Municipal Corporations-1949 मध्ये “बॉम्बे प्रॉव्हिन्शिअल मुन्सिपल कार्पोरेशन ॲक्ट” समंत करण्यात आला. त्यानुसार, 1950 पर्यंत राज्यात मुंबई महानगरपालिका ही एकमेव महानगरपालिका अस्तित्वात होती.
भारतातील सर्वात जुनी महानगरपालिका 1687 मध्ये चेन्नई (मद्रास) येथे अस्तित्वात आली.
महाराष्ट्रात नगरपालिका क्षेत्राची लोकसंख्या 5 लाखाच्या पुढे गेली की, तेथे महानगरपालिका अस्तित्वात येते.
नगरपालिकेचे महानगरपालिकेत रूपांतर करण्याबाबत अंतिम निर्णय राज्य शासन घेते.
जून 2023 अखेर पर्यंत राज्यात 29 महानगरपालिका कार्यरत आहेत.

अ.क्र. | महानगरपालिका | जिल्हा | स्थापना |
1 | बृहन्मुंबई | – | 1889 |
2 | पुणे | पुणे | 1950 |
3 | नागपूर | नागपूर | 1951 |
4 | सोलापूर | सोलापूर | 1964 |
5 | कोल्हापूर | कोल्हापूर | 1972 |
6 | ठाणे | ठाणे | 1998 |
7 | पिंपरी चिंचवड | पुणे | 1982 |
8 | नाशिक | नाशिक | 2001 |
9 | कल्याण डोंबिवली | ठाणे | 1982 |
10 | औरंगाबाद | औरंगाबाद | 1982 |
11 | अमरावती | अमरावती | 1983 |
12 | नवी मुंबई | 1982 | |
13 | नांदेड वाघाळा | नांदेड | 1987 |
14 | उल्हासनगर | ठाणे | 1998 |
15 | सांगली-मिरज-कुपवाड | सांगली | 1998 |
16 | अकोला | अकोला | 2001 |
17 | मालेगाव | नाशिक | 2001 |
18 | मीरा-भाईंदर | ठाणे | 2002 |
19 | भिवंडी-निजामपूर | ठाणे | 2002 |
20 | जळगाव | जळगाव | 2003 |
21 | अहमदनगर अहिल्यानगर | अहमदनगर अहिल्यानगर | 2003 |
22 | धुळे | धुळे | 2003 |
23 | वसई विरार | पालघर | 2009 |
24 | लातूर 2011 | लातूर | 2011 |
25 | चंद्रपूर | चंद्रपूर | 2012 |
26 | परभणी | परभणी | 2012 |
27 | पनवेल | रायगड | 2016 |
28 | इचलकरंजी | कोल्हापूर | 2022 |
29 | जालना | जालना | 2023 |
राज्यातील इचलकरंजी (ता. हातकणंगले जि. कोल्हापूर) येथे 30 जून 2022 मध्ये महानगरपालिका अस्तित्वात आली. जालना ही 29 वी महानगरपालिका आहे.
पुढे वाचा
Sankhya Aani Sankhyanche Prakar : संख्या व संख्यांचे प्रकार | https://mpsc.pro/sankhya-aani-sankhyanche-prakar/ |
Vibhajatechya kasotya : विभाजतेच्या कसोट्या | https://mpsc.pro/vibhajatechya-kasotya/ |
MPSC Pre exam 2024 : महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा-२०२४ | https://mpsc.pro/mpsc-pre-exam-2024/ |
Shahu Maharaj : राजश्री शाहू महाराज | https://mpsc.pro/shahu-maharaj/ |
Lasavi Masavi : मसावी व लसावी | https://mpsc.pro/lasavi-masavi/ |
MPSC Pre exam 2024 syllabus : अभ्यासक्रम | https://mpsc.pro/mpsc-pre-exam-2024-syllabus/ |
Online Exam GK-02 | https://mpsc.pro/online-exam-gk-02/ |
महानगरपालिकेची रचना –
नागरी लोकसंख्येच्या आधारे महानगरपालिकांची चार गटात विभागणी केली जाते. शहराच्या वेगवेगळ्या प्रभागामधून (वार्डस) महानगरपालिकेच्या सदस्यांची प्रत्यक्ष प्रौढ मतदानाने निवड केली जाते.
