Grampanchayat : ग्रामपंचायत

Grampanchayat पंचायत राज प्रशासनातील सर्वात महत्त्वाचा व शेवटचा स्तर म्हणजे ग्रामपंचायत होय.

Grampanchayat ग्रामपंचायतीस आसाममध्ये “गावपंचायत” असे म्हणतात. गुजरात मध्ये “ग्रामपंचायत / नगरपंचायत” तर, तामिळनाडूमध्ये “शहर पंचायत” म्हणतात. उत्तर प्रदेशात “गावसभा” बिहार मध्ये “पंचायत”, ओरिसामध्ये “पाली सभा” म्हणतात.

विकास प्रशासनात ग्राम स्तरावरील सर्वात महत्त्वाचा घटक म्हणजे ग्रामपंचायत होय.

पंचायत राज संस्थांचा पाया म्हणजे ग्रामपंचायत होय.

ग्रामपंचायत ही ग्रामसभेची कार्यकारी समिती आहे.

ग्रामपंचायतची स्थापना –

1920 मध्ये बॉम्बे व्हिलेज पंचायत हा ग्रामपंचायत कायदा मुंबई प्रांतासाठी फक्त लागू होता. भारतीय घटनेतील कलम 40 नुसार ग्रामपंचायतीची स्थापना करता येते. मुंबई ग्रामपंचायत ॲक्ट 1958 नुसार कलम पाच व राज्यघटनेतील कलम 40 नुसार ग्रामपंचायतीची स्थापना केली जाते.

मुंबई ग्रामपंचायत अधिनियम 1958 राज्यात 1 जून 1959 पासून लागू झाला.

2012 “मध्ये मुंबई ग्रामपंचायत अधिनियम 1958 हे नाव बदलून “महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम 1958 असे करण्यात आले.

ग्रामपंचायत स्थापन करण्याचा अधिकार विभागीय आयुक्तांना आहे.

महाराष्ट्रात ग्रामपंचायतची स्थापना लोकसंख्येवर अवलंबून आहे. महाराष्ट्रातील स्तरीय पंचायत राज पद्धती 1 मे 1962 पासून अस्तित्वात आली.

ग्रामपंचायत रचना –

ग्रामपंचायत स्थापन होण्यासाठी संबंधित खेड्याची लोकसंख्या किमान 600 असावी लागते. 600 पेक्षा कमी लोकसंख्या असल्यास दोन-तीन खेड्यांची मिळून “ग्रुप ग्रामपंचायत” बनते.

डोंगरी भागात ग्रामपंचायत स्थापन होण्यासाठी गावची लोकसंख्या किमान 300 असावी लागते. सदस्य संख्या कमीत कमी 7 व जास्तीत जास्त 17 पर्यंत आहे.

ग्रामपंचायत स्थापनेचे तीन प्रकार:

  • लोकसंख्या 600 पेक्षा कमी असलेल्या डोंगरी भागात सदस्य संख्या पुढील प्रमाणे
ग्रामपंचायत स्थापना प्रकारलोकसंख्यासदस्य संख्या  
1.डोंगरी भागात3007
2.आदिवासी भागात4507
3.पठारी भागात6007

ग्रामपंचायत सदस्य निवड:

ग्रामपंचायत सदस्यांना पंच असे म्हणतात. पंचांची निवड ग्रामसभेमार्फत प्रत्यक्ष प्रत्यक्ष प्रौढ व गुप्त मतदान पद्धतीने होते. राज्य निवडणूक आयोगामार्फत निवडणुका घेतल्या जातात. जिल्हाधिकारी ग्रामपंचायत वार्ड व मतदान याद्या तयार करतो. ग्रामपंचायत ववार्ड आरक्षण तहसीलदार ठरवतो.

  • गावच्या लोकसंख्येनुसार ग्रामपंचायत सदस्यांची संख्या पुढील प्रमाणे-
गावाची लोकसंख्यासदस्य संख्या  
600  ते 15007
1501 ते 30009
3001 ते 450011
4501 ते 600013
6001 ते 750015
7501 हून अधिक17

ग्रामपंचायत आरक्षण :

महाराष्ट्रात ग्रामपंचायत निवडणुकांमध्ये महिला, एस.सी., एस.टी. व मागास प्रवर्ग (ओबीसी) साठी जागा राखीव ठेवल्या असून त्या वेगवेगळ्या प्रवर्गांना नेमून दिल्या जातात.

ग्रामपंचायतीमध्ये महिलांसाठी 50 टक्के जागा राखीव असतात. ग्रामपंचायत मध्ये अनुसूचित जाती जमातीला लोकसंख्येच्या प्रमाणात राखीव जागा तरतूद आहे.

ग्रामपंचायत मध्ये मागास प्रवर्गासाठी 27 टक्के जागा (इतर मागासवर्गीय, अनुसूचित जाती व जमाती महिलांसाठी 50% जागा राखीव असतात)

ग्रामपंचायत मुदतीपूर्व वेळेत भंग पावल्यास (विसर्जन) ग्रामपंचायत वार्डाचे आरक्षण आहे तसे ठेवून ग्रामपंचायतीच्या निवडणुका घेतल्या जातात.

