गुढीपाडवा हा सण मराठी दिनदर्शिका नुसार चैत्र महिन्यातील चैत्र शुद्ध प्रतिपदेला साजरा केला जातो. संपूर्ण भारतात व प्रामुख्याने महाराष्ट्रात गुढीपाडवा-Gudhipadwa festival हा सण मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी या दिवशी घरातील आणि अंगणातील स्वच्छता करून दारात गुढी उभारली जाते. संपूर्ण जग एक जानेवारी हा दिवस नवीन वर्ष म्हणून साजरा करतो पण महाराष्ट्रातील लोकांसाठी नवीन वर्ष म्हणजे गुढीपाडवा हा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो.
गुढी उभारण्यासाठी लांब बांबूचा वापर केला जातो. गुढीपाडवा सणाच्या दिवशी स्त्रिया संपूर्ण घराची साफसफाई व स्वच्छता करतात तसेच गोडधोड स्वयंपाक बनवतात. गुढीपाडव्याला घराच्या समोर दारामध्ये किंवा खिडकीमध्ये गुढी उभारली जाते. दारासमोर सुबक रांगोळी काढली जाते.
बांबूच्या टोकाला रेशमी वस्त्र बांधले जाते. कडून लिंबाची पाने, रंगबिरंगी बताशाची माळ, आंब्याच्या डहाळ्या, झेंडूच्या फुलांच्या माळा बांधल्या जातात आणि त्यावर एक कलश ठेवला जातो. ही गुढी आकाशाच्या दिशेने उभारतात या गुढीला विजयाचे प्रतीक मानले जाते
ती गुढी बांधून परिवारातील सर्व सदस्य गुढीची एकत्र पूजा करतात. त्यामुळे हा दिवस म्हणजे साडेतीन मुहूर्ता पैकी एक महत्त्वाचा मुहूर्त मानला जातो.
गुढीपाडवा हा सण देखील भारत देशातील संस्कृतीचे प्रतीक म्हणून ओळखला जातो. गुढीपाडवा हा सण भारत देशातील बऱ्याच राज्यात वेगवेगळ्या नावाने ओळखला जातो. गुढीपाडवा हा वसंत ऋतू मध्ये येणारा खूप महत्त्वाचा सण आहे. हा सण हिंदू संस्कृतीतील खूप पवित्र सण मानला जातो. त्यामुळे खूप लोक या दिवसापासून चांगल्या कामाची सुरुवात करतात.
गुढीपाडव्याच्या दिवशी गुळ आणि कडुनिंबाचा कडुलिंबाचा दहाला याचा प्रसाद खाल्ला जातो या दिवशी कडुनिंबाच्या पानाला खूप महत्त्व दिले जाते. यामागे शास्त्रीय कारण आहे कडुलिंब ही एक गुणकारी वनस्पती आहे. कडुनिंबाचा दहाला खाल्ल्याने पोट साफ होऊन रक्त शुद्ध होते त्यामुळे या दिवशी कडुलिंबाचा दहाला आणि गुळ खाण्याची प्रथा आहे.
गुढीपाडव्याच्या दिवशी स्त्रिया झेंडूच्या फुलांचे हार बनवतात. आंब्याच्या पानाचे तोरण बनवतात व हे तोरण घरातील सर्व दरवाजे व खिडक्या यांना खिडक्यांना बांधतात. सकाळी उभारलेली गुढी संध्याकाळी उतरवली जाते. त्या दिवशी घरातील सर्व मंडळी गोडधोड पदार्थ खाऊन आनंदीत असतात.
गुढीपाडवा हा सण खूप लोकांना आवडतो गुढीपाडवा हा सण समृद्धी आणि कल्याणाशी संबंधित आहे. या दिवशी लोक पारंपारिक कपडे परिधान करतात. गुढीपाडवा या दिवशी ब्रह्मदेवाने सृष्टी निर्माण केली असे म्हणतात. ब्रह्मदेवाने विश्व निर्मिती केली ती पाडव्याच्या दिवशी आणि पुढे सत्य युगाची सुरुवात झाली आणि म्हणूनच नूतन वर्षारंभ म्हणून चैत्र शुक्ल प्रतिपदा म्हणजे गुढीपाडवा साजरा केला जातो असे म्हणतात
उभारलेली गोडी विजय आणि समृद्धीचे प्रतीक मानली जाते. या दिवशी लोक वस्तू खरेदी करतात. सोने खरेदी करतात. काही लोक या मुहूर्तावर व्यवसायाचा प्रारंभ किंवा नवीन उपक्रमाचा प्रारंभ करतात. मागील वर्षातील सर्व काही विसरून नवीन वर्षाची सुरुवात आनंदाने उत्साहाने करावी आणि येणारे नवीन वर्ष आनंदाचे भरभराटीचे सुख-समृद्धीचे जावो हीच ईश्वरचरणी प्रार्थना करतात आणि हाच संदेश गुढीपाडव्याच्या सण आपल्याला देतो
गुढीपाडवा हा सण संपूर्ण महाराष्ट्रात खूप उत्साहात साजरा केला जातो वसंत ऋतु मध्ये साजरा केला जाणारा सर्वात मोठा सण आहे. असं कित्येक ठिकाणी वसंत ऋतुच्या आगमनात साजरा केला जातो यावेळी झाडेझुडपे हिरवीगार होतात. त्यांना नवीन पालवी फुटते, रंगबेरंगी फुले लागतात. वातावरण शांत आणि अल्हाददायक असते अशा वातावरणात गुढीपाडवा हा सण लोकांच्या आनंदात आणि उत्साहात आणखीनच भर पाडतो.
गुढीपाडवा हा सण साजरा करण्यामागे अनेक कारणे सांगितली जातात यामध्ये सर्वात प्रसिद्ध कथा अशी आहे की या दिवशी महाराष्ट्रात प्रभू रामचंद्रांनी रावणाचा पराभव करून वनवास संपवून आयोध्या नगरीमध्ये प्रवेश केला त्यावेळी तेथील लोकांनी घरासमोर गुढी उभारून त्यांचे स्वागत केले होते. तोरणे उभारली होती आणि आनंद साजरा केला होता अयोध्येतील प्रजेने तीच प्रथा पुढे वर्षानुवर्षे चालत ठेवली म्हणून आज घरोघरी गुढी उभारली जाते. गुढी हे विजयाचे,मांगल्याचे प्रतिक आहे.