Ashakar Chalval : असहकार चळवळ
- Ashakar Chalval असहकार चळवळ ही 4 सप्टेंबर 1920 रोजी महात्मा गांधी यांनी भारतीयांनी ब्रिटिश सरकारकडून त्यांचे सहकार्य मागे घेण्यासाठी सुरू केलेली राजकीय मोहीम होती.
- गांधीजींच्या नेतृत्वाखाली सुरू झालेल्या या चळवळीला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असला तरीही चळवळ अचानक स्थगित केली गेल्याने या चळवळीचे उद्दिष्ट साध्य होऊ शकले नाही. परंतु, ही चळवळ पूर्णपणे अयशस्वी झाली असेही म्हणता येणार नाही.
- भारताच्या स्वातंत्र आंदोलनात या चळवळीने दिलेले योगदान अतिशय महत्त्वपूर्ण असून संपूर्ण स्वातंत्र चळवळीला एक वेगळी दिशा देण्याचे कार्य या असहकार चळवळीने केले आहे.
- अन्याय करणाऱ्या सरकार बरोबर कोणत्याही परिस्थितीत सहकार्य करायचे नाही, त्यांची नोकरी करायची नाही, त्यांच्या शाळा, महाविद्यालयात जायचे नाही, त्यांच्या न्यायालयात वकिली करायची नाही, स्वदेशी वस्तूंचा वापर करायचा, परकीय मालावर बहिष्कार टाकायचा अशा स्वरूपाच्या असहकार चळवळीची देशभर 1920 पासून सुरू झाली.
- 4 सप्टेंबर 1920 मध्ये लाला लजपतराय यांच्या अध्यक्षतेखाली भरलेल्या काँग्रेसच्या खास अधिवेशनात गांधीजींनी असहकार चळवळीचा ठराव मांडला व या अधिवेशनात हा ठराव मंजूर करण्यात आला.
- या अधिवेशनाचे अध्यक्ष चक्रवर्ती विजय राघवाचार्य हे होते व ही चळवळ देशभर सुरू झाली. असहकार चळवळ सतत दोन वर्षे चालू होती.
- महाराष्ट्रात असहकार चळवळीस जोरदार पाठिंबा मिळाला.
- गांधीजींनी सांगितल्याप्रमाणे स्वराज्य एका वर्षात साध्य झाले नाही. पण या आंदोलनाच्या व्याप्तीमुळे ब्रिटिश सरकार स्तब्ध झाले होते त्यामुळे ब्रिटिश सरकार हादरले होते.
- असहकार चळवळीत हिंदू आणि मुस्लिम दोघांचाही सहभाग होता. ज्यामुळे देशातील जातीय सलोखा दिसून आला.
- असहकार चळवळीने लोकांमध्ये काँग्रेस पक्षाची लोकप्रियता स्थापित केली.
- असहकार चळवळीमुळे लोकांना त्यांच्या राजकीय हक्कांची जाणीव झाली.
- ब्रिटिश वस्तूंवर बहिष्कार टाकल्यामुळे या काळात भारतीय व्यापारी आणि गिरणी मालकांना चांगला नफा झाला व खादीला प्रोत्साहन देण्यात आले.
- या काळात ब्रिटनमधून साखरेची आयात बरीच कमी झाली.
- या चळवळीने गांधीजींना जनतेचे नेते म्हणून स्थापित केले.
Tags
Asahakar chalawal, असहकार चळवळ,
Post Comment