Grampanchayat Secretary : ग्रामपंचायत सचिव ग्रामसेवक

Grampanchayat Secretary ग्रामसेवक हा ग्रामपंचायतीचा पदसिद्ध सचिव असतो.

ग्रामसेवक हा ग्रामपंचायतीचा  चिटणीस म्हणून काम पाहतो.

शासकीय दृष्ट्या ग्रामसेवक हा जिल्हा परिषदेच्या ग्रामविकास खात्याचा वर्ग तीन मधील सेवक आहे.

ग्रामसेवक हा मुख्य कार्यकारी अधिकाऱ्याचा ग्राम पातळीवरील प्रतिनिधी असतो.

ग्रामसेवक हा ग्रामीण विकास खात्याचा शेवटचा प्रशासक असतो.

ग्रामसेवक हा जिल्हा परिषदेचा सेवक असतो. तो ग्रामपंचायतीचा कधीच सेवक नसतो.

ग्रामसेवकाचे वेतन ग्रामनिधीतून न देता ते जिल्हा निधीतून दिले जाते.

निवड: प्रत्येक ग्रामपंचायतीसाठी अथवा अपवादात्मक परिस्थिती दोन किंवा अधिक ग्रामपंचायतसाठी एका ग्रामसेवकाची नेमणूक करण्याचे तसेच ग्रामसेवकाची बदली व बढती तसेच निलंबनाबाबतचे अधिकार जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यास असतात.

पुढे हे हि वाचा : ग्रामपंचायत सरपंच

ग्रामसेवकाची कार्य

  • ग्रामपंचायतच्या निर्णयांची अंमलबजावणी करणे.
  • गावातील जन्म-मृत्यू, विवाह इत्यादींची नोंद ठेवणे.
  • पाणीपट्टी, घरपट्टी इत्यादी करांची वसुली करणे.
  • ग्रामपंचायतीचा आर्थिक व्यवहार सांभाळणे.
  • ग्रामनिधी वर नियंत्रण ठेवणे.
  • ग्रामसभेचा अहवाल करणे.
  • गावातील बालविवाह रोखण्याची जबाबदारी असते.
  • ग्रामपंचायतचे अंदाजपत्रक तयार करणे.
  • ग्रामपंचायतच्या ठरावाची अंमलबजावणी करणे.
  • सामाजिक शिक्षण देण्याचे काम करणे. गावातील लोकांना आरोग्य, शिक्षण, ग्रामविकास याबाबतीत सल्ला देणे.
  • गावातील लोकांना ग्रामविकास चा बाबतच्या वेगवेगळ्या योजनांची माहिती देणे.
  • जनतेला वेगवेगळ्या प्रकारचे दाखले देणे.
  • वृक्षारोपण स्वच्छाल शौचालयय व स्वच्छता याबाबत जागृती व कामे करणे
  • आपत्कालीन समिती सचिव म्हणून काम पाहणे.
  • ग्रामपंचायतीच्या सभा व ग्रामसभांना उपस्थित राहून (इतिवृत्त) अहवाल लिहिणे.
  • विस्ताराधिकाऱ्याच्या सल्ल्यावरून ग्रामसेवक गावात इतर योजनांची माहिती देतो व अंमलबजावणी करतो.
  • ग्रामपंचायतच्या ग्रामसभेच्या पहिल्या बैठकीमध्ये ग्रामपंचायतीच्या गेल्या वर्षीचा हिशोब आर्थिक विवरण सादर करणे.
  • ग्रामसेवकावर नजीकचे नियंत्रण गट विकास अधिकाऱ्याचे व त्यानंतर जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांचे (सीईओ) असते.

Leave a comment