Industries in Maharashtra:महाराष्ट्र उद्योगधंदे

Industries in Maharashtra महाराष्ट्र औद्योगिक क्षेत्रात देशातील आघाडीचे राज्य आहे . महाराष्ट्रात मुंबई, ठाणे , भिवंडी, पिंपरी चिंचवड, नाशिक, मालेगांव, जालना, नागपुर इत्यादी ठिकाणी मोठया प्रमाणात औद्योगिक वसाहती स्थापन झाल्या आहेत  याशिवाय मराठवाड्यातील व विदर्भातील काही जिल्हे औद्योगिकरणापासून  वंचित राहिले त्यामुळे महाराष्ट्र उद्योगाबाबत मोठा प्रादेशिक असमतोल निर्माण झाला. महाराष्ट्रात कापड उद्योग, साखर उद्योग, औषधनिर्मिती,शेती  अवजारे, संरक्षण साहित्य, काच  उद्योग, इलेक्ट्रॉनिक उद्योग, कागद उद्योग यांचा मोठ्या प्रमाणात विकासझाला. कापड  उद्योग, साखर उद्योग, तेलबिया  उद्योग हया  शेती आधारे उद्योगांचा विकास अधिक प्रमाणात झाला.

१९६२ मध्ये महाराष्ट्र औद्योगिक विकास महमंडळाची स्थापना करण्यात आली.

कापड उद्योग:Industries in Maharashtra

कापड उद्योगात देशात महाराष्ट्राचा पहिला क्रमांक लागतो. कापड विणण्याची कला भारतीयांना प्राचीन काळापासून  अवगत होती. कापूस या कच्यामालावर आधारीत कापड उद्योगाचा विकास मोठ्या प्रमाणात झाला. ब्रिटीश काळात आधुनिक पद्धतीने कापड निर्मितीला सुरुवात झाली.

कापड उद्योग हा देशातील पहिला व सर्वाधिक रोजगार मिळवून देणारा उदयोग आहे.

१९१८ मध्ये देशात पहिली कापड गिरणी कोलकत्ता येथे स्थापण्याचा अयशस्वी प्रयत्न झाला.

१८५४ मध्ये गव्हर्नर जनरल लॉर्ड डलहौसीच्या काळात कवासाजी नानाभाई दावर यांनी ‘बॉम्बे स्पिनींग अॅन्ड विव्हिंग  कंपनी या नावाने पहिली कापड गिरणी केली.

महाराष्ट्रात पठारी प्रदेशात होणाऱ्या कापूस उत्पादनामुळे कापड गिरण्याचे केंद्रीकरण झाले.

महाराष्ट्रात मुंबई, ठाणे , भिवंडी, मालेगाव , सोलापूर, सांगली, इचलकरंजी, बार्शी, नांदेड, धुळे, पुणे, पुलगाव, जळगाव,हिंगणघाट, चाळीसगांव, अमळनेर, जमरावती, अकोला, व नागपूर इ. ठिकाणी कापड उद्योगाचा विकास झाला.

मुंबई शहरात अधिक प्रमाणात कापड गिरण्याचे केंद्रिकरण झाल्यामुळे मुंबई शहराला “भारताचे मँचेस्टर” म्हणतात. मुंबई नंतर सर्वाधिक कापडगिरण्या अहमदाबाद शहरात आहेत. मात्र सुरु  असनाऱ्या कापडगिरण्यांच्या संखेत अहमदाबादचा  प्रथम क्रमांक लागतो.

भारत देशातील व आशिया खंडातील पहिली सहकारी सूतगिरणी कोल्हापूर जिल्हा शेतकरी विणकर सहकारी संस्था ‘इचलकरंजी’ या शहरात आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील ‘इचलकरंजी’ हे शहर हातमाग व यंत्रमाग उद्योगासाठी प्रसिध्द असून इचलकरंजीला “महाराष्ट्राचे मँचेस्टर” असे म्हणतात.