महानगरपालिका सदस्य संख्या (लोकसंख्येच्या तुलनेत)-
3 ऑगस्ट 2022 चा राज्य शासनाचा निर्णय. महानगरपालिका निवडणुका 2017 च्या प्रभाग रचनेनुसार सदस्य संख्या
लोकसंख्या | मनपा सदस्य |
सहा लाख ते बारा लाख | 65 ते 85 |
12 लाख ते 24 लाख | 115 ते 151 |
24 लाख ते 30 लाख | 151 ते 161 |
तीस लाखाहून अधिक | 161 ते 175 |
महानगरपालिकेतील आरक्षण –
महिला प्रतिनिधींसाठी 50%, नागरिकांच्या मागास प्रवर्गासाठी 27%, अनुसूचित जाती जमातींना एकूण लोकसंख्येशी असलेल्या त्यांच्या लोकसंख्येच्या प्रमाणात काही जागा राखीव असतात.
कार्यकाल –
महानगरपालिकेच्या निवडणुका दर 5 वर्षांनी होतात. साहजिकच सदस्यांचा कार्यकाल हा 5 वर्षाचा असतो. महानगरपालिकेच्या सदस्यांना देखील “नगरसेवक” असे म्हटले जाते.
महापौर व उपमहापौर :
प्रत्यक्ष निवडून येणाऱ्या नगरसेवकांमार्फत एकाची महापौर व दुसऱ्याची उपमहापौर म्हणून निवड केली जाते.
महापौरास शहराचा “प्रथम नागरिक” असे म्हटले जाते.
महापौर व उपमहापौर यांचा कार्यकाल अडीच वर्षाचा असतो.
महापौर हा महानगरपालिकेचा कार्यकारी प्रमुख असतो.
महापौराच्या अनुपस्थितीत उपमहापौर त्यांचे कार्य पाहतात.
राजीनामा–
महानगरपालिकेचे नगरसेवक आयुक्तास लेखी नोटीस देऊन आपल्या पदाचा राजीनामा देऊ शकतात.
उपमहापौर महापौरांना लेखी नोटीस देऊन आपल्या पदाचा राजीनामा देऊ शकतात.
महापौर आपला राजीनामा उपविभागीय आयुक्तांकडे देऊ शकतात.
महापौरांची कार्य –
महानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेच्या बैठका बोलावणे व त्यांच्या अध्यक्षस्थान स्वीकारणे.
महापराचे महानगरपालिकेच्या कर्मचारी व अधिकाऱ्यांवर पूर्ण नियंत्रण असते.
महानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेची बैठक तीन महिन्यातून एकदा होते.
महानगरपालिका आयुक्त :
महानगरपालिका आयुक्त हा भारतीय प्रशासन सेवेतील(IAS) जेष्ठ अधिकारी असतो.
महानगरपालिका आयुक्ताची निवड संघ लोकसेवा आयोग (UPSC) द्वारे केली जाते व नेमणूक राज्य शासन करते.
आयुक्त हा महानगरपालिकेचा प्रमुख प्रशासकीय अधिकारी आहे.
महानगरपालिकेचा प्रशासकीय कारभार आयुक्तांतर्फे चालवला जातो.
महानगरपालिकेचा अर्थसंकल्प आयुक्त तयार करतो.
आयुक्त महानगरपालिकेचा सचिव म्हणून देखील काम पाहतो.
महानगरपालिका व राज्य शासन यामध्ये दुवा साधण्याचे कार्य आयुक्त करतो.
