Kojagiri Pornima आपल्या भारत देशातील प्रत्येक राज्यांमध्ये मोठ्या उत्साहात आणि आनंदाने कोजागिरी पौर्णिमा साजरी करण्यात येते.
भारतातील वेगवेगळ्या राज्यांमध्ये कोजागिरी पौर्णिमा वेगवेगळ्या पद्धतीने साजरी केली जाते. कोजागिरी पौर्णिमा साजरी करण्याची पद्धत प्रत्येक राज्यात वेगवेगळी आहे.
चार महिन्याचा पावसाळा संपल्यानंतर जी पहिली पौर्णिमा येते, ती पौर्णिमा म्हणजेच कोजागिरी पौर्णिमा असते, ही पौर्णिमा शरद ऋतू मध्ये येते म्हणूनच तिला शरद पौर्णिमा असेही म्हणतात.
तर अश्विन महिन्यात येते म्हणून तिला अश्विन पौर्णिमा असे सुद्धा म्हणतात. कृषी संस्कृतीत देखील या दिवसाला विशेष महत्त्व आहे.
पावसाळ्यात आकाश स्वच्छ नसते, परंतु या पौर्णिमेला आकाश खूप दिवसानंतर स्वच्छ आणि सुंदर दिसते, त्यामुळे याचा आनंद घेता यावा याचे स्वागत करावे म्हणून हा सण साजरा करतात.
अश्विन महिन्यात पावसाळा संपून आकाश निरंतर होते. अशावेळी इष्ट मित्र परिवारासह चांदण्या रात्रीत ची माझ्या अनुभवता यावी म्हणून हा उत्सव प्रचारात आला असावा.
प्रत्येक राज्यामध्ये कोजागिरी पौर्णिमेला वेगवेगळ्या नावाने ओळखले जाते, जसे की कौमुदी पौर्णिमा, लख्खो पूजा, माडी पौर्णिमा, शरद पौर्णिमा इत्यादी.
कोजागिरी पौर्णिमा हा अश्विन पौर्णिमेला येणारा भारतीय हिंदू संस्कृतीतील महत्त्वाचा दिवस मानला जातो. इंग्रजी दिनदर्शिकेनुसार कोजागिरी पौर्णिमा बहुदा सप्टेंबर ते ऑक्टोबर या दरम्यान असते.
दरवर्षी दिवाळीच्या आधी म्हणजे पंधरा दिवस आधी शरद पौर्णिमा साजरी केली जाते. पौराणिक मान्यतेनुसार अश्विन महिन्यातील पौर्णिमेला कोजागिरी पौर्णिमा साजरी केली जाते.
शास्त्रांमध्ये कोजागिरी पौर्णिमेचा संबंध लक्ष्मीच्या जन्मापासून ते भगवान श्रीकृष्णाच्या महारास पर्यंत असल्याचे मानले जाते.
संपूर्ण वर्षातून एकदा या दिवशी चंद्र आपले सहा कला दाखवतो. असे म्हणतात की, कोजागिरी पौर्णिमेच्या रात्री चंद्राच्या किना मधून अमृतवृष्टी होते त्यामुळे या रात्री दूध, खीर बनवून चंद्राच्या प्रकाशात ठेवली जाते जेणेकरून प्रत्येकाला अमृततत्त्व मिळू शकेल.
असे मानले जाते की, कोजागिरी पौर्णिमेच्या रात्री देवी लक्ष्मी सर्वाधिक प्रसन्न होते आणि देवीच्या जगातून पृथ्वीला भेट देण्यासाठी येते जे भक्त रात्री जागरण करून तिची पूजा करतात त्यांना लक्ष्मीदेवीच्या कृपेने धन आणि वैभव प्राप्त होते. असे म्हणतात की, पृथ्वीवर विहार करताना देवी लक्ष्मी पाहते की, कोण जागृत आहे आणि तिची पूजा करत आहेत म्हणून याला कोजागिरी पौर्णिमा असे म्हणतात.
तुळशीला देवी लक्ष्मीचे रूप मानले जाते म्हणून कोजागिरी पौर्णिमेला तुळशीची पूजा करणे खूप शुभ आहे असे म्हणतात. कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी तुळशीजवळ तुपाचा दिवा लावतात आणि सौभाग्याचं लेणं अर्पण करतात, फुले अर्पण करतात व तुळशीची पूजा करतात.
कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी दूध आटवून त्यात केशर, पिस्ते, बादाम, चारोळी, वेलदोडे, जायफळ, साखर इत्यादी गोष्टी घालून त्याची खीर बनवली जाते व ते दूध एका मोठ्या पातेल्यात ठेवून मध्यरात्री पूर्ण चंद्राची त्याच्यावर किरणे पडू देतात आणि मग ते दूध प्राशन केले जाते. कोजागिरी पौर्णिमेला बऱ्याच ठिकाणी रात्री दिवे लावले जातात.