मराठवाडा – औरंगाबाद, नांदेड, लातूर, जालनाइ.  मराठवाड्यात नांदेड हे कापड गिरण्यांचे प्रमुख केंद्र आहे.

 साखर उद्योग:Industries in Maharashtra

 हा राज्यातील प्रमुख कृषी आधारे चालणारा उद्योग आहे. ऊस, बीट, ज्वारी यासांख्या शर्करायुक्तवनस्पतीपासून साखरेची  निर्मिती केली जाते. महाराष्ट्रात साखर उद्योग हा कृषीआधारीत असा प्रमुख उद्योग मानला जातो. ग्रामीण भागातील सुमारे अडीच कोटी लोकांचे जीवन साखर उद्योगावर अवलंबून आहे. साखरेतून महाराष्ट्राला सुमारे २२०० कोटी रूपयांचा महसूल प्राप्त होतो. एका साखर कारखान्यामुळे  ऊस लागवडीपासून साखर बाजारपेठेत पोहोचेपर्यंत सर्व प्रकारच्या प्रकियांमध्ये ५००० लोकांना थेट रोजगार उपलब्ध होतो. या आकडेवारीवरून महाराष्ट्रातील साखर उद्योगाचे स्थान अधोरेखीत होते. 

सहकार क्षेत्रातून साखर उद्योगाने मोठ्या प्रमाणावर प्रगती केली.

१९०४ ला पहिल्या सहकार कायद्यानुसार साखर उद्योगाचा सहकार क्षेत्रात मोठा विस्तार झाला.

साखर उत्पादनात देशात महाराष्ट्राचा प्रथम क्रमांक लागत असून १९०३ मध्ये भारतात बिहार व उत्तर प्रदेश राज्यात साखर कारखान्याची मुख्यात झाली. तर १९२० मध्ये महाराष्ट्रात अहमदनगर जिल्ह्यात बेलापूर येथे साखर कारखान्याची स्थापना करण्यात आला. 

पश्चिम महाराष्ट्रात साखर कारखान्याची संख्या अधिक असल्यामुळे पश्चिम महाराष्ट्राला साखरेचे कोठार म्हणतात.

१९४९-५० मध्ये पद्मश्री विठ्ठलराव विखे पाटील व धनंजयराव गाडगीळ यांनी अहमदनगर जिल्ह्यात प्रवरानगर येथील लोणी गावी पहिला सहकारी तत्वावर चालणारा देशातील पहिला साखर कारखाना स्थापन केला.

महाराष्ट्रातील पहिला महिला साखर कारखाना तांबाळे (जि. कोल्हापूर) येथे आहे.

आशिया खंडातील सर्वांत मोठा साखर कारखाना वसंतदादा पाटील शेतकरी सहकारी कारखाना सांगली  येथे आहे.

क्यूबा देशाला साखरेचे कोठार म्हणतात.

पश्चिम महाराष्ट्राला साखरेचे कोठार म्हणतात.

एकट्या अहमदनगर जिल्ह्यात सहकारी तत्वावर चालणान्या साखर कारखान्याची संख्या जास्त असून भारतातील साखरेची बाजारपेठ म्हणून कोपरगाव (अहमदनगर) हे ओळखले जाते.

पश्चिम महाराष्ट्रात अहमदनगर जिल्ह्यात सर्वाधिक साखर कारखाने आहेत.

पश्चिम महाराष्ट्र- अहमदनगर, पुणे, सांगली, सातारा, नाशिक, सोलापूर, कोल्हापूर.

मराठवाडा – औरंगाबाद , लातूर ,नांदेड , जालना , परभणी .

विदर्भ – अमरावती ,यवतमाळ , नागपूर ,

खानदेश – धुळे , जळगाव , नंदुरबार .

कागद उद्योग:Industries in Maharashtra

१८३२ मध्ये देशात पहिली कागद गिरणी पश्चिम बंगाल राज्यात सेहरामपूर येथे सुरू झाली व १९५५ मध्ये

मध्ये प्रदेश राज्यात नेपानगर येथे वृत्तपत्र निर्मिती कागद कारखाना स्थापन झाला.

