Waradvinayk Mandir वरदविनायक गणपती मंदिर हे रायगड जिल्ह्यातील महड या गावात आहे. हे मंदिर अष्टविनायकापैकी एक असून अष्टविनायकातील चौथा गणपती म्हणून महडचा Waradvinayk Mandir वरदविनायक ओळखला जातो. हे स्थान स्वयंभू असून त्याला मठ असेही म्हणतात. ऋषी गृत्समद यांनी श्री गणेशाची येथे स्थापना केली. इच्छा पूर्ण करणारा म्हणून त्यास Waradvinayk Mandir वरदविनायक असे म्हटले जाऊ लागले. हे मंदिर पेशवे काळात बांधण्यात आले.
श्री वरदविनायकाचे मंदिर साधे कौलारू असून मंदिराला घुमट आहे व त्याला सोनेरी कळस आहे. हे मंदिर हेमांडपंथी आहे. परंतु सभा मंडप हा आधुनिक तंत्रज्ञानाने बांधण्यात आला आहे. कळसावर नागाची नक्षी आहे. कळसाच्या वरचा भाग सोन्याचा आहे. मंदिराच्या चारही कोपऱ्याला चार हत्तीच्या मूर्ती आहेत. ज्यामुळे मंदिराच्या स्थापत्य कलेला एक अद्वितीय सौंदर्य प्राप्त होते. श्री गणेशाची मूर्ती पूर्वाभिमुख आहे. मूर्तीच्या बाजूला एक दिवा तेवत(पेटलेला) असतो. तो सदाकाल पेटलेला असतो. वरदविनायक हे स्वयंभू स्थान असून त्याला मठ असेही म्हणतात.
मंदिर चिरेबंदी आहे. इथे आपल्याला दोन मुर्त्या दिसतात. एक गाभाऱ्यात आणि एक गाभाऱ्याच्या बाहेर. गाभाऱ्याच्या आत एक मूर्ती शेंदुराने माखलेली असून तिची सोंड डावीकडे आहे. आणि दुसरी आहे ती शुभ्र संगमरवरी असून तिची सोंड उजवीकडे आहे. मंदिरात दगडी महिरप असून गणेशाची मूर्ती सिंहासनावररूढ आहे. हे एकच असे मंदिर आहे जिथे भक्त मूर्ती च्या जवळ जाऊन स्वतः हा नैवेद्य दाखवू शकतात.
कथेनुसार, गृत्समद नावाचा ऋषी होता. त्याचा जन्म इंद्र आणि त्याची आई मुकुंदा यांच्या अनैतिक संबंधामुळे झाला होता. हे समजल्यावर गृत्समदाने त्याच्या आईला शाप दिला व तो एका भद्रक वनात तपश्चर्या करायला गेला. त्याने विनायकाची आराधना केली व श्री विनायक त्याला प्रसन्न झाले आणि त्याला वर मागण्यास सांगितले तेव्हा, त्याने गणपतीकडे अशी मागणी केली की, तुम्ही या वनात वास्तव्य करा आणि सर्व भक्तांच्या इच्छा पूर्ण करा. ते मान्य करून विनायक तेथे राहू लागले. हेच ते भद्रक वन म्हणजेच आताचे महड होय. या ठिकाणी गृत्समदाला श्री गणेशाने वर दिला म्हणून येथे विनायकाला वरदविनायक असे म्हणतात.
गणेश चतुर्थी आणि माघ प्रतिपदा ते पंचमी या दिवसात येथे उत्सव साजरा केला जातो.
पुढे वाचा –
Rivers and Cities : भारतातील नद्या व नदीकाठची शहरे | https://mpsc.pro/rivers-and-cities/ |
Irrigation projects : भारतातील जलसिंचन प्रकल्प | https://mpsc.pro/irrigation-projects/ |
Bara Jyotirling : बारा ज्योतिर्लिंग देवस्थाने | https://mpsc.pro/bara-jyotirling/ |