Deputy Collector
- जिल्ह्यातील काही तालुक्यांचा समावेश करून प्रांत तयार केला जातो. त्यासाठी प्रांताधिकारी किंवा उपजिल्हाधिकारी Deputy Collector यांची प्रशासकीय प्रमुख म्हणून निवड केली जाते.
- महसुलाच्या उपविभागावर उपजिल्हाधिकारी किंवा प्रांताधिकारी हा अधिकारी नेमला जातो.
- कार्यक्षेत्र- उपविभाग (प्रांत) जिल्ह्यातील काही तालुके.
- निवड– दोन प्रकारे
प्रांताअधिकारी (UPSC) संघ लोकसेवा आयोगाद्वारे प्रशिक्षणार्थी अधिकाऱ्याची निवड.
Deputy Collector-उपजिल्हाधिकारी- महाराष्ट्र लोकसेवा आयोगाद्वारे.
- नियुक्ती- संबंधित राज्य शासनामार्फत केली जाते.
- उपजीधलाधिकाऱ्यास कार्यक्षेत्रातील कामाच्या स्वरूपानुसार उपविभागीय अधिकारी, प्रांताधिकारी, उपविभागीय दंडाधिकारी, उपविभागीय निवडणूक अधिकारी अशा विविध जबाबदाऱ्या पार पाडाव्या लागतात.
- महसूल विषयक बाबतीत जिल्हाधिकारी व तहसीलदार यांच्यामध्ये समन्वय साधणारा दुवा म्हणून जिल्हाधिकारी किंवा प्रांताधिकारी कार्य करतो.
- उपजिल्हाधिकारी हा प्रांताचा प्रशासकीय प्रमुख असतो.
- उपविभागात कायदा व सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी उपजिल्हाधिकाऱ्याची असते.
- जिल्हाधिकारी जी कामे जिल्ह्यात करतो तीच कामे प्रांताधिकारी किंवा उपजिल्हाधिकाऱ्यास उपविभागात करावी लागतात.