बांबू, निलगिरी, ऊसाचे चिपाडे, लाकूड इत्यादी कच्च्या मालापासून कागदनिर्मिती केली जाते.

 चंद्रपूर जिल्ह्यात बल्लारपूर येथे राज्यातील सर्वात मोठी कागद गिरणी आहे.

महाराष्ट्र हे भारतातील कागदावरचे उत्पादन करणारे प्रमुख राज्य आहे .

चंद्रपूर – बल्लारपूर, ब्रम्हपुरी.

अहमदनगर – राहुरी , संगमनेर .

औरंगाबाद – पैठण , खुलताबाद .

भंडारा – तुमसर रोड .

नाशिक – इगतपुरी

पुणे – चिंचवड, भिगवण , इंदापूर , जुन्नर , थेरगाव.

रायगड – खापोली, रोहे ,म्हाड.

सातारा – शिरोळ

मुंबई – गोरेगाव

लातूर – लातूर ,औसा.

गडचिरोली – देसाईगंज  

खत उद्योग: Industries in Maharashtra

 भारत हे कृषीप्रधान राष्ट्र असल्याने मोठ्या प्रमाणात उत्पादन वाढीसाठी खतांचा वापर केला जातो. महाराष्ट्रात आवश्यकता मोठ्या प्रमाणात असून रायगड, मुंबई, पुणे, ठाणे, कोल्हापूर, यवतमाळ, अमरावती या जिल्ह्यात खतांची कारखाने आहेत. रायगड जिल्ह्यात थळ वायशेत येथे राष्ट्रीय क्षेत्रातील खत प्रकल्प असून येथे उज्ज्वला व सुफला प्रकारची खते तयार केली जातात.

रायगड – थळ वायशेत

पुणे – लोणी काळभोर

कोल्हापूर – रुकडी

वाशीम

ठाणे – अंबरनाथ

वर्धा – पुलगाव

गडचिरोली – वडसा

मुंबई – तुर्भे , चेंबूर

नागपूर – बुटीबोरी

परभणी – जिंतूर

संरक्षण साहित्य उपयोग:Industries in Maharashtra

महाराष्ट्रात अनेक ठिकाणी संरक्षण साहित्य निर्मिती उद्योग केंद्रे आहेत. अहमदनगर जिल्ह्यात रणगाडा प्रशिक्षण केंद्र असून याच जिल्ह्यात फराहबाग येथे रणगाडा संग्रहालय आहे.

ठाणे – अंबरनाथ

नागपूर – वाडी

वर्धा – पुलगाव

पुणे – खडकी

चंद्रपूर – भद्रावती

नाशिक – ओझर

भंडारा – जवाहरनगर

जळगाव – वरणगाव

चलनी नोटा छापण्याचा उद्योग:Industries in Maharashtra

महाराष्ट्रात चलन निर्मिती उद्योग नाशिक व मुंबई शहरात चालतो. नाशिक येथे कागदी चलनाची निर्मिती केली जाते. तर मुंबई येथे टाकसाळ (नाणी) तयार केली जातात. नाशिक येथे दोन प्रेस आहेत.

१) इंडिया सेक्युरिटी प्रेस -नाशिक रोड नाशिक येथे किसान विकास पत्रे, इंदिरा विकास पत्रे, पोस्टल ऑर्डर्स, तिकीटे, पासपोर्ट इ. छापली जातात.

२) करंसी नोट प्रेस- करंसी नोट प्रेस नाशिक रोड नाशिक येथे १०००, ५००, १००, ५०, १० रुपयांचे कागदी चलन छापले जाते.

नाशिक येथे तिकिटे, पोष्टकार्ड, चलनी नोटा, बाँड, छापण्याचा उद्योग चालतो.

विडी उद्योग:Industries in Maharashtra

 महाराष्ट्रात खालील ठिकाणी विडी निर्मिती उद्योग चालतो.

