POLICE PATIL
- POLICE PATIL-1957 च्या मुंबई नागरी कायदा बॉम्बे सिविल अक्ट नुसार पोलीस पाटील पदाची निर्मिती करण्यात आली.
- महाराष्ट्र मुलकी पोलीस अधिनियम 1962 अन्वये 1 जानेवारी 1962 पासून राज्यातील वंशपरंपरागत मुलकी पाटलाचे पद रद्द झाले.
- महाराष्ट्र ग्राम पोलीस अधिनियम 1967 नुसार पोलीस पाटलाची नियुक्ती केली जाते.
- महाराष्ट्र ग्राम पोलीस अधिनियम मुंबई शहर व मुंबई उपनगर यांना लागू नाही.
- राज्य सरकार जिल्हाधिकारी वा त्यांनी अधिकार प्रदान केल्यास उपजिल्हाधिकारी किंवा प्रांताधिकारी यांच्यामार्फत पोलीस पाटलाची नियुक्ती केली जाते.
पोलीस पाटलाची पात्रता–
पोलीस पाटील म्हणून नियुक्त होण्यासाठी उमेदवाराचे वय किमान 25 व कमाल 45 वर्ष असावे लागते.
पोलीस पाटील म्हणून नियुक्त होण्यासाठी उमेदवार किमान 10वी इयत्ता उत्तीर्ण असावा लागतो.
तो गावचा रहिवाशी असावा लागतो.
- शेजारच्या गावातील किंवा कमी शैक्षणिक पात्रतेच्या उमेदवाराची पोलीस पाटील पदी नियुक्ती करण्यासाठी विभागीय आयुक्तांची परवानगी घ्यावी लागते.
- हंगामी पोलीस पाटलाची तात्पुरती नेमणूक करण्याचे अधिकार तहसीलदारास आहेत.
- पोलीस पाटलाची नियुक्ती करताना सुरुवातीला ती 5 वर्षाकरिता केली जाते.
- पूर्वी पोलीस पाटलाची नेमणूक प्रत्येक वेळी 5 वर्षाच्या पटीत वाढवण्याची तरतूद होती आता ही नेमणूक 10 वर्षाच्या पटीत वाढवली जाते.
- पोलीस पाटलास वयाची 60 वर्षे पूर्ण झाल्यानंतर या पदावर राहता येत नाही.
- पोलीस पाटलास त्यांच्या पदाव्यतिरिक्त पूर्ण वेळेची कायमस्वरूपी दुसरी कोणतीही नोकरी करता येत नाही.
- पोलीस पाटलास शेती व इतर व्यवसाय करता येतो, मात्र असा व्यवसाय त्याच्या पदाच्या कर्तव्याच्या आड येता कामा नये.
- पोलीस पाटील हा पूर्ण वेळेचा शासकीय नोकर नसल्याने त्याला गाव पातळीवरील सहकारी संस्थांमध्ये एखादे पद व सदस्यत्व धारण करता येऊ शकते.
- पोलीस पाटलास रजा देण्याचे अधिकार संबंधित तहसीलदारास आहेत.
- राज्य सरकारच्या इतर शासकीय सेवकांना मिळणाऱ्या सवलती पोलीस पाटलास मिळत नाहीत मात्र अटींची पूर्तता केल्यास त्याच्या मुलांना मोफत शिक्षण मिळू शकते.
- पोलीस पाटलास गैरवर्तवणुकीबाबत शासन करण्याचे अधिकार उपजिल्हाधिकारी किंवा प्रांत अधिकारी यांना आहेत.
- गैरवर्तवणुकीबाबत पोलीस पाटलास एक वर्षापर्यंत सेवेतून निलंबित केले जाऊ शकते किंवा बडतर्फ केले जाऊ शकते.
- गावात नैसर्गिक आपत्ती व संसर्गजन्य रोगाची साथ पसरल्यास त्यासंबंधीचा अहवाल वरिष्ठांना पोलीस पाटील देतो.
- गाव पातळीवर कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीने बंदोबस्त राखणे, गुन्ह्यांची खबर पोलीस ठाण्यात देणे, गुन्ह्यास आळा घालणे, विनापरवाना शस्त्र बाळगण्यास मनाई करणे आदी कर्तव्य पोलीस पाटलांची यांची आहेत.
- गाव पातळीवर अमली पदार्थ बंदी कायद्याचा भंग झाल्यास संबंधित अधिकाऱ्यास पोलीस पाटील खबर देतो.
- गावात अनैसर्गिक व संशयास्पद मृत्यू घडल्यास तालुका दंडाधिकारी व संबंधित पोलिस अधिकारी यांना खबर देण्याची जबाबदारी पोलीस पाटलावर असते.
- गावपातळीवर कायदा व सुव्यवस्था राखण्याच्या कार्यात पोलीस पाटलास कोतवाल हा कनिष्ठ ग्राम नोकर मदत करतो.
- गाव पातळीवर कोतवाल आदी कनिष्ठ सेवकाकडून आवश्यक ती कामे करून घेण्याची जबाबदारी पोलीस पाटलावर असते.
- पोलीस पाटलाची नेमणूक करताना मागासवर्गीय उमेदवारास प्राधान्य देण्यात येते.
- पोलीस पाटलाच्या रजेच्या काळात शेजारच्या गावचा पोलीस पाटील त्याचे काम पाहतो.
- पोलीस पाटलांचे वेतन दरमहा रु.3000 रुपये. 1 जानेवारी 2012 पासून आहे.
पुढे हे हि वाचा:-
Bharatatil mruda sampatti : भारतातील मृदासंपत्ती | https://mpsc.pro/bharatatil-mruda-sampatti/ |
Rivers in India : भारतातील नद्या व त्यांच्या उपनद्या | https://mpsc.pro/rivers-in-india/ |
The first in India : भारतातील पहिले | https://mpsc.pro/the-first-in-india/ |
Popular places in India : भारतातील प्रसिद्ध स्थळे | https://mpsc.pro/popular-places-in-india/ |
DayLight Saving Time (DST) : एक संक्षिप्त इतिहास और इसका प्रभाव | https://mpsc.pro/daylight-saving-time-dst/ |
Cities in India and its importance : भारतातील विशेष शहर | https://mpsc.pro/cities-in-india-and-its-importance/ |
The First lady in India : भारतातील सर्वप्रथम महिला | https://mpsc.pro/the-first-lady-in-india/ |