महाराष्ट्र-खनिजसंपत्ती

खनिज संसाधने हे अर्थिकदृष्ट्या अतिशय महत्वाचे भु-पदार्थ आहे . हे जमीनीतून खोदून काढावे लागतात. मुलत: खडक हे खजिनांचे मिश्रण असते त्यामुळे कोणत्याही प्रदेशात कोणतीना कोणती खनिजे असतात. मात्र ही खनिजे विखुरलेली असतात. एखादया खडकात विशिष्ट खनिजांचे प्रमाण जास्त असल्यास त्यांना आर्थिक महत्व प्राप्त होते. खनिजांचे धातु व अधातु असे वर्गीकरण केले जाते.Mineral Resources In Maharashtra

खनिजांचे वर्गीकरण-

  • १) धातु खनिजे : लोह, खनिज, बॉक्साइट, मॅगनीज, सोने, चांदी, शिसे, जस्त इत्यादी.
  • २) अधातू खनिजे : जिप्सम, अधक, हिरा, चुनखडी, डोलामाईट इत्यादी.
  • ३) ऊर्जा खनिजे : दगडी कोळसा, खनिज तेल नैसर्गिक वायु, युरेनियम, थोरियम इत्यादी..
  • महाराष्ट्रातील खनिजांचे वितरण mineral distribution
    महाराष्ट्रात खनिजाचे Mineral Resources In Maharashtra वितरण असमान प्रमाणात आहे. राज्याच्या पुर्व भागात व दक्षिण महाराष्ट्रात खनिज संपत्तीचे साठे मोठया प्रमाणात एकवटलेले आहेत. पूर्व विदर्भात यवतमाळ, नागपुर. गडचिरोली, चंद्रपुर, भंडारा या जिल्हयात खनिज संपत्तीचे साठे मोठया प्रमाणात आहेत. कोकण व दक्षिण महाराष्ट्रात कोल्हापुर, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, पालघर, मुंबई उपनगर वा जिल्हयात खनिज संपत्तीचे साठे आहेत. मुंबईच्या पश्चिमेला अरबी समुद्रात मुंबई हाय येथे खनिज तेल व नैसर्गिक वायुचे साठे आहेत.रत्नागिरीचा समुद्रकिनारा व वसई किना-यावर खनिज तेलाचे साठे आहेत…

१) दगडी कोळसा-
दगडी कोळसा हे प्रमुख ऊर्जा साधन म्हणून वापर केला जातो. महाराष्ट्रात दगडी कोळसा हे महत्वाचे खनिज असून दगडी कोळशाचा वापर खते, रसायन उद्योगात कच्चा माल म्हणून तर रेल्वे वाहतूकीसाठी इंधन म्हणून वापर केला जातो.
दगडी कोळसाचे प्रकार- कार्बनच्या प्रमाणानुसार दगडी कोळशाचे चार प्रकार पडतात.

कोळशाचे प्रकार कार्बनचे प्रमाण (टक्के)

१. अथ्रासाईट कोळसा (८० ते ९०%)
अथ्रासाईट हा उच्च दर्जाचा दगडी कोळसा ,याचा रंग गडद काळा, उष्णतेचे प्रमाण अधिक, पाण्याचे प्रमाण कमी(२.५ %) धुराचे प्रमाण कमी.

२. बिटयुमिनस कोळसा (७५ ते ८५%)

हा कोळसा रंगाने काळा ,जास्त उष्णता, धुराचे प्रमाण कमी , पाण्याचे प्रमाण २५ ते ३० टक्के.

३.लिग्नाईट कोळसा (४५ ते ५५%)

हा कोळसा तपकिरी करडया रंगाचा असून यात पाण्याचे प्रमाण जास्त असते धुराचे प्रमाण जास्त असते.

४. पीट कोळसा (३० ते ४५%)

पीट कोळसा हा निकृष्ट दर्जाचा , पाण्याचे प्रमाण अधिक, कोळसा भुरकट रंगाचा असतो.