नशि – सिन्नर

औरंगाबाद – वैजापूर, सिल्लोड

गोंदिया – तीरोडी , देवरी , आमगाव

सोलापूर

यवतमाळ –

चंद्रपूर – ब्रह्मपूर

 तेल गिरण्या-

 मुंबई, लातूर, धुळे, जळगाव, पुणे, या शहरात तेल गिरण्या आहेत…

आणखी महत्वाचे वाचा

 लाकूड उद्योग

यवतमाळ, नांदेड, चंद्रपूर, अमरावती, गडचिरोली या जिल्ह्यात लाकूडकटाई उद्योग चालतो

आगकाडी उद्योग-

सेमल व पॉप्युलर या वृक्षापासून आगकाडी बनविण्याचा उद्योग चालतो. राज्यात ठाणे

जिल्ह्यात अंबरनाथ येथे आगकाडी बनविली जाते.

 काच उद्योग –

पुणे जिल्यात तळेगांव दाभाडे, सातारा जिल्ह्यात ओगलेवाडी तर मुंबई, ठाणे, नागपूर शहरात काच उद्योग चालतो.

औषध निर्मिती –

पुणे जिल्ह्यात पिंपरी येथील पेनिसिलिन निर्मातीचा कारखाना आहे. रायगड जिल्ह्यात पनवेल शेजारी रसायनिक नावाने ओळखला जाणारा हिंदुस्थान ऑर्गेनिक केमिकल्सचा सार्वजनिक क्षेत्रातील औषध निर्मितीचा कारखाना असून या ठिकाणी अँटीबायोटिक्स औषधांची निर्मिती केली जाते. पनवेल शहरात आयुर्वेदिक औषधांचा कारखाना आहे.

तेल शुद्धीकरण केंद्र –

मुंबईमध्ये तुर्भे येथे  तेल शुद्धीकरण केंद, इंडियन पेट्रोकेमिकल्स नागोठणे , रायगड, मुंबई येथे BPCL चा मोठा तेल शुद्धीकरण प्रकल्प आहे, तर अरबी समुद्रातील मुंबई हाय व उरण  खनिज तेलापासून प्रोपेन व इथेन वायूवर प्रक्रिया करून इथेलिनची निर्मिती केली जाते.

रसायने –

महाराष्ट्रात मुंबई, ठाणे, रायगड, पुणे, नागपूर, औरंगाबाद या जिल्हात अवजड रासायनिक उद्योगाची केंद्रे आहेत. मुंबई ,ठाणे, पनवेल येथे रासायनिक द्रव्य  उद्योग  चालतो.

विमान निर्मिती उद्योग –

नाशिक जिल्ह्यात ओझर येथे हिंदुस्थान एअरोनॉटिक्स लि. मिग जातीचे विमाने बनविण्याचा उद्योग चालतो.

 जहाज निर्मिती उद्योग –

महाराष्ट्रात मुंबई व रत्नागिरी जिल्ह्यात जहाज बांधणी उद्योग चालतो. मुंबई शहरात माझगाव डॉक येथे व रत्नागिरी जिल्ह्यात मिया येथे जहाज बांधणी उद्योग केंद्र आहे. शिर्पीग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लि. मुंबई येथे असून त्याची स्थापना ०२ ऑक्टोबर १९६१ मध्ये करण्यात आली. व पुढे १८ सप्टेंबर १९९२ मध्ये तिचे रुपांतर सार्वजनिक मर्यादित कंपनीमध्ये करण्यात आले.

सतरंज्या –

यवतमाळ, जळगाव, अकोला, अमरावती धुळे

काजू उद्योग-

वेंगुर्ले, मालवण (सिंधुदुर्ग)) • वीणा, सतारी व तंतुवाद्ये मिरज (सांगली)

गुळ तयार करणे – कोल्हापूर.

