Manmath Swami श्री मन्मथ स्वामी मंदिर हे बीड जिल्ह्यातील कपिलधारवाडी या ठिकाणी आहे. श्री क्षेत्र कपिलधार येथे संत शिरोमणी Manmath Swami मन्मथ स्वामी यांची संजीवन समाधी आहे. या मंदिराच्या जवळच कपिलधार नावाचा धबधबा आहे. श्री क्षेत्र कपिलधार हे लिंगायत समाजाचे श्रद्धास्थान म्हणून महाराष्ट्रातच नव्हे तर, देशामध्ये ओळखले जाते.
हे मंदिर अत्यंत सुंदर आहे. मंदिराच्या समोरच दोन धबधबे आहेत. ते अतिशय सुंदर आहेत. पावसाळ्यातील हे दृश्य अतिशय मनमोहक असते.
बीड जिल्हा संतांची भूमी म्हणून ओळखला जातो. संत महादेव बाबा, संत भगवान बाबा, संत वामनभाऊ, संत ज्ञानेश्वर माऊली यासारखे संत जिल्ह्यात होऊन गेले. अनेक वर्षाच्या कालखंडामध्ये त्यांनी कीर्ती गाजवली महाराष्ट्र मध्ये दोन संत असे होऊन गेले की, त्यांनी संजीवन समाधी घेतली. संत ज्ञानेश्वर आणि संत मन्मथ स्वामी या दोन संतांनी महाराष्ट्राच्या भूमीमध्ये जिवंत समाधी घेतली आहे.
मन्मथ स्वामी यांची 459 वर्षापासून कार्तिक पौर्णिमेला या ठिकाणी मोठी यात्रा भरते. मन्मथ स्वामी यांचा जन्म बीड जिल्ह्यातून नेकनूर या गावी झाला. मन्मथ स्वामी यांच्या आई पार्वती आणि वडील शिवलिंग स्वामी यांच्या पोटी जन्म झाला. स्वामीचा जन्म दिनोदर बाबा यांच्या आशीर्वादाने झाला होता.
या ठिकाणी कपिल मुनी यांचे वास्तव्य होते. कपिल मुनी यांची गंगासागर येथे समाधी आहे. कपिल मुनी हे तपस्वी असल्यामुळे त्यांनी हे क्षेत्र दिनोदर बाबा यांना दान दिले. दिनोदर बाबा हे एक तपस्वी महाराज होते. ते या ठिकाणी असलेल्या पंचकुंडाच्या ठिकाणी गुप्त झाले. त्या अगोदर दिनोदर बाबा यांनी हे तीर्थक्षेत्र मन्मथ स्वामी यांना स्वाधीन केलं होतं. मन्मथ स्वामी यांनी या ठिकाणी तपश्चर्या करून वयाच्या 26 व्या वर्षी संजीवन समाधी घेतली. या पौर्णिमेला त्रिपुरी पौर्णिमा असेही म्हणतात. या ठिकाणी अनेक भाविक राज्यातूनच नव्हे तर, इतर राज्यातून देखील मोठ्या प्रमाणात येतात. मन्मथ स्वामी यांची कर्मभूमी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कपिलधार या ठिकाणी गेले 459 वर्षांपूर्वीची ही परंपरा व लिंगायत समाजाचे श्रद्धास्थान म्हणून ओळखले जाते.
या ठिकाणी यात्रेमध्ये भावीक लाखोंच्या संख्येने येतात. जिवंत संजीवनी समाधी घेणारे हे महाराष्ट्रातील दुसरे संत म्हणून ओळखले जातात. मन्मथ स्वामी यांनी “परम रहस्य” हा ग्रंथ या कपिलधार या ठिकाणी लिहिला. अनेक भागातून या ठिकाणी दिंड्या येतात व सर्व समाज एकत्र येतो. श्रीक्षेत्र कपिलधार या ठिकाणी श्रावण महिन्यात मोठी यात्रा भरते. या परिसराच्या आजूबाजूला धबधबे आहेत. हा परिसर पावसाळ्यात एक पर्यटन क्षेत्र बनतो. हे क्षेत्र डोंगराच्या मध्ये आहे. कपिलधार या तीर्थक्षेत्राला निसर्गरम्य असे वातावरण आहे.
पावसाळ्याच्या दिवसात कपिलधार धबधब्यावर पर्यटक तसेच भाविकांची मोठी गर्दी असती असते. कार्तिकी पौर्णिमेला येथे उत्सव साजरा केला जातो. माघ शुद्ध पंचमीला स्वामींचा जन्मोत्सव, फाल्गुन चतुर्थीला समाधीस्थ झालेला दिवस असतो. श्रावण महिन्याच्या तिसऱ्या सोमवारी येथे मोठी यात्रा असते.