● कोळशाचे वितरण : महाराष्ट्रात दगडी कोळशाचे विरतण हे विदर्भात, दक्षिण महाराष्ट्र, कोकण किनारा व अरबी समुद्रात झालेले आहे.

● चंद्रपुर- चंद्रपुर जिल्हयात दगडी कोळशाचे सर्वाधिक साठे आहेत. या जिल्हयात चंद्रपूर, बल्लारपुर, घुघुस (ता. चंद्रपुर), मांजरी (ता. भद्रवती), सास्ती (ता. वरोड) या ठिकाणी दगडी कोळशाच्या खाणी आहेत.

  • यवतमाळ यवतमाळ जिल्हयात दगडी कोळसाचे साठे असुन वणी, उमरेड, मारेगाव, दिग्रस या तालुक्यात दगडी कोळशाच्या खाणी आहेत.

● नागपुर- नागपुर जिल्ह्यात सावनेर वकवान या परीसरात दगडी कोशाचे भरपुर साठे असून जिल्ह्यात उमरेड, पाटणसांगवी , कामठी,सिलेवारा या ठिकाणी कोळशाच्या खाणी आहेत

नागपुरात जिल्ह्यात उमरेड तालुक्यात सापडणारा दगडी कोळसा उच्च प्रतिचा असतो.
याशिवाय वर्धा जिल्ह्यात काही ठिकाणी द्ग्दिया कोळसा सापडतो .
कोराडी, पारस, तुर्भे इत्यादी औष्णिक विद्युत केंद्रांना दगडी कोळसा पुरवला जातो.

२.लोह खनिज
लोह खनिज हे अत्यंत महत्वाचे असुन त्याचा वापर इमारती बांधणी ,यंत्रे , फर्निचरची साधने ,वाहतुकीची साधने ,इलेक्ट्रीकल्स मध्ये लोहखनिजांचा वापर केला जातो. लोह खनिज उद्योगाचा कणा आहे. लोह खनिज निसर्गात अशुद्ध अशा लोह माती स्वरुपात सापडते.
लोहाच्या प्रमाणानुसार हेमेटाईम , सिडेराईट हे खनिजाचे चार प्रकार पडतात.
१. मैग्नेटाइट -७२ ते ७५ % लोह
२.हेमेटाईट – ६० ते 70 % लोह
३.लीमोनईट – ५० ते ६० % लोह
४.सिडेराइट – ४० ते ४५ % लोह
लोह खनिजाचे वितरण :
महाराष्ट्रात चंद्रपुर, गोंदिया, गडचिरोली या जिल्ह्यात लोह खनिजाचे साठे आहेत .तर दक्षिण महाराष्ट्रात सिंधुदुर्ग जिल्ह्यात लोह खनिजाचे साठे आहेत.
चंद्रपुर-बल्लारपुर, घुस, चंद्रपुर (ता. चंद्रपुर), पिपळगांव,असोला , चिमूर (ता. चिमूर ) मांजरी (ता. भद्रावती),
वरोडा (ता वरोडा ) येथे मोठया प्रमाणात लोह खनिजाचे साठे आहेत .
वरोडा तालुक्यात पिळगाव टेकडयात लोह खनिज सापडते .
गडचिरोली गडचिरोली देवळगाव भामरागड, सुरजागड, पडवी, दमकोट भागात लोह खनिज सापडते.
गोंदिया जिल्ह्यातील गोरेगाव तालुक्यात खुर्सीपार व अंबेतलाव येथे लोह खनिज सापडते.
नागपुर-नागपुर जिल्ह्यात भिवापुर परिसरात लोहखनिज सापडते.
कोल्हापुर-कोल्हापुर जिल्हयात राधानगरी व शाहुवाडी तालुक्यात लोह खनिज सापडते.
सिंधुदुर्ग- सिंधुदुर्ग जिल्ह्यात वेंगुर्ला तालुक्यात रेडी, शिरोडा ,टाका, असोली, नानोसा , सावंतवाडी तालुक्यात नळेवाडी, सताडी, कवटाणी, किन्हाळा, ठाकुरवाडी, मातोडा, या परिसरात मोठ्या प्रमाणात लोह खनिजाचे साठे आहेत.
सिंधुदुर्ग जिल्हयात सर्वाधिक लोह खनिजाचे साठे रेडी परिसरात आहेत.
रेडी खाणीतून होणारे लोहखनिजाचे उत्पादन रेडी बंदरातून निर्यात जाते.
चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यात हेमेटाईट जातीचे लोह खनिज सापडतो.
रायगड जिल्हयात काही प्रमणात लोह खनिजाचे साठे आहेत.

