोकी, लाख, डिंक, अर्क, कात निर्मिती, मद्य, इंधन, जहाज बांधाणी, दोरखंड, औषध निर्मिती, राळ निर्मिती, कंदमुळे फळे, फुले, बाष्प निर्मिती, मृदा संवर्धन, हवा शुद्धीकरण, पुर नियंत्रण, काडीपेटी, मेन, पशु व पक्षांचा निवारा व पृथ्वीचे तापमान संतुलन इत्यादीसाठी वन संपत्तीचा मोठया प्रमाणात उपयोग होतो..

वृक्षांचे उपयोग :

  • बांबू -कागद निर्मिती, टोपल्या, चटई
  • निलगिरी-कागद निर्मिती
  • खैर-कात निर्मिती
  • शिकेकाई शेंगा-साबण व तेल निर्मिती
  • तेंदुची पान- विडी निर्मिती
  • वड-पिंपळ-लाख निर्मिती (लाखेचा उपयोग दागिने तयार करण्यासाठी)
  • सेमल पॉपलर वृक्ष-आगपेटीतील काडी
  • खाजण वनस्पती-इंधनासाठी
  • आपटा अंजन- विडया निर्मिती
  • कुसुम -दोरखंड निर्मिती
  • हिरडा -टॅनिन निर्मिती
  • तंतु वनस्पती-दोरखंड तयार करण्यासाठी
  • रोशा गवत- सुवासिक तेल व साबण
  • बाभुळ, खैर, निंब- डिंक निर्मिती
  • साली वृक्ष -राळ औषधासाठी
  • सागवान-फर्निचर निर्मिती
  • साल- इमारती व फर्निचर
  • निलगिरी तेल- औषधी व सौदर्य प्रसादने
  • सिंट्रोलीना गवत- तेलनिर्मीती

Leave a comment