CEO- जिल्हा परिषदेचा प्रशासकीय कार्यभार जिल्हा परिषदेच्या प्रशासकीय अधिकाऱ्यांमार्फत चालवला जातो.
मुख्य कार्यकारी अधिकारी हा जिल्हा परिषदेचा प्रशासकीय प्रमुख असतो.
CEO-तरतूद-
जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम 1961 च्या कलम (94) नुसार प्रत्येक जिल्हा परिषदेसाठी एक मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) व एक किंवा अधिक उपमुख्य कार्यकारी अधिकारी(Dy. CEO) यांची तरतूद आहे.
मुख्य कार्यकारी अधिकारी हा भारतीय प्रशासन सेवेतील वरिष्ठ अधिकारी असतो.
निवड- संघ लोकसेवा आयोग (UPSC)
नेमणूक– संबंधित राज्य शासनाकडून (राष्ट्रपतीच्या सही व शिक्का घेऊन नेमणूक केली जाते)
वेतन– राज्याच्या निधीतून दिले जाते.
वसंतराव नाईक समितीच्या शिफारशीनुसार प्रत्येक जिल्हा परिषदेला एक मुख्य कार्यकारी अधिकारी असावा.
मुख्य कार्यकारी अधिकाऱ्याला आपल्या पदाचा राजीनामा राष्ट्रपतीच्या नावे द्यावा लागतो.
मुख्य कार्यकारी अधिकाऱ्याला दीर्घकालीन रजा राज्य शासनाकडून घ्यावी लागते.
मुख्य कार्यकारीअधिकाऱ्याचे अधिकार व कार्य:
- शासनाच्या अधिनियमानुसार विविध कामे पार पाडणे.
- जिल्हा परिषद पंचायत समितीच्या बैठकांना उपस्थित राहणे.
- जिल्हा परिषद अधिकारी व कर्मचाऱ्यांची दिशा ठरवणे.
- जिल्हा परिषदेच्या वर्ग 1 व वर्ग 2 च्या अधिकाऱ्यांना रजा देणे.
- जिल्हा परिषदेच्या वर्ग 3 व वर्ग 4 च्या कर्मचाऱ्यांच्या नियुक्त्या करणे.
- जिल्हा परिषद कर्मचाऱ्याकडून महत्त्वाची कागदपत्रे मागविणे.
- अंदाजपत्रक तयार करून स्थायी समितीला सादर करणे.
- अधिकारी वर्ग रजेवर असताना त्या जागी हंगामी नियुक्त्या करणे.
- जिल्हा परिषदेच्या फंडातून (जिल्हा निधीतून) रकमा काढणे व त्यांचे वाटप करणे.
- जिल्हा परिषदेच्या एक पेक्षा अधिक उपमुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांपैकी एकाचे जिल्हा परिषदेचा सचिव म्हणून नियुक्त करण्याचा अधिकार मुख्य कार्यकारी अधिकाऱ्याला असतो.
- जिल्हा परिषदेच्या कोणत्याही अधिकाऱ्याकडून तो कोणत्याही कामाबद्दलची माहिती, अहवाल वा विषय मागवू शकतो.
- जिल्हा परिषदेचे अंदाजपत्रक तयार करून ते स्थायी समिती सादर करणे.
- राज्य शासनाला जिल्हा परिषदेच्या कामाचा अहवाल सादर करणे.
- राज्य शासन व जिल्हा परिषद यांच्याकडील आर्थिक फंडाचा योग्य कामासाठी वापर करणे.
उपमुख्य कार्यकारी अधिकारी(Dy. CEO) :
उपमुख्य कार्यकारी अधिकारी हा जिल्हा परिषदेचा पदसिद्ध सचिव असतो.
जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीचा पदसिद्ध सचिव देखील उपमुख्य कार्यकारी अधिकारीच असतो.
पुढे हे हि वाचा:-
Bharatatil mruda sampatti : भारतातील मृदासंपत्ती | https://mpsc.pro/bharatatil-mruda-sampatti/ |
Rivers in India : भारतातील नद्या व त्यांच्या उपनद्या | https://mpsc.pro/rivers-in-india/ |
The first in India : भारतातील पहिले | https://mpsc.pro/the-first-in-india/ |
Popular places in India : भारतातील प्रसिद्ध स्थळे | https://mpsc.pro/popular-places-in-india/ |
DayLight Saving Time (DST) : एक संक्षिप्त इतिहास और इसका प्रभाव | https://mpsc.pro/daylight-saving-time-dst/ |
Cities in India and its importance : भारतातील विशेष शहर | https://mpsc.pro/cities-in-india-and-its-importance/ |
The First lady in India : भारतातील सर्वप्रथम महिला | https://mpsc.pro/the-first-lady-in-india/ |
निवड- महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत MPSC
नेमणूक– राज्य शासन
मुख्य कार्यकारी अधिकाऱ्याला मदत करण्यासाठी उपमुख्य कार्यकारी अधिकाऱ्याची नियुक्ती केली जाते.
जिल्हा परिषदेच्या सर्व कामाची जबाबदारी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या आदेशाने उपमुख्य कार्यकारी अधिकाऱ्याला पार पाडावी लागते.