कृषी संस्कृतीमध्ये देखील या दिवसाचे विशेष महत्त्व आहे शेतकरी वर्गामध्ये हा दिवस उत्साहाने साजरा केला जातो ग्रामीण भागात ही प्रथा दिसून येते. निसर्गाबद्दल वाटणाऱ्या कृतज्ञपोटी कोकणात पौर्णिमा साजरी करण्याची प्रथा आहे या दिवशी बाजारात भाताच्या लोंब्या, कुरडूची फुले, नाचणी आणि झेंडूची फुले खरेदी करण्यासाठी मोठी गर्दी होत असते. या दिवशी घराघरात नवीन धान्य आलेले असते. धान्याची एक प्रकारे पूजा करण्याचा हा दिवस असतो.काही राज्यांमध्ये कोजागिरी पौर्णिमेनिमित्त यात्रा भरतात.
कोजागिरी पौर्णिमेला बिहार व झारखंड या राज्यांमध्ये कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी कोजा गहरा ही पूजा करण्यात येते. बऱ्याच राज्यांमध्ये कोजागिरी पौर्णिमेच्या निमित्ताने मोठमोठे यात्रा भरवण्यात येत असतात. लाखो लोक या यात्रेमध्ये मोठ्या संख्येने आनंदाने उत्साहाने सहभाग घेत असतात.
त्याचप्रमाणे कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी चंद्राचे पूजन करण्यात येत असते. कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी सर्व लोक आपापसातील भांडणे तंटे विसरून एकत्र येतात आणि कोजागिरी पौर्णिमा साजरी करतात. आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये कोजागिरी पौर्णिमेला सुद्धा धार्मिक,सांस्कृतिक आणि वैज्ञानिक महत्त्व आहे.
कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी चंद्र हा पृथ्वीच्या जवळ असतो त्यामुळे कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी चंद्राचा उजेड हा जास्त प्रमाणावर पृथ्वीवर पडत असतो. चंद्राचा हा उजेड शुद्ध आणि सात्विक असतो असे मानण्यात येते.
शेतकरी वर्ग मोठ्या प्रमाणात कोजागिरी पौर्णिमा हा उत्सव उत्सव साजरा करत असतो. कोजागिरी पौर्णिमेच्या दरम्यान शेतकऱ्यांची पिके काढायला येत असतात आणि त्यामुळे सर्वजण त्यांच्या घरात शेतातील पीक म्हणजेच लक्ष्मी येत असते त्यामुळे सर्व शेतकरी बंधू एकत्र येऊन कोजागिरी पौर्णिमा हा उत्सव साजरा करतात.
आपला हिंदू संस्कृतीमध्ये प्रत्येक सण साजरा करण्यामागे काहीतरी पौराणिक कथा असते. त्याचप्रमाणे कोजागिरी हा सण साजरा करण्यामागे सुद्धा एक पौराणिक कथा आहे असे म्हणण्यात येते की, या दिवशी माता लक्ष्मीचा जन्म झाला होता तसेच कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी चंद्र सहा कलांमध्ये असतो असे म्हणतात. कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी महालक्ष्मी देवीचे पूजन करण्यात येते.
बरेच जण या दिवशी उपवास ठेवतात. कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी कलशावर महालक्ष्मी देवीची स्थापना करण्यात येते, त्यानंतर देवीची पूजन करण्यात येते कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी तयार होणाऱ्या दुधाला देखील वैज्ञानिक तसेच शास्त्रीय कारणे आहेत. या पौष्टिक दुधामुळे अनेक आजार बरे होत असतात.
असे मानण्यात येते चंद्राचा सात्विक उजेड हा या दुधामध्ये पडल्यामुळे अनेक रोग बरे होतात. त्याचप्रमाणे काही भागांमध्ये कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी गरबा खेळण्याची नवीन प्रथा देखील आहे सर्वजण आनंदात एका ठिकाणी बसून गोड दूध मसाला दूध पिण्याचा कार्यक्रम करत असतात. त्यामुळे कोजागिरी पौर्णिमा पौर्णिमा हा एक एकोपा जोपासण्याचा उत्सव आहे.
कोजागिरी पौर्णिमे ची एक पौराणिक कथा प्रसिद्ध आहे ही गोष्ट फार वर्षांपूर्वीची आहे मगद नावाचे राज्य होते. या राज्यामध्ये एक गरीब आणि सुसंस्कृत असा एक ब्राह्मण राहत होता.
परंतु त्याची पत्नी ही त्या ब्राह्मणाप्रमाणे नव्हती ती दुष्ट होती. ब्राह्मण गरीब असल्यामुळे त्याची पत्नी त्याला त्रास द्यायची त्याच्याकडून अनेक कामे करून घ्यायची. त्या ब्राह्मणाला त्याच्या पत्नीचा खूप त्रास होत होता कारण की त्याची पत्नी त्याला चोरी करायला लावायची. तसेच अनेक वाईट कामे त्या गरीब ब्राह्मणाकडून करून घ्यायची.