३.बॉक्साईट:

बॉक्साईट खनिजापासून अल्युमिनीयम मिळवले जाते. अल्युमिनियम वजनाने हलके व न गंजणारे खनिज आहे. ते उत्तम वीजवाहक आहे. अॅल्युमिनियम तांब्या पेक्षा स्वस्त असते. त्यामुळे त्याचा वापर विद्युतउपकरण तयार करण्यासाठी केला जातो, तसेच मोटारीचे सुटे भाग, विमाने, रेल्वेचे डबे ,खिडक्या , दारे तयार करण्यासाठी केला जातो. तसेच रसायन उद्योग ,तेल शुद्धीकरण, सिमेट लोहपोलाद उद्योगात ॲल्युमिनियम वापरतात.

बॉक्साईटचे वितरण :
बॉक्साईटचे साठे प्रामुख्याने जांभ्या खडकाच्या प्रदेशात आढळतात. सह्याद्रीमधील मधील साठे उच्च दर्जाचे आहेत. महाराष्ट्रातील कोल्हापुर, सांगली, सिंधुदुर्ग, रायगड या जिल्ह्यात बॉक्साईटचे उत्पादन होते.

रत्नागिरी- रत्नागिरी जिल्यात मंडणगड व दापोली तालुक्यात बॉक्साईट खनिजाचे साठे आहेत.
सिंधुदुर्ग- सावंतवाडी तालुक्यात आंबोली येथे बॉक्साईटचे साठे आहेत.
रायगड – रायगड जिल्ह्यात बॉक्साईट हे श्रीवर्धन रोहे , व मरुड तालुक्यात काही प्रमाणात सापडते,
सांगली – सांगली जिल्हातील शिराळा तालुक्यात बॉक्साईट सापडतात .
कोल्हापूर- केरल्हापूर जिल्हयात चंदगड, शाहुवाडी व राधानगरी तालुक्यात बॉक्साईटचे साठे आहेत. कोल्हापुरात उत्पादित होणारे बॉक्साईट कर्नाटकातील बेळगाव येथे असलेल्या अॅल्युमिनियम कारखान्यास पुरविले जाते.

४.चुनखडी

चुनखडी वितरण –
महाराष्ट्रात यवतमाळ, नागपुर, चंद्रपुर, गडचिरोली या जिल्हयात चुनखडीचे साठे आहेत. यवतमाळ-यवतमाळ जिल्हयात राळेगाव, वणी, मालेगाव या तालुक्यात चुनखडीचे साठे आहेत. मालेगाव तालुक्यात मुकुटयन, राळेगाव तालुक्यात गौराळा व वणी तालुक्यात सिंदोला, परमडोह, राजुर या ठिकाणी चुनखडीच्या खाणी आहेत.
नागपुर – नागपुर जिल्हयातील रामटेक, सावनेर, पारशिवणी या भागात चुनखडीचे साठे आहेत. तर नागपूर जिल्ह्यात देवळापार येथे उच्च दर्जाची चुनखडी सापडते.
गडचिरोली – गडचिरोली जिल्ह्यातील आहेरी व सिंरोचा तालीक्यात चुनखडीचे साठे आहेत .

