Rangpanchmi : रंगपंचमी-रंगांचा सन

Rangpanchmi

Rangpanchmi-रंगपंचमी हा सण फाल्गुन वद्य पंचमीला प्रामुख्याने महाराष्ट्रात साजरा केला जातो. रंगपंचमी हा हिंदूंचा एक उत्सव आहे.

या दिवशी एकमेकांच्या अंगावर रंग उडवून लोक आनंदाने व उत्साहाने हा सण साजरा करीत असल्यामुळे या पंचमीला रंगपंचमी असे म्हणतात.

धुलीवंदनापासून सुरू होणाऱ्या वसंतोत्सवाला रंगपंचमीच्या दिवशी पाच दिवस पूर्ण होतात रंगपंचमी म्हणजेच रंगांचा सण. या दिवशी एकमेकांना वेगवेगळे रंग लावून आनंदोत्सव साजरा केला जातो.

गेलेल्या कडक  उन्हाळ्यापासून अंगाची दाह शांत व्हावी म्हणून रंग उधळले जातात.

देशाच्या काही भागात या लोक लोकप्रिय सणाला धार्मिक दृष्ट्या विशेष महत्त्व आहे. रंगपंचमी या सणाच्या दिवशी सर्व भेदभाव विसरून लहान थोर एकत्र येतात व आनंदाने हा रंगांचा सण साजरा करतात.

लहान मुले पिचकारी घेऊन दिवसभर एकमेकांच्या अंगावर रंग उडवण्यात मग्न असतात. मानवी जीवनात जर रंग नसतील, तर जीवन किती उदास वाटेल ना?

आपल्या जीवनातील रंगांचे महत्त्व अधोरेखित करणारा सण म्हणजेच रंगपंचमी. भेदभाव, वैरभाव, मतभेद सर्व दूर करून मानवी जीवनात आनंदाचा रंग उधळणारा सण म्हणजे रंगपंचमी.

रंगपंचमी ही वाईट शक्तीवर चांगल्या शक्तीचा विजय अथवा दुःखावर मात करत आनंदाकडे वाटचाल करणारा सण म्हणून मानला जातो.

रंगपंचमी हा सण होळी धुलीवंदन रंगोत्सव धुळवड रंगपंचमी अशा विविध नावांनी ओळखला जातो व साजरा केला जातो.

काही ठिकाणी होळी नंतरचा दुसरा दिवशी रंगपंचमी साजरी होते, तर काही ठिकाणी होळी नंतरचे पाच दिवस रंगपंचमी साजरी करतात. रंगपंचमी या निमित्ताने सर्वजण एकत्र येतात आणि रंगपंचमीचा आनंद घेतात.

या सणाचे धार्मिक आणि सांस्कृतिक महत्त्व वेगवेगळ्या पद्धतीने सांगतात.

रंगपंचमी हा वसंतोत्सवाचाच एक भाग म्हणून साजरा केला जात असावा कारण, या काळात सृष्टीत अनेक बदल होत असतात. झाडांची सुकलेली पाने गळून सृष्टीला नवी पालवी फुटत असते, त्यामुळे निसर्गातही रंगांची उधळण चालू असते.

याचे एक प्रतीक म्हणून रंगपंचमी ही साजरी केली जात असावी, शिवाय या काळात कोणाची तीव्रता वाढू लागलेली असते त्यामुळे हिवाळ्यातून उन्हाळ्यात प्रवेश करताना वातावरणाचा होणारा दाह कमी करण्यासाठी हा सण साजरा केला जातो. कारण रंगपंचमीला रंगांसोबत एकमेकांच्या अंगावर रंगाचे पाणी उडवण्याची ही पद्धत आहे.

या सणाचे महत्त्व आणि त्या मागच्या भावना काही असल्या तरी या सणामुळे आज नातेवाईक मित्रमंडळी एकत्र येतात आणि आनंदाने हा सण साजरा करतात. थोडक्यात सांगायचे असेल की सर्वांना एकत्र आणण्यासाठी या सणाची निर्मिती केली गेली असावी.

रंगपंचमी या सणाला धार्मिक महत्त्व असल्यामुळे सर्वात आधी भक्तीपूर्वक राधाकृष्ण आणि घरातील इतर देवतांना रंग लावला जातो. त्यानंतर घरातील मोठ्या माणसांना रंग लावला जातो. लहान मंडळी मोठ्यांच्या कपाळावर रंगांचा टिळा लावून किंवा त्यांच्या चरणावर रंगाचे बोट लावून या सणाला सुरुवात करतात.

देवांची पूजा आणि घरातील मोठ्यांचा आदरपूर्वक रंग लावल्यानंतर मग सर्वांसोबत रंगांची उधळण केली जाते. कोरडे रंग, गुलाल, एकमेकांच्या अंगावर पाणी उडवत हा रंग साजरा केला जातो. शिवाय या दिवशी घरात पुरणपोळी आणि गोडधोडीचे पदार्थ बनवले जातात. महाराष्ट्रातील कोकण प्रांतात होळी रंगपंचमी या दिवशी शिमगोत्सव साजरा केला जातो.

रासायनिक रंगांचे दुष्परिणाम पाहता नैसर्गिक रंग वापरून हा सण साजरा केला जातो अलीकडील काळात नैसर्गिक रित्या तयार केलेले रंग वापरतात. जसे की, फुलांच्या पाकळ्या, मेहंदी, गुलमोहराची पाने, टोमॅटो, हळद, डाळीचे पीठ, अशा नैसर्गिक पदार्थापासून हा रंग तयार केला जातो.

नैसर्गिक पदार्थापासून तयार केलेल्या रंगांचा शरीरावर कोणत्याही प्रकारचा परिणाम दुष्परिणाम दिसून येत नाही.

असा हा रंगांचा सण लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सगळ्यांना आवडतो या सणाची प्रत्येक जण आतुरतेने वाट पाहत असतो.

Leave a comment