तसेच एक दिवस हा ब्राह्मण पूजा करत असताना त्याच्या पूजेमध्ये त्याच्या पत्नीने व्यतय आणला होता आणि त्याची पूजा पाण्यामध्ये फेकून दिली होती. आता तो त्याच्या पत्नीला खूप जास्त प्रमाणात कंटाळला होता तिच्या त्रासामुळे तो आता जंगलात निघून गेला.
त्याला जंगलामध्ये काही नागकन्या भेटल्या त्याने त्यांना नागकन्याला त्याची अवस्था समजावून सांगितली नागकन्यांनी त्या गरीब ब्राह्मणाला कोजागिरी व्रत करण्याचा सल्ला दिला होता.
त्याने कोजागिरी व्रत केले आणि तो तेव्हापासून सुख त्याला सुख समृद्धी लाभली तसेच, त्याची पत्नीही त्याला त्रास देत नव्हती. ती आता चांगली झाली होती आणि त्याचा संसार सुखाने नांदत होता अशा प्रकारे कोजागिरी व्यक्त करण्याची पौराणिक कथा कोजागिरी पौर्णिमा निमित्त प्रसिद्ध आहे
कोजागिरी पौर्णिमा म्हणजेच कोण जागे आहे कोण जागृत आहे असे विचारत देवी सर्वत्र फिरत असते. नवरात्रातील नवरात्रातील नऊ दिवस बुद्धीच्या देवताचे उपासना करून विजयादशमीला विजय संपादनासाठी सिमोलंगण करावे व त्यानंतर येणारी ही पौर्णिमा असते. शेतीची कामे अर्ध्यावर झालेली असतात.
शेतातील पिके वाऱ्यावर डोलू लागलेली असतात. चार महिन्याचा पावसाळा ही संपत आलेला असतो. काही भागात नवीन पिके हाताशी आलेले असतात. अनेक भागातील ही नवरात्र पौर्णिमा असते.
कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी रात्री उशिरापर्यंत गप्पागोष्टी करतात, नृत्य साजरे करतात, गरबा खेळतात. आठवणीतील गाणी गातात, सर्वजन जागरण करतात व त्यानंतर दूध मसाला दूध प्राशन केले जाते. शरद ऋतूमध्ये हवामानात बरेच बदल घडून येत असतात.
एकीकडे पावसाळा संपत असतो आणि दुसरीकडे हिवाळा सुरू होत असतो. दिवसा गरम आणि रात्री थंडी पडते. दूध पिल्यामुळे पित्त प्रकोप कमी होतो.
कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी रात्री कोजागिरीचा शितल चांदणं अंगावर घेतले की मन शांती लाभते. मन शक्ती व आरोग्य उत्तम होतं.
कोजागिरी रात्री कोजागिरीच्या रात्री लोकांना चांदण्याचा आनंद मिळावा म्हणून अनेक शहरातील महानगरपालिका रस्त्यावरचे दिवे लावत नाहीत या दिवशी रात्री दूध गरम करून त्यामध्ये चंद्राला पाहता चंद्र ही त्या दिवशी 99% पूर्ण दिसतो त्यामुळे या रात्री वातावरण अगदी छान असते
आकाश फुले असते त्यामुळे या पौर्णिमेच्या चंद्राला हार्वेस्ट मून असेही म्हणतात या रात्री जे मसाला दूध तयार केले जाते आणि या दुधात चंद्राचे चांदणे पडले की ते दूध प्राशन करतात हे मसाला दूध पिण्याचे शास्त्रीय कारणे आहेत शरद ऋतूमध्ये मसाला दूध आरोग्यास चांगला असतो असे आयुर्वेदात सांगितले आहे.
नुकताच पावसाळा संपून शेतकऱ्याला हे नवीन पिके काढण्याची वेळ येते यामुळे प्रत्यक्ष शेतकऱ्याचा आनंद द्विगुणीत झालेला असतो हा शेतकरी वर्ग मोठ्या प्रमाणावर कोजागिरी पौर्णिमा साजरा करतो. हे प्रमाण ग्रामीण भागात अधिक दिसून येते.
याव्यतिरिक्त दमा, अस्थमा या आजाराने ग्रस्त असलेल्या लोकांसाठी हा दिवस महत्त्वाचा असतो. दमा असणाऱ्यांनी त्यांचा वैद्यकीय डोस या मसालेदार दुधामध्ये टाकून चंद्राच्या प्रकाशात ठेवावे व नंतर ते दूध प्राशन करावे हे दूध चंद्राच्या प्रकाशात असल्याने त्याचे गुणधर्म काही प्रमाणात बदलते व याचा फायदा निश्चित होतो.