● भारतातील पहिले राष्ट्रीय उद्यान -१९३१ मध्ये उत्तराखंड राज्यात स्थापन झाले असुन ते सध्या जिम कार्बेट राष्ट्रीय
नावाने ओळखले जाते.
● संपूर्ण देशात लोकरंजनासाठी व आनंदासाठी प्राणी पक्षी, वनस्पती व अन्य वन्यजीवांचे स्वतंत्रपणे रक्षण व्हावे यासाठी केंद्र शासनाने राखून ठेवलेल्या प्रवेशाला राष्ट्रीय उद्यान असे म्हणतात. राष्ट्रीय उद्यानात सर्व प्रकारच्या वन्यजीवांचे रक्षण केले जाते.
महाराष्ट्रातील राष्ट्रीय उद्यानांची संख्या ६ आहे.
1.ताडोबा राष्ट्रीय उद्यान :
चंद्रपूर जिल्ह्यातील हे महाराष्ट्राचे पहिले राष्ट्रीय उद्यान आहे .
उद्यानाची स्थापना १९५५ मध्ये झाली आहे.
याचे एकूण क्षेत्रफळ ११५.१४ चौ .किमी .इतके आहे .
ताडोबा अभयारण्यात वाघ ,बिबटे ,नीलगाय ,सांबर ,चितळ ,चिंकारा इ .वन्यप्राणी आढळतात .
सर्व प्राण्यांमध्ये वानरे व माकडांची संख्या जास्त आहे . गरुड ,ससाणा, करकोचा ,भारद्वाज ,मोर इ, पक्षी आढळतात .
2.नवेगाव राष्ट्रीय उद्यान :
सातपुडा पर्वत रांगेत हे राष्ट्रीय उद्यान आहे .
हे उद्यान गोंदिया जिल्ह्यात आहे .
या उद्यानाची स्थापना १९७२ मध्ये झाली .
याचे एकूण क्षेत्रफळ १३३.८८ चौ .किमी . आहे.
या अभयारण्यात नवेगाव नावाचे एक विशाल सरोवर आहे .याचा सारा परिसर घनदाट जंगलाने व्यापलेला आहे .
हिव्हाळ्यात अनेक पाहुणे पक्षी या सरोवरात उतरतात .नवेगाव सरोवरात अनेक प्रकारचे लहान मोठे मासे आढळतात .या सरोवरात पाणमांजरीचे अस्तित्व आढळते . या उद्यानात वाघ ,बिबट्या ,अस्वल ,तरस ,सांबर ,नीलगाय ,रानडुक्कर ,माकडे ,साप ,पट्टेरी मण्यार आढळतात .
३.पंडित जवाहरलाल नेहरू राष्ट्रीय उद्यान ,पेंच :
हे उद्यान नागपूर जिल्ह्यात आहे .
या उद्यानाची स्थापना १९८३ मध्ये झाली .
याचे एकूण क्षेत्रफळ २५९.७१ चौ .किमी. आहे .
या उद्यानात वाघ ,बिबटे ,रानम्हशी ,सांबर ,चितळ ,नीलगाय ,चिंकारा इ .वन्य प्राणी आढळतात .
४. संजय गांधी राष्ट्रीय उद्यान :
हे उद्यान मुंबई उपनगर ठाणे जिल्ह्यात आहे .
या उद्यानाची स्थापना १९६९ मध्ये झाली .
याचे एकूण क्षेत्रफळ ८६.९८५ चौ .किमी. इतके आहे .
हे महाराष्ट्रातील सर्वात लहान राष्ट्रीय उद्यान आहे .
या उद्यानात रानमांजर , बिबटे ,मिन्गुस , अस्वल हे प्राणी आहेत .
५. चांदोली राष्ट्रीय उद्यान :
हे उद्यान सांगली जिल्ह्यात आहे .
या उद्यानाची स्थापना २००४ मध्ये झाली .
याचे एकूण क्षेत्रफळ ३१७.६७ चौ . किमी . आहे .
हे महाराष्ट्रातील सर्वात मोठे राष्ट्रीय उद्यान आहे .
या उद्यानात बिबटे, गवे ,सांबर ,शेखरू ,भेकर , रानडुक्कर इ, प्राणी आढळतात .
६ गुगामल राष्ट्रीय उद्यान :
हे उद्यान अमरावती जिल्ह्यात आहे .
या उद्यानाची स्थापना १९७४ मध्ये झाली .
याचे एकूण क्षेत्रफळ ३६१.२८ चौ .किमी .
हे उद्यान वाघांसाठी आरक्षित करण्यात आलेले आहे .
७. मालवण सागरी राष्ट्रीय उद्यान :
हे महाराष्ट्रातील पहिले सागरी राष्ट्रीय उद्यान आहे .
हे सिंधुदुर्ग जिल्ह्यात आहे .
तर देशातील हे तीसरे राष्ट्रीय उद्यान आहे .