हिन्यांना पैलू पाडणे –

माहुली, नेलकरंजी, विटा (सांगली))

अडकित्ते तयार करणे -बागणी (सांगली), मुरुड, उदगीर (लातूर), देऊळगाव राजा (बुलढाणा)

चित्रपट निर्मिती– बॉलिवुड उद्योग गोरेगाव मुंबई शहरात चालतो. तर पुणे शहरात फिल्म अँड टेलिविजन इन्टिट्यूट ऑफ इंडिया ही संस्था कार्यरत आहे. चित्रनगरी, कोल्हापूर येथे मराठी चित्रपट उद्योग चालतो

भाभा अणुसंशोधन केंद्र मुंबई उपनगर

सिमेंट उद्योग – सिमेंट निर्मितीसाठी चिकणमाती, चुनखडी, सिमेंट, जिप्सम यांसारख्या कच्च्या मालापासून केली जाते. महाराष्ट्रात चंद्रपूर जिल्ह्यात सर्वाधिक सिमेंटचे कारखाने आहेत. घुगुस, बल्लारपूर (चंद्रपूर), पाटणबोरी (यवतमाळ) व रत्नागिरी जिल्ह्यात नर्मदा सिमेंट उद्योगामार्फत सिमेंटची निर्मिती केली जाते.

नागपूर जिल्ह्यात आशिया खंडातील सर्वात मोठी वसाहत बुटीबोरी ही पंचतारांकित औदयोगिक वसाहत येथे स्थापन झाली आहे.

लोहपोलाद प्रकल्प महाराष्ट्र इलेक्ट्रो स्टील लि. भद्रावती चंद्रपूर येथे लोहपोलाद निर्मिती प्रकल्प आहे. तर

भंडारा जिल्ह्यात भंडारा रोड येथे पोलाद प्रकल्प आहे. शिवाय मुंबई, ठाणे, जालना येथे लोहपोलाद उद्योग

निर्मिती चालतो

वनस्पती तूप निर्मिती महाराष्ट्रात धुळे, वालचंदनगर (पुणे), मुंबई, लातूर, पाचोरा, अंमळनेर (जळगाव) व अकोला येथे वनस्पती तूपाची निर्मिती केली जाते.

अॅल्युमिनियम निर्मिती रत्नागिरी

कातडी उद्योग वर्धा, लातूर, वसमत

चिनी मातीची भांडी- भद्रावती, बल्लारपूर (चंद्रपूर)

लाख काम करणे सावंतवाडी (सिंधुदुर्ग)

मधुमक्षिका पालन महाबळेश्वर (सातारा)

फेरो मॅगनीज कन्हान (नागपूर), चंद्रपूर (चंद्रपूर)

लाकूड उद्योग परतवाडा (अमरावती), किनवट (नांदेड), सिरोचा, अलापल्ली (गडचिरोली), मालवण,

सिंधुदुर्ग), नवापूर (नंदुरबार)

मिहान प्रकल्प नागपूर.

रेशीम उद्योग – भिवंडी (ठाणे), पिपराळे (जळगाव), एकोडी, बावाडा (भंडारा), आरमोरी (गडचिरोली)

कोशा कापड  – सावली, नागभिड (चंद्रपूर), साकोली, लखानी (भंडारा),

मद्यनिर्मिती प्रकल्प ग्रेप इंडस्ट्री मद्य निर्मिती प्रकल्प, बारामती (जि.पुणे)

सोने शुध्दीकरण शिरपूर (धुळे)

सौंदर्यप्रसाधने-

औरंगाबाद, मुंबई, ठाणे औरंगाबाद, नाशिक, नांदेड, अमरावती, इंदापूर, निवळीफाटा येथे औद्योगिक केंद्रे उभारली जात आहे. 

सोलापूर जिल्हात चिंचोली औदयोगिक वसाहत होजिअरीसाठी प्रसिद्ध आहे.

महाराष्ट्रात दुध भुकटी बनविणारे केंद्र गोरेगांव येथे आहे.

महाराष्ट्रात सॉफ्टवेअर पार्क हिंजवडी (जि.पुणे ) येथे आहे.

Leave a comment