५.मॅगनीज
मॅगनीज धातू हा काळ्या रंगाचा असतो. मॅगनीज व लोह जमिनीमध्ये एकत्र असतात. त्यास फेरा मॅगनीज
म्हणतात, मँगनीज खनिजाच्या एकूण उत्पादनापैकी ९५ टक्के मॅगनीज लोहपोलाद उत्पादनात वापरले जाते. सामान्यपणे एक तन लोह पोलाद उत्पादनासाठी १० किलो ग्रॅम मॅगनीजची आवश्यकता असते.

मॅगनीज उपयोग-
मॅगनीजचा वापर ब्लीचिंग पावडर तयार करण्यासाठी, चिनीमाती मिळवण्यासाठी, रंग जंतुनाशके व बॅटरी उद्योगात मोठया प्रमाणात करतात. तसेच दागिण्यांना डाग देण्यासाठी, कापड उद्योगात , फोटोग्राफी उद्योगात, काडीपेटी उद्योगात, काचेला रंग देण्यासाठी मँगनीजचा वापर केला जातो.

मॅगनीजचे वितरण –
महाराष्ट्रातील मॅगनीजचे प्रामुख्याने उत्पादन विदर्भातील भंडारा, नागपुर, गोंदिया
चंद्रपुर व दक्षिण कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यात घेतले जाते.
देशातील एकूण मॅगनीजच्या साठयापैकी ४० टक्के मँगनीजचे साठे महाराष्ट्रात आहेत.
नागपुर – सावनेर व रामटेक, गुमगाव, कोरेगाव, पारशिवणी या ठिकाणी मँगनीजच्या खाणी आहेत.
भंडारा- तुमसर तालुक्यात सितासांगवी, कुरमोडा, डोंगरी या भागात मँगनीज सापडते.
सिंधुदुर्ग – सिंधुदुर्ग जिल्हयात दोडामार्ग तालुक्यात हिंगणे, नेतर्ड, सासोली, वेंगुर्ले तालुक्यात रेडी व कणकवली
तालुक्यात फोंडा गावाजवळ मँगनीज सापडत.

६.खनिज तेल
खनिज तेलाची निर्मीती कार्बन व हायड्रोजन या मुलद्रव्याने होते. खनिज तेल हे वालुकामय
किंवा चुनखडीच्या प्रदेशात सापडते.
महाराष्ट्रात मुंबईच्या वायव्येस अरबी समुद्रात मुंबई हाय येथे खनिज तेलाचा साठा १९७३ मध्ये सापडला. हा देशातील सर्वात मोठा खनिज तेलाचा साठा असुन याच क्षेत्रात नैसर्गिक वायु देखील मोठया प्रमाणात सापडतो.

३ फेब्रुवारी १९७४ मध्ये बॉम्बे हाय येथे पहिली तेल विहीर खोदली गेली तेल उत्पादन प्रकल्पाचे उपनाव सागर सम्राट हे असून देशातील ५० टक्के तेल साठा या ठिकाणी सापडतो.

१९९१ ला रत्नागिरी जिल्हयाच्या किना-यावर खनिजतेल उत्पादनाला सुरुवात झाली .
रायगड जिल्हयात उरणजवळ समुद्रात खनिज तेलाचे साठे आहेत.
नैसर्गिक वायुचा उपयोग घरगुती इंधन, खत कारखाने व अष्णिक वीज केंद्रात केला जातो. तसेच कृत्रिम रबर तयार करण्यासाठी देखील नैसर्गिक वायू उपयुक्त आहे.

७.तांबे
तांब्याचे वितरण –
महाराष्ट्रात तांब्याचे साठे कमी प्रमाणात असून विदर्भातील चंद्रपुर, गडचिरोली, या जिल्हयात तांबे सापडते.
चंद्रपुर जिल्हयात सर्वाधिक तांबे सापडते.
गडचिरोली जिल्हयात चामोशीजवळ तांब्याचे साठे आहेत. तर नागपूर जिल्हयात काही प्रमाणात तांबे सापडते,

८.कायनाइट
हिऱ्यांनापैलू पडण्याच्या उद्योगात तसेच काच रसायन उद्योगात ,सिमेंट उद्योग इ. ठिकाणी कायनाइटचा उपयोग होतो .महाराष्ट्रातील भंडारा व गोंदिया जिल्हयात कायनाइटचे साठे आढळतात .