ओबीसी, एस.सी., एस.टी. या प्रवर्गांना निवडणूक लढवण्यासाठी जातीचे प्रमाणपत्र व जात वैधता प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक आहे.

ग्रामपंचायत कार्यकाल:

ग्रामपंचायत कार्यकाल पाच वर्षाचा असतो. ग्रामपंचायतच्या वाढीव कालावधी सह साडेपाच वर्षाचा असतो.

राज्य शासनाला सहा महिन्यापर्यंत ग्रामपंचायत कार्यकाल वाढवण्याचा अधिकार असतो.

गावातील सर्व 18 वर्षे पूर्ण झालेल्या स्त्री-पुरुषांना मतदानाचा अधिकार आहे.

21 वर्षे पूर्ण झालेल्या व्यक्तीला (स्त्री-पुरुष) ग्रामपंचायत निवडणूक लढवता येते.

ग्रामपंचायत निवडणूक लढवू इच्छिणाऱ्या व्यक्तीस दोन पेक्षा अधिक अपत्य असता कामा नये.

1 जानेवारी 1995 नंतर जन्मलेल्या इच्छुक उमेदवारांनी सरपंच व सदस्यांसाठी सातवी उत्तीर्ण होणे आवश्यक आहे.

ग्रामपंचायत प्रमुख: (सरपंच व उपसरपंच)

ग्रामपंचायत सदस्यांना पंच असे म्हटले जाते. ग्रामपंचायत सदस्य निवडणुकीनंतर पहिल्या बैठकीत सरपंच व उपसरपंचाची निवड करतात. पंचांची संख्या निश्चित करण्याचा अधिकार जिल्हाधिकाऱ्यास आहे.

पूर्वी पंच आपल्यापैकी एका सदस्यांची सरपंच म्हणून व दुसऱ्याची उपसरपंच म्हणून निवड करत असत. पण 3 जुलै 2017 च्या निर्णयानुसार सरपंचाची निवड आता प्रत्यक्षरीत्या थेट जनतेतून केली जाते. म्हणजेच सरपंचाची निवड प्रत्यक्षरीत्या जनतेतून तर उपसरपंचाची निवड अप्रत्यक्षरीत्या पंचाकडून होते.

ग्रामपंचायत बैठका:

ग्रामपंचायतच्या एका वर्षात 12 बैठका घ्याव्यात. एका बैठकीमध्ये एक महिन्यापेक्षा जास्त अंतर राहू नये. ग्रामपंचायत बैठकीचे अध्यक्ष सरपंच अनुपस्थित असल्यास उपसरपंच असतात. सलग तीन महिने एखादा सदस्य ग्रामपंचायत बैठकीला गैरहजर असल्यास तो अपात्र ठरतो. सलग सहा महिने गैरहजर असल्यास सदस्यत्व रद्द होते.

पुढे हे हि वाचा Talathi hall ticket News:तलाठी परीक्षा प्रवेश प्रमाणपत्र

ग्रामपंचायतीची कार्य:

मुंबई ग्रामपंचायत अधिनियमाच्या परिशिष्ट 1 मध्ये ग्रामपंचायतची कामे विषय देण्यात आले आहेत. सध्या ग्रामपंचायतच्या अत्याधित 79 विषय आहेत.

गावातील रस्ते बांधणे व दुरुस्त करणे.

जन्ममृत्यू विवाह यांची नोंद ठेवणे.

सार्वजनिक आरोग्य, दिवाबत्त्याची सोय, पेजलपुरवठा, लघुपाटबंधारे, कुटिरीद्योग, ग्रामोद्योग, कृषी, पशु व जंगल संवर्धन , प्रौढ साक्षरता, सांडपाण्याची व्यवस्था करणे इत्यादी.

गावात बाजार, जत्रा, उत्सव त्यासंबंधी  व्यवस्था करणे.  शेती विकास व पशुधन विकास योजना अमलात आणणे.

गावातील प्राथमिक शिक्षण व प्राथमिक आरोग्य केंद्र यांची जबाबदारी ग्रामपंचायतीवर नसून ती जिल्हा परिषदवर आहे.

महाराष्ट्र-खनिजसंपत्तीhttps://mpsc.pro/mineral-resources-in-maharashtra/
Industries in Maharashtra:महाराष्ट्र उद्योगधंदेhttps://mpsc.pro/industries-in-maharashtra/
Talathi hall ticket News:तलाठी परीक्षा प्रवेश प्रमाणपत्रhttps://mpsc.pro/talathi-hall-ticket-news/
Rivers in Maharashtra:महाराष्ट्रातील नद्याhttps://mpsc.pro/rivers-in-maharashtra/
Types of Soil in Maharashtra:महाराष्ट्रातील मृदाhttps://mpsc.pro/types-of-soil-in-maharashtra/

Leave a comment