जो शब्द दोन वाक्य किंवा दोन शब्दांना जोडण्याचे कार्य करतो त्या शब्दाला उभयान्वयी अव्यय-Ubhyanwayee Avyay असे म्हणतात.
उदाहरण-
- मला पेन व वही बक्षीस भेटले.
- आईने मला आणि दादाला खाऊ दिला.
उभयान्वयी अव्ययाचे दोन प्रकार पडतात
१)प्रधानत्व सुचक उभयान्वयी अव्यय
२)गौणत्व सुचक उभयान्वयी अव्यय
प्रधानत्व सुचक उभयान्वयी अव्यय:
प्रधानत्व सुचक उभयान्वयी अव्ययाचे एकूण चार प्रकार पडतात.
१)समुच्चय बोधक उभयान्वयी अव्यय:
ज्या उभयान्वयी अव्ययाने आपल्याला दुसऱ्या वाक्यात भर टाकल्याचा अर्थबोध होतो, त्या उभयान्वयी अव्ययाला आपण समुच्चय बोधक उभयान्वयी अव्यय असे म्हणतो.
उदाहरण-
वारा सुटला आणि पावसाला सुरुवात झाली.
२)विकल्प बोधक उभयान्वयी अव्यय:
ज्या उभयान्वयी अव्ययाने आपल्याला विकल्प दाखवण्याचा अर्थबोध होईल, त्या उभयान्वी अव्ययाला विकल्प बोधक उभयान्वयी अव्यय असे म्हणतात.
उदाहरण-
तुला चहा हवा की कॉफी.
तू ये किंवा मी येतो.
३)न्यूनत्व बोधक उभयान्वयी :
पहिल्या वाक्यातील कमी दुसऱ्या वाक्यात दाखवण्यासाठी ज्या उभयान्वयी अव्ययाचा वापर केला जातो, त्याला न्यूनत्व बोधक उभयान्वयी अव्यय असे म्हणतात.
उदाहरण-
त्याने अभ्यास केला परंतु नापास झाला.
जगावे परी कीर्ती रुपी उरावे.
४)परिणाम बोधक उभयान्वयी अव्यय:
एखाद्या वाक्यामध्ये उभयान्वयी अव्यय एखाद्या गोष्टीचा जर परिणाम दाखवण्याचं कार्य करत असेल, तर त्याला परिणाम बोधक उभयान्वयी अव्यय असे म्हणतात.
उदाहरण-
तो आजारी होता म्हणून शाळेत गेला नाही.
त्याला दवाखान्यात जायचे होते म्हणून तो शहरात केला.
२)गौणत्व सुचक उभयान्वयी अव्यय
१)स्वरूप बोधक
२)उद्देश बोधक
३)संकेत बोधक
४)कारण बोधक
स्वरूप बोधक उभयान्वयी अव्यय
जे उभयान्वयी अव्यय आपल्याला एका गोष्टीचे रूप दुसऱ्या मध्ये दाखवतात, त्यांना आपण स्वरूप बोधक उभयान्वयी अव्यय असे म्हणतो.
उदाहरण-
- एक रुपया म्हणजे शंभर पैसे.
- श्रीराम म्हणून एक राजा होऊन गेला.
- सर म्हणाले की पृथ्वी गोल आहे.
- उद्देश बोधक उभयान्वयी अव्यय:
जे उभयान्वी अव्यय एखाद्या गोष्टीचा हेतू दाखवतात किंवा उद्देश दाखवतात, त्यांना आपण
उद्देश बोधक उभयान्वयी अव्यय असे म्हणतात.
उदाहरण-
चांगली नोकरी मिळावी म्हणून तो खूप अभ्यास करतो.
चांगले पीक यावे म्हणून शेतकरी शेतात कष्ट करतो.
संकेत बोधक उभयान्वि अव्यय :
जी उभयान्वयी अव्यय संकेत दाखवण्याचे काम करतात ,त्यांना आपण संकेत बोधक उभयान्वयी अव्यय असे म्हणतो.
उदाहरण-
- जर पहिला आलो तर पेढे वाटेल.
- बाबा घरी आले की मी खेळायला जाईन.
कारण बोधक उभयान्वयी अव्यय:
जे उभयान्वयी अव्यय वाक्यामध्ये कारण दाखवण्याचे काम करतात, त्यांना आपण कारणबोधक उभयान्वयी अव्यय असे म्हणतो.
उदाहरण-
मला कारल्याची भाजी आवडत नाही कारण ती कडू असते.
सरांनी त्याला शिक्षा केली कारण त्याने गृहपाठ केला नाही.
- Marathi Grammar
- Linguistic Concepts
- Parts of Speech
- Adverbial Elements
- Language Structure
- Grammar Rules
- Word Usage
- Sentence Construction
- Language Analysis
- Marathi Language Studies
- Grammatical Categories
- Language Learning
- Syntax
- Grammar Terminology
- Sentence Elements