Kotwal
- कोतवाल Kotwal हा गाव पातळीवरील 24 तास शासकीय नोकरीसाठी बांधील असतो.
- कोतवाल हा पूर्णवेळ काम करणारा चतुर्थ श्रेणीतील कनिष्ठ ग्राम नोकर आहे.
- कोतवालाची नेमणूक तहसीलदार करतात.
- 1959 पासून कोतवाल हे पद अस्तित्वात आहे.
- कोतवालांची संख्या गावच्या लोकसंख्येवर अवलंबून असते, मात्र एखाद्या गावी एकाहून अधिक कोतवाल नेमण्याचा अधिकार शासनाच्या परवानगीने संबंधित जिल्हाधिकाऱ्यास असतो.
- तीन पेक्षा अधिक कोतवालाची नियुक्ती करण्याचा अधिकार जिल्हाधिकाऱ्याला असतो.
गावची लोकसंख्या | कोतवालांची संख्या |
1000 पर्यंत | 1 कोतवाल |
1000 ते 2000 पर्यंत | 2 कोतवाल |
3000 पेक्षा अधिक | 3 कोतवाल |
- कोतवाल म्हणून नेमणूक होण्यासाठी संबंधित व्यक्तीचे वय कमीत कमी 18 व जास्तीत जास्त 40 वर्ष इतके असावे.
- कोतवाल पदी नेमणूक होण्यासाठी संबंधित व्यक्तीने कुळ कायद्यात नमूद केलेल्या धारणा क्षेत्रापेक्षा अधिक जमीन मालक किंवा कुळ या नात्याने धारण केलेली नसावी.
- कोतवालाची नेमणूक होण्यासाठी संबंधित व्यक