Kisan Sabha : अखिल भारतीय किसान सभा
Kisan Sabha अखिल भारतीय किसान सभा ही भारतातील शेतकऱ्यांची एक संघटना आहे.
अखिल भारतीय किसान सभेची स्थापना स्वामी सहजानंद सरस्वती यांनी 11 एप्रिल 1936 रोजी केली.
प्रा. एन. जी. रंगा यांची अखिल भारतीय किसान सभेचे सचिव म्हणून निवड झाली.
स्वामी सदानंद सरस्वती यांच्या नेतृत्वाखाली बिहारमध्ये किसान सभेची चळवळ सुरू झाली.
1929 मध्ये स्वामी सहजानंद यांनी बिहार सभेची स्थापना केली होती. शेतकऱ्यांवर होणाऱ्या हल्ल्यान विरोधात शेतकऱ्यांच्या तक्रारी गोळा करण्यासाठी स्थापन करण्यात आली होती. त्याच्या स्थापनेचा परिणाम म्हणून भारतात शेतकऱ्यांच्या कारवाया सुरू झाल्या.
हळूहळू शेतकरी चळवळ उर्वरित भारतात झपाट्याने पसरली.
1936 मध्ये महाराष्ट्राच्या जळगाव जिल्ह्यातील फैजपूर अधिवेशनात हजारो शेतकरी पदयात्रा करून उपस्थित राहिले. या अधिवेशनात किसान सभेने शेतकऱ्यांच्या हक्काचा सादर केलेला जाहीरनामा राष्ट्रसभेने स्वीकारला.
अखिल भारतीय किसान सभेचे पहिले अधिवेशन टिटवाळा, जिल्हा ठाणे येथे 12 जानेवारी 1945 मध्ये पार पडले.
साने गुरुजींनी खानदेशात किसान व कामगारांची एकजूट केली.
पूर्व खानदेशात 1938 च्या अतिवृष्टीत पिके गमावलेल्या शेतकरी बांधवांना शेतसारा माफ करण्याच्या मागणीसाठी साने गुरुजींनी मोर्चे मिरवणुका व सभा घेतल्या.
3 ऑगस्ट 1947 रोजी महाराष्ट्रात शेतकरी कामगार पक्षाची स्थापना करण्यात आली.
शरद जोशी यांनी 1978 साली महाराष्ट्रात शेतकरी संघटनेची स्थापना केली.
5 डिसेंबर 2017 मध्ये भाजपाचे ज्येष्ठ नेते व माजी केंद्रीय मंत्री यशवंत सिन्हा यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रात अकोला येथे शेतकऱ्यांनी विविध मागण्यांसाठी आंदोलन केले.
सध्या भारतात अखिल भारतीय किसान सभा अजय भवन आणि अखिल भारतीय किसान सभा अशोक रोड या एकाच नावाच्या दोन संघटना आहेत.
tags
महाराष्ट्रातील शेतकरी बांधवांची चळवळ, अखिल भारतीय किसान सभा, अखिल भारतीय किसान सभेचे पहिले अधिवेशन, महाराष्ट्रातील शेतकरी आंदोलन, स्वामी सहजानंद सरस्वती, फैजपूर अधिवेशन, शेतकरी कामगार पक्ष, अखिल भारतीय किसान सभा अजयभवन, अखिल भारतीय किसान सभा अशोकरोड,akhil bharatiy kisan sabha ,kisan sabha, bharatiy kisan sabha, shetakari kamagar paksh,
Post Comment