Cantonment Boards
- कटक मंडळ हा नागरी स्थानिक शासन संस्थांचा एक वैशिष्ट्यपूर्ण प्रकार आहे.
- राज्याच्या ठिकाणी लष्करी छावण्या असतात, तेथील नागरी भागातील प्रशासकीय कारभार कटक मंडळांमार्फत चालवला जातो.
- भारतात कटक मंडळांची स्थापना ब्रिटिश काळात झालेली आहे व त्यांची प्रशासन 1924 च्या कॅन्टोन्मेंट बोर्ड अॅक्ट नुसार चालत होते. मात्र संसदेने 2006 मध्ये “कॅन्टोन्मेंट अॅक्ट 2006” पास केला. हा कायदा सर्वांसाठी लागू आहे.
- सध्या भारतातील सर्व कटक मंडळाचा राज्यकारभार “कॅन्टोन्मेंट अॅक्ट 2006 नुसार चालतो.
- कटक मंडळावर भारत सरकारच्या संरक्षण मंत्रालयाचे थेट नियंत्रण असते.
- भारतातील सर्वात पहिले कटक मंडळ बराकपूर, पश्चिम बंगाल (1765).
- भारतातील सर्वात मोठे कटक मंडळ कानपूर, उत्तर प्रदेश (1811).
- अहमदनगर कटक मंडळ हे राज्यातील सर्वात मोठे कटक मंडळ आहे.
कटक मंडळाची रचना –
कटक मंडळामध्ये प्रत्यक्ष निवडून आलेले तसेच पदसिद्ध व नामनिर्देशित असे एकूण 15 सदस्य असतात.
कटक मंडळात तीन प्रकारच्या सदस्यांचा समावेश असतो-
छावणीचा प्रमुख लष्करी अधिकारी (स्टेशन कमांडर), लष्करी रुग्णालय प्रमुख वैद्यकीय अधिकारी आणि छावणी अभियंता या पदसिद्ध सदस्यांचा कटक मंडळात समावेश असतो.
सदस्य संख्या – 8 निर्वाचित सदस्य, 3 पदसिद्ध सदस्य, 3 नामनिर्देशित लष्करी सदस्य, जिल्हा दंडाधिकारी यांचा 1 सदस्य.
- छावणीचा प्रमुख लष्करी अधिकारी (स्टेशन कमांडर) हा कटक मंडळाचा पदसिद्ध अध्यक्ष असतो.
- निवडून आलेल्या प्रतिनिधींमधून एकाची उपाध्यक्ष म्हणून निवड केली जाते.
- संरक्षण मंत्रालयाकडून 1 मुख्य कार्यकारी अधिकाऱ्याची नेमणूक केली जाते व तो स्थानिक रहिवासी आणि लष्कर यांच्यातील दुवा असतो. तो कटक मंडळाचा सचिव आणि सल्लागार म्हणून काम करतो.
- कटक मंडळे प्रतिनिधिक शासनाच्या लोकशाही तत्वाशी विसंगत आहेत असे वाटते, परंतु देशाच्या संरक्षणाची गरज लक्षात घेता त्यांचे अस्तित्व महत्त्वाचे ठरते.
- जून 2023 अखेर भारतात एकूण 62 कटक मंडळे आहेत. त्यापैकी 7 कटक मंडळे महाराष्ट्रात आहेत.
महाराष्ट्रातील कटक मंडळे
जिल्हा | कटक मंडळ |
1.पुणे | देहू |
2.पुणे | खडकी |
3.पुणे | पुणे कॅम्प |
4.नाशिक | देवळाली |
5.अहमदनगर | अहमदनगर |
6.छत्रपती संभाजीनगर | छत्रपती संभाजीनगर |
7.नागपूर | कामठी |
Shahu Maharaj : राजश्री शाहू महाराज | https://mpsc.pro/shahu-maharaj/ |
Lasavi Masavi : मसावी व लसावी | https://mpsc.pro/lasavi-masavi/ |
MPSC Pre exam 2024 syllabus : अभ्यासक्रम | https://mpsc.pro/mpsc-pre-exam-2024-syllabus/ |
Online Exam GK-02 | https://mpsc.pro/online-exam-gk-02/ |