महानगरपालिकेच्या समित्या –
प्रशासकीय सोयीसाठी स्थायी समिती या मुख्य समितीसह महानगरपालिकेत परिवहन समिती, नगरनियोजन समिती, प्रभाग समिती, शिक्षण समिती, आरोग्य समिती, कायदा समिती इत्यादी समित्यांची रचना केली जाते.
महानगरपालिकेच्या उत्पन्नाची साधने –
राज्य शासनाकडून मिळणारी अनुदाने, स्थानिक कर्जे, पाणीपट्टी, घरपट्टी, जकात, स्थानिक उपकर(LBT) इत्यादी कर.
स्वतःची मालमत्ता विकून मिळवलेले उत्पन्न.
2010-11 पासून राज्य शासनाने जकात रद्द करून त्याऐवजी “स्थानिक उपकर”(LBT) आकारण्यास सुरुवात केली होती. 1 ऑगस्ट 2015 पासून राज्यातील 25 महानगरपालिकांमधील LBT रद्द करण्याची घोषणा केली.
50 कोटींपेक्षा कमी उलाढाल असलेल्या व्यापाऱ्यांना LBT मधून सूट आहे.
महानगरपालिकेचे कार्य –
सार्वजनिक पाणीपुरवठा आरोग्य सेवांची उपलब्धता करून देणे.
जन्म मृत्यूची नोंद ठेवणे.
रोगराई निर्मूलन, स्वच्छता कार्यक्रमाची अंमलबजावणी करणे.
प्राथमिक व माध्यमिक शिक्षण, क्रीडांगणे, उद्याने, बगीचे सार्वजनिक वाचनालय आदींची स्थापना करणे.
सार्वजनिक रुग्णालय व दवाखाने स्थापन करणे. पशुसंवर्धन केंद्राची व्यवस्था करणे. रस्त्यावरील दिव्याची सोय करणे.
नगरातील धोकादायक इमारती पाडणे. स्मशानभूमीची व्यवस्था करणे. रोगांबाबत प्रतिबंधक व्यवस्था करणे. गलिच्छ वस्ती सुधारणे. सांडपाणी वाहून जाण्यासाठी गटाराची व्यवस्था करणे.
मुंबईचे नगरपाल (शेरीफ) –
मुंबईचे नगरपाल (शेरीफ) हे वैधानिक दर्जा नसलेले मात्र प्रतिष्ठेचे पद आहे.
मुंबईचा नगरपालाचा (शरीफ) कालावधी एक वर्षाचा असतो. शेरिफ उच्च न्यायालयाचा अधिकारी असतो.
शरीफ चे कार्यालय उच्च मुंबई उच्च न्यायालयाच्या इमारतीत असते.
शरीफचा दर्जा महापौरानंतर असतो.
नगरपालांची नियुक्ती राज्य सरकारची समिती करते. मुख्यमंत्री या समितीचे प्रमुख असतात.
बिगर राजकीय क्षेत्रात चांगले कार्य करणाऱ्या व्यक्तीस हे पद देण्यात येते.
शेरीफ उच्च न्यायालयाचा अधिकारी असतो, मात्र त्यांना कार्यकारी अधिकार नसतात.
नगरपालाचे कार्य – न्यायालयाच्या वतीने समंजस बजावणे, लिलाव करणे, परदेशी व्यक्तीचे स्वागत करणे, नाममंत व्यक्तीच्या निधनानंतर शोक सभा आयोजित करणे.
मुंबईचे पहिले नगरपाल भाऊ दाजी लाड (1869) होते.
स्वातत्र्यानंतर मुंबईचे पहिले नगरपाल महादेव लक्ष्मण डहाणूकर (1948), सुनील गावस्कर (1995), उषा किरण (1997), किरण शांताराम (2002), विजयपंथ सिंघानिया (2006), डॉ. इंदू साहनी (2008) आदी व्यक्तींनी मुंबईचे शरीफ पद भूषवले आहे.
भारतातील मुंबई व कोलकाता या दोनच शहरात नगरपाल हे पद अस्तित्वात आहे.