Tahasildar : तहसीलदार

Tahasildar

Tahasildar तहसीलदार हा तालुक्याचा प्रशासकीय प्रमुख असतो, तसेच तो तालुका दंडाधिकारी म्हणून काम करतो.
तहसीलदारास मामलेदार असे म्हणतात.
महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 च्या कलम 7 नुसार प्रत्येक तालुक्यासाठी एक तहसीलदार व त्यांना सहाय्य करण्यासाठी एक किंवा अधिक नायक तहसीलदार नेमण्याचे अधिकार राज्य शासनास आहेत.
निवड- (MPSC) महाराष्ट्र लोकसेवा लोकसेवा आयोगाद्वारे.
नियुक्ती- संबंधित राज्य शासनामार्फत.
वेतन- वेतन व भत्ते राज्य शासनाच्या नियमानुसार.
तालुक्यात शांतता व सुव्यवस्थेच्या दृष्टिकोनातून तहसीलदार हाच तालुका दंडाधिकारी म्हणून काम पाहतो.
तालुकास्तरावर निवडणूक यंत्रणेतील महत्त्वाचा घटक या नात्याने तहसीलदार निवडणूक अधिकारी म्हणून काम पार पाडतो.
मुंबई कुळ वहिवाट व शेत जमीन अधिनियम 1948 नुसार मामलेदार या नात्याने विहित कर्तव्य तहसीलदार पार पाडतो.
तालुकास्तरावर महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 नुसार तहसीलदारास महसूल विषयक कार्य पार पाडावी लागतात.
Shabdyogi avyay-शब्दयोगी अव्यय:https://mpsc.pro/shabdyogi-avyay/
Shabdanchya jati-शब्दांच्या जातीhttps://mpsc.pro/shabdanchya-jati/
मराठी वर्णमाला-Marathi varnmalahttps://mpsc.pro/marathi-varnmala/
Shabdsamuha-शब्दसमूहाबद्दल एक शब्दhttps://mpsc.pro/shabdsamuha/
 Sandhi v Sandhiche prakar-संधी व संधीचे प्रकारhttps://mpsc.pro/sandhi-v-sandhiche-prakar/
Samas v samasache prakar-समास व समासाचे प्रकारhttps://mpsc.pro/samas-v-samasache-prakar/
होळी-holi-the great indian festivalhttps://mpsc.pro/holi-the-great-indian-festival/
कृष्ण जन्माष्टमीhttps://mpsc.pro/krushna-janmashtami/
गुढीपाडवा-Gudhipadwa festivalhttps://mpsc.pro/gudhipadwa-festival/
सर्कल ऑफिसर, तलाठी इत्यादी अधिकाऱ्यांवर तहसीलदाराचे नियंत्रण असते.
तालुक्याचा प्रशासकीय प्रमुख, तालुका दंडाधिकारी, तालुका निवडणूक अधिकारी म्हणून तहसीलदार काम करतो.
तालुकास्तरावर शेतजमिनीची बिगर शेतजमीन (एन. ए.) म्हणून तात्पुरती घोषणा करण्याचे अधिकार तहसीलदारास आहेत.
तालुकास्तरावर पीकपाण्याची आणेवारी वरिष्ठांना कळविण्याचे अधिकार तहसीलदारांना आहेत.
तालुकास्तरावर सर्वे नंबरच्या सरहद्दी तहसीलदार ठरवतो.
तालुक्यात कायदा व सुव्यवस्था राखण्याचे कार्य तहसीलदार करतो.
तालुक्यातील सार्वजनिक वितरण व्यवस्थेच्या व्यवस्थेवर तहसीलदाराचे नियंत्रण असते.
गाव पातळीवर पिकांची पाहणी वर्षातून दोन वेळा (खरीप व रब्बी) पाहणी केली जाते.
जमिनीत पिके उभी असतानाच तलाठी पीक पाहणी करतात.
तहसीलदार पिकांची आणेवारी ठरवतो.
22 डिसेंबर 1966 रोजी महाराष्ट्र जमीन महसूल संहिता (Land Revenue Code) अस्तित्वात आली.
तालुकास्तरावर रोजगार हमी योजनेचा प्रमुख या नात्याने तहसीलदार काम पाहतो.
तालुकास्तरावर कौटुंबिक शिधापत्रिकांचे (रेशन कार्ड्स) नूतनीकरण करण्याचे जबाबदारी तहसीलदारावर असते.
कुटुंब कल्याण, अन्नपुरवठा, कागदपत्राचे स्थानांतरण व तात्पुरता परवाना देण्याचे काम तहसीलदार करतो.
तहसीलदार कोतवालाची नियुक्ती करतात.
तहसीलदार हंगामी पोलीस पाटलांची नेमणूक करतात.

Visheshan-विशेषण: मराठी भाषेतील महत्त्वपूर्ण वचनांचा अंगhttps://mpsc.pro/visheshan/
Kriyapad-क्रियापद: मराठी भाषेतील आदर्श वाचन आणि लिहिण्याचा सर्वोत्तम उपायhttps://mpsc.pro/kriyapad/
Ubhyanwayee Avyay -उभयन्वयी अव्यय भाषाशास्त्रातील महत्वपूर्ण अंश!https://mpsc.pro/ubhyanwayee-avyay/
Kevalproyogi avyay-केवलप्रयोगी अव्यय:https://mpsc.pro/kevalproyogi-avyay/
Kriyavisheshan avyay-क्रियाविशेषण अव्यय:https://mpsc.pro/kriyavisheshan-avyay/

Leave a comment