Gramsabha -ऋग्वेदात ग्रामसभेची स्थापना झाली होती.
भारतात प्राचीन काळापासून ग्रामसभा अस्तित्वात आहे.
ग्रामसभा बोलवणे हे सरपंचाचे काम आहे.
ग्रामसभेची नोटीस बजावणे ग्रामसेवकाचे काम आहे.
ग्रामसभेचा अध्यक्ष सरपंच असतो.
ग्रामसभा वेळेवर घेतल्या नाहीत तर सरपंच व उपसरपंचांना राजीनामा द्यावा लागतो व ग्रामसेवकाला निलंबित केले जाते.
ग्रामसभा हा ग्रामपंचायती अंतर्गत ग्रामीण पातळीवर कार्यरत असणारा पंचायत राजचा कनिष्ठ स्तरावरील घटक आहे.
ग्रामसभा हा ग्रामीण जनतेचा लोकशाहीत प्रत्यक्ष सहभाग वाढवणारा घटक आहे.
रचना ग्रामसभेत संबंधित ग्रामपंचायत क्षेत्रातील (गावातील) 18 वर्षावरील सर्व प्रौढ स्त्री-पुरुषांचा म्हणजेच पात्र मतदारांचा समावेश होतो. मुंबई ग्रामपंचायत अधिनियम 1958 च्या कलम 7 नुसार प्रत्येक वित्तीय वर्षात किमान 6 ग्रामसभा घेण्यात याव्या अशी तरतूद होती. 4 ऑगस्ट 2012 रोजी संबंधित अधिनियमात दुरुस्ती करून प्रत्येक वित्तीय वर्षातील ग्रामसभांची संख्या 6 वरून 4 इतकी करण्यात आली. म्हणजे सध्या प्रत्येक वित्तीय वर्षात राज्यातील प्रत्येक ग्रामपंचायत चार ग्रामसभा घेणे बंधनकारक आहे.
या 4 ग्रामसभा सामान्यतः 1 मे (महाराष्ट्र दिन), 15 ऑगस्ट (स्वातंत्र्य दिन), 2 ऑक्टोबर (गांधी जयंती) व 26 जानेवारी (प्रजासत्ताक दिन) या दिवशी घेतल्या जात असत.
2018 पासून 2 ऑक्टोबर ची ग्रामसभा रद्द करण्यात आली आहे ही चौथी ग्रामसभा नवीन आर्थिक वर्ष सुरू होण्यापूर्वी घेतली जाते.
दोन ग्रामसभा मधील अंतर तीन महिन्यापेक्षा अधिक असू नये, याशिवाय ग्रामस्थांच्या मागणीनुसार विशेष ग्रामसभा देखील घेतल्या जातात.
पुढे हे हि वाचा
कृष्ण जन्माष्टमी https://mpsc.pro/krushna-janmashtami/ गुढीपाडवा-Gudhipadwa festival https://mpsc.pro/gudhipadwa-festival/ Dassera great indian festival https://mpsc.pro/dassera-great-indian-festival/ आनंद,समृद्धीचा उत्सव दिवाळी https://mpsc.pro/diwali/ Ramjaan Eid:रोजा, दुआ, आणि आनंदाची वेळ https://mpsc.pro/ramjaan-eid/
ग्रामसभांचा कोरम:
गावातील मतदार यादीतील एकूण मतदारांच्या किमान 15 टक्के किंवा शंभर व त्यापेक्षा कमी ग्रामस्थ उपस्थित असतील तरीही ग्रामसभांचा कोरम पूर्ण होतो.
ग्रामपंचायतीने आर्थिक वर्षात सुरुवात झाल्यानंतर दोन महिन्याच्या आत पहिली ग्रामसभा घेणे बंधनकारक आहे.
मुंबई ग्रामपंचायत अधिनियमाच्या कलम 7 नुसार ग्रामसभांची जबाबदारी सरपंच व त्यांच्या अनुपस्थितीत उपसरपंच यांच्यावर निश्चित केली असून या सभा घेण्यास ते असमर्थ ठरल्यास त्यांना अपात्र ठरवले जाऊ शकते.
ग्रामसभेचे अध्यक्ष सरपंच व त्यांच्या अनुपस्थित उपसरपंच व दोघांच्याही अनुपस्थित एखादा जेष्ठ सदस्य पंच ग्रामसभेचे अध्यक्ष होतो.
आर्थिक वर्षातील पहिल्या त्याचप्रमाणे ग्रामपंचायतीची निवडणूक पार पडल्यानंतर संपन्न होणाऱ्या पहिल्या ग्रामसभेचा अध्यक्ष सरपंच हाच असतो.
२० जुलै 2015 – राज्यातील सर्व ग्रामपंचायतींना त्यांच्या हद्दीतील तलावात मासेमारीचे ठेके देण्याचा अधिकार देणारे विधेयक महाराष्ट्र विधान परिषदेत मंजूर झाले. त्यानुसार ग्रामपंचायतींना आणखी एक उत्पन्नाचे साधन प्राप्त झाले. तलावांची देखभाल व दुरुस्ती खर्च मात्र जिल्हा परिषदेकडे आहे.
महाराष्ट्रात ग्रामपंचायत उपसरपंच पदास आरक्षण नाही. ग्रामपंचायत ग्रामसभेच्या महिला सदस्यांची सभा ग्रामसभेच्या प्रत्येक नियमित सभेपूर्वी घेतली जाते.
ग्रामसभेमुळे ग्रामीण राजकारणात खुलेपणा व पारदर्शकता येण्यास मदत झाली.
ग्रामपंचायती संघटित करण्याची तरतूद भारतीय राज्यघटनेच्या कलम 40 मध्ये करण्यात आली.
महाराष्ट्रात बहुतांशी खेड्यात ग्रामसभा यशस्वी न होण्यासाठी सरपंचाची उदासीनता, ग्रामपंचायत सदस्यांची अनिच्छा व लोकांची निरक्षरता इत्यादी कारणे आहेत.
पुढे हे हि वाचा
maharashtra transport and communication:महाराष्ट्र वाहतूक व संदेशवहन https://mpsc.pro/maharashtra-transport-and-communication/ Types of Tense in marathi:काळ व काळाचे प्रकार https://mpsc.pro/types-of-tense-in-marathi/ Naam:नाम व नामाचे प्रकार https://mpsc.pro/naam/ Sarvnaam-सर्वनाम: भाषेचा महत्वपूर्ण घटक https://mpsc.pro/sarvnaam/ Visheshan-विशेषण: मराठी भाषेतील महत्त्वपूर्ण वचनांचा अंग https://mpsc.pro/visheshan/