९.क्रोमाईट
सिंधुदुर्ग जिल्हयात कणकवली तालुक्यात क्रोमाईटचे साठे जास्त प्रमाणात आहेत . क्रोमाईट या खनिजाचा उपयोग मुख्यत्वेकरून धातुशास्त्रीय उद्योग, उष्णतारोधक वस्तु व रासायनिक उद्योगात केला जातो. या खनिजाचे साठे नागपूर, भंडारा, सिंधुदूर्ग व चंद्रपूर जिल्ह्यांत आढळतात.

१०.सिलिका
सिंधुदुर्ग जिल्हयात, मठ, वालावल, बैतोर, तेडोली, कासार्ड, फोंडा, आचरे, मिठबाव इत्यादी ठिकाणी सिलिकाच्या खाणी आहेत. रत्नागिरी जिल्हयात राजापूर तालुक्यात सिलिकाचे साठे आढळतात.

११.इल्मेनाइट
रत्नागिरी जिल्ह्यातील रत्नागिरी तालुक्यात पूर्णगड ते मालगुंड या समुद्र किनाऱ्यालगत इल्मेनाइट खनिज सापडते .
देशातील एकूण मॅगनीजच्या साठ्यापैकी ४० टक्के मँगनीजचे साठे महाराष्ट्रात आहेत.

इल्मेनाइट- रत्नागिरी जिल्हयातील रत्नागिरी तालुक्यात पूर्णगड ते मालगुंड या समुद्रकिना-यालगत इल्मनाईट खनिज सापडते.

१२.जांभा दगड – सिंधुदुर्ग जिल्हयात जांभा दगड मोठया प्रमाणात आढळतात .
१३.रांगोळी चा दगड – सिरगोली दगड सिंधुदुर्ग जिल्हयात आढळतो.
१४.अभ्रक – सिंधुदुर्ग (कणकवली जालवणी, नाटळ, कुडाळ कडावण) नागपुर, चंद्रपुर जिल्हयात अभ्रकाचे साठे आढळतात.
१५.सिझीयम व व्हॅनेडिअम – भंडारा , गोंदिया इ.
१६.टंगस्टन -नागपुर
१७.बेसाल्ट – हा खडक कोकण व पूर्व विदर्भ वगळता महाराष्ट्रात सर्वत्र आढळतो .
१८.अस्बेस्टॉस – अहमदनगर व पुणे
१९.मीठ
महाराष्ट्रात कोकण किनारपट्टीलगत रायगड, ठाणे ,मुंबईलगतच्या भागात मीठ तयार केले जाते.
मिठाचा उपयोग खाण्याव्यतिरिक्त रासायनिक उद्योगातही केला जातो .
20.डोलोमाईट
डोलोमाईटचे साठे चंद्रपूर, यवतमाळ व नागपूर जिल्ह्यात आढळतात. डोलोमाईट अभिवाह म्हणून लोखंड व पोलाद उद्योगांत, कोळसा खाणीत भुकटी म्हणून तसेच शोभिवंत दगड म्हणून उपयोगात आणतात. डोलोमाईटचे महाराष्ट्रातील अंदाजीत साठे ११२.९ दशलक्ष टन इतके आहेत.
२१.जस्त
जस्तयुक्त खनिजे नागपूर जिल्ह्यातील तांबेखाणी, कोलारी, भवरी इत्यादी गावाचे परिसरात आढळून येत असून क्षेत्रात सुमारे 8.27 दशलक्षटन खनिज साठे अंदाजित करण्यात आले आहेत. जस्त या खनिजाचा उपयोग , अलॉय, रसायने, संरक्षण इत्यादी उद्योग क्षेत्रात करण्यात येते.

Leave a comment