diwali दिवाळी हा एक हिंदू सण आहे. जो दिव्यांचा सण म्हणून ओळखला जातो. दिवाळी हा भारतातील सर्वात मोठा सण आहे, कदाचित जगातील सर्वात तेजस्वी उत्सव आहे. विविध धर्माचे लोक दिवाळी साजरी करतात.
दिवाळीला-diwali दीपावली म्हणूनही ओळखले जाते. दिवाळी हा सण हिंदू कॅलेंडरनुसार दरवर्षी कार्तिक महिन्याच्या अमावस्येला येतो. इंग्रजी कॅलेंडरनुसार मुख्यतः ऑक्टोबरच्या शेवटच्या आठवड्यात किंवा नोव्हेंबरच्या सुरुवातीच्या दिवसात येतो.
दिवाळी हा पाच दिवसांचा उत्सव असतो जो आनंदाने साजरा केला जातो.
दिवाळी हा सण अंधारावर प्रकाशाचा विजय दर्शवतो याचा अर्थ वाईटावर चांगल्याचा आणि अज्ञानावर ज्ञानाचा विजय असाही होतो. हा दिव्यांचा उत्सव म्हणून ओळखला जातो त्यामुळे दिवाळीच्या काळात संपूर्ण देशात लख्ख दिवे असतात.
जवळपास एक महिन्या आधीपासूनच सर्वजण दिवाळी या सणाच्या तयारीला लागतात. दिवाळी या सणासाठी प्रत्येक जण नवीन कपडे,फटके,दिवे,आकाशकंदील खरेदी करतात. घराची साफसफाई करतात व खाण्यासाठी फराळाचे वेगवेगळे पदार्थ बनवतात जसे की लाडू, शेव, करंजी, चकली, जिलेबी,अनारसे, बालुशाही, चिवडा इत्यादी…. दिवाळी या सणाला एकमेकांना शुभेच्छा दिल्या जातात व आपल्या घरी फराळासाठी इतरांना आमंत्रित केले जाते.
दिवाळी या सणाच्या निमित्ताने लोक वादविवाद विसरून एकमेकांना शुभेच्छा देतात. त्यामुळे दिवाळीत मैत्री आणि नाती अधिक घट्ट होतात. लोक त्यांच्या अंतकरणातील द्वेषाच्या सर्व भावना काढून टाकतात.
दिवाळीच्या दिवशी लोक एकमेकांच्या घरी जातात व फराळाचा आनंद घेतात व फटाके वाजवतात. दिवाळी या सणाला रात्री सर्वत्र रोषणाई केलेली असते. सर्व घरांवर, दुकानांवर लायटिंग केलेली असते. दिवे लावलेले असतात, म्हणून सर्वत्र प्रकाशच प्रकाश असतो. हा सुंदर सण समृद्धी घेऊन येतो.
दिवाळी हा पाच दिवसांचा सण आहे. जो आनंदाने साजरा केला जातो. दिवाळीचा पहिला दिवस धनत्रयोदशी, दुसरा दिवस नरक चतुर्दशी किंवा छोटी दिवाळी, तिसरा दिवस मुख्य दिवाळी किंवा लक्ष्मीपूजन, चौथा दिवस बलिप्रतिपदा किंवा पाडवा किंवा गोवर्धन पूजन, पाचवा दिवस भाऊबीज म्हणून ओळखला जातो. दिवाळी या सणाच्या पाच दिवसांपैकी प्रत्येकाची स्वतःची धार्मिक आणि सांस्कृतिक श्रद्धा आहे.
दिवाळीच्या पहिल्या दिवशी अभ्यंग स्नान करण्याची प्रथा आहे. दिवाळीच्या पहिल्या दिवशी पहाटेच उठून मस्त अंगाला उठणं लावून आंघोळ केली जाते. दारासमोर रांगोळी काढले जाते. व नंतर अनिष्ट प्रवृत्तीचा नाश किंवा वाईटाचा नाश म्हणून सहकुटुंब दिवाळीचा फराळ खाल्ला जातो.
लक्ष्मीपूजनाच्या दिवशी लक्ष्मी देवीची पूजा केली जाते. लक्ष्मी माता प्रसन्न राहण्यासाठी घरातील धन, पैसा, सोने याची पूजा केली जाते व यामध्ये वाढ व्हावी आणि आनंद कायम टिकून राहावा अशी मनोभावे प्रार्थना केली जाते.
धनत्रयोदशीच्या दिवशी आरोग्याची देवता धन्वंतरी पूजनासोबतच लक्ष्मी आणि कुबेराची पूजा केली जाते.
दिवाळीतील पाडवा हा अत्यंत महा महत्त्वाचा असा दिवस आहे. हिंदू धर्मानुसार मानला जाणाऱ्या साडेतीन मुहूर्तापैकी हा एक मुहूर्त आहे. लक्ष्मीपूजन झाल्यानंतर पाडवा असतो सोने खरेदी आणि व्यापारासाठी नव्या वर्षाची ही सुरुवात असते या दिवशी पतीलाही ओवाळण्याची करण्याची पद्धत आहे.
बहिण भावाच्या नात्याचे बंद जोपासणारा हा सण म्हणजे भाऊबीज दिवाळीची सांगता या दिवसांनी होते. या दिवशी बहिण भावाला ओवाळते आणि त्याच्या दीर्घ आयुष्यासाठी प्रार्थना करते. भावाने ओवाळणी म्हणून बहिणीला भेटवस्तू द्यावी लागते.
दिवाळीत सगळं वातावरण एकदा एकदम वेगळे झालेला असतं. दारोदारी रांगोळी काढलेली असते. घरोघरी वेगवेगळ्या आकाराचे कंदील लावले जातात. दारात दिवे लावले जातात. रांगोळी हे सौंदर्य आणि मांगल्याचे प्रतीक मानले जाते.
दिवाळी हा सण लहानांपासून थोरांपर्यंत सगळ्यांना आवडतो. हा सण आपल्याला शिकवतो की चांगल्याच्या वाईटावर नेहमी विजय होतो आणि आपण अंधकाराचे निर्मूलन प्रकाशाने केले पाहिजे. प्रत्येक भारतीय घरात दिवाळीच्या वेळी उत्साहाचे वातावरण पाहायला मिळते. दिवाळीच्या या सणांमध्ये पाच दिवस सर्वत्र रोषणाई असते. फटाक्यांचा आवाज येतो. आणि शाळेला कॉलेजला ऑफिसला सुट्टी असल्यामुळे सर्वजण हा सण साजरा करू शकतात.
दिवाळी हा सण सर्व भारतीयांचा आवडता सण आहे. या सणाची प्रत्येक जण आतुरतेने वाट पाहत असतो, थोडक्यात सांगायचे झाले तर, भारतात दिवाळी हा एक मोठा आनंदाचा सण आहे. दिवाळी सण आपल्याला प्रेम, मैत्री आणि बंधुत्वाचा संदेश देतो, त्यामुळे आपण दिवाळीला गरजू व्यक्तींना नवीन कपडे, मिठाई आणि पैसे दिले पाहिजे जेणेकरून त्यांनाही या सणाचा आनंद घेता येईल. दिवाळी या सणामध्ये लहान मुलांना फटक्यामुळे इजा होणार नाही याची काळजी देखील घेतली पाहिजे व फटक्यामुळे प्रदूषण होणार नाही याची देखी काळजी घेतली पाहिजे.