Mahashivratri : महाशिवरात्री उत्सव

Mahashivratri महाशिवरात्री हा हिंदू देवता भगवान शंकर यांच्या भक्तांसाठी सर्वात महत्त्वाचा सण आहे.

आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये वेगवेगळे सण साजरे केले जातात आणि आपल्या परंपरा जपल्या जातात त्यामधील एक महत्त्वाचा आणि पवित्र सण म्हणजे महाशिवरात्रि होय.ही आनंदाची आणि उपासनेची रात्र आहे.

महाशिवरात्री हा सण हिंदू संस्कृतीमध्ये अतिशय आनंदाने आणि भक्ती भावाने साजरा केला जातो. या सणा दिवशी भगवान शिव म्हणजेच महादेव यांची अगदी भक्ती भावाने पूजा केली जाते आणि त्या दिवशी उपवास देखील केला जाते. महाशिवरात्री हा सण फेब्रुवारी किंवा मार्च महिन्यामध्ये माघ कृष्ण चतुर्दशीच्या दिवशी साजरा करतात.

महाशिवरात्रीच्या आधी घरातील मोठी व अनुभवी लोक काशीखंड, शिवलीलामृत, महारुद्र यासारख्या पवित्र ग्रंथाचे पारायण करतात, तर काही लोक महाशिवरात्री सणाच्या काही अगोदर गायन, भजन, कीर्तन यासारखे उपक्रम घेतात, महाशिवरात्रीच्या दिवशी लोक भगवान शिव यांच्या शिवलिंग किंवा मूर्तीला अभिषेक घालतात व त्याला बेल वाहतात. त्या दिवशी महाशिवरात्रीची एकादस म्हणून उपवास केला जातो. काही लोक या दिवशी दिवसभर महादेवाचा जप करतात. काही भागात लोक शिवरात्रीच्या अगोदर बारा ज्योतिर्लिंगाणा भेट देण्यासाठी जातात.

या दिवशी महादेव मंदिरामध्ये भाविकांची खूप गर्दी असते. काही मंदिरामध्ये महादेवाची पूजा करून सत्संग, भजन, कीर्तन, गायन यासारखे कार्यक्रम भक्तिभावाने राबवले जातात आणि काही ठिकाणी या दिवशी मंदिराबाहेर यात्रा भरलेल्या असतात आणि महाप्रसाद देखील असतो. काही ठिकाणी महाशिवरात्रीमध्ये रात्रीच्या जागरणाला खूप महत्त्व आहे. या दिवशी लोक रात्री जागरण करून आराधना करतात.

या दिवशी लोक अगदी भक्ती भावाने भगवान शिव यांच्या शिवलिंग किंवा मूर्तीला अभिषेक करतात त्याला बेल वाहतात व उपवास करतात. या दिवशी महादेव मंदिरामध्ये भाविकांची खूप गर्दी असते. महाशिवरात्रीला शिवलिंगाची विशेष पूजा केली जाते. पंचगव्य म्हणजे गाईचे दूध, तूप, शेण, गोमूत्र आणि दही लावून शिवलिंगाला अभिषेक करतात. त्यानंतर दूध, दही, तूप, मध आणि साखर या पंचामृत आणि शिवलिंगावर लेप देतात त्यानंतर धोत्रा आणि बेलाची पाने तसेच पांढरी फुले वाहून पूजा करतात.

प्रत्येक सण साजरा करण्यामागे काहीतरी कथा असते तसेच महाशिवरात्री हा सण साजरा करण्यामागे एक पौराणिक कथा आहे. पौराणिक कथेमध्ये असे सांगतात, महाशिवरात्री या सणा विषयी असे सांगितले जाते की ज्यावेळी समुद्रमंथन झाले होते त्यावेळी सृष्टी संबंधित काही गोष्टीची निर्मिती झाली होती.

त्याचवेळी या समुद्रमंथनातून एक विष निर्माण झाले होते, जे विष संपूर्ण पृथ्वीचा नाश करू शकत होते आणि यामुळे संपूर्ण विश्वाचा नाश होईल अशी भीती देव आणि भुतांना वाटू लागली. म्हणून त्यांनी भगवान शिवकडे मग मदत मागितली. ज्यावेळी हे भगवान महादेवांना कळाले तेव्हा त्यांनी हे विष प्राशन करून सृष्टीचा नाश होण्यापासून वाचवले.

पण, ह्या विषयाला संपवण्याची क्षमता फक्त महादेवांकडेच होती. महादेवांनी हे विष पोटात घेण्याऐवजी आपल्या घशातच ठेवले त्याच्यामुळे त्यांचा घसा निळा झाला आणि त्यांना नीलकंठ असे टोपण नाव दिले गेले. परंतु महादेवांनी हे विष प्राशन केल्यानंतर त्यांच्या शरीराला दह होऊ लागला आणि त्यांचे शरीर काळे निळे पडले होते. त्यावेळी इतर देवांनी देवाच्या वैद्याला बोलावले त्यावेळी वैद्यांनी महादेवांना रात्रभर जागण्यासाठी सांगितले.

इतर सर्व देवांनी महादेवांना बरे वाटावे म्हणून रात्रभर नृत्य केले, गायन केले आणि आपण याला जागर म्हणतो. हा जागर आजही महाशिवरात्रीच्या रात्री केला जातो आणि त्या रात्री भजन, कीर्तन, गायन यासारखे विविध धार्मिक कार्यक्रम घेतले जातात. असे म्हटले जाते की या दिवशी महादेवांना खूप दाह होत असल्यामुळे त्यांनी त्या रात्री तांडव नृत्य केले होते

महाशिवरात्री हा दिवस भारतातील विविध भागांमध्ये वेगवेगळ्या पद्धतीने साजरा केला जातो.

महाशिवरात्र या शुभ दिनी सकाळी लवकर उठावे. प्राचीन ग्रंथानुसार आंघोळीच्या पाण्यात तीळ मिसळल्याने आणि त्या पाण्याने स्नान केल्याने शरीर आणि आत्मा दोन्ही शुद्ध होतात. त्यानंतर एकादशीचा उपवास ठेऊन महादेवाची उपासना व आराधना करावी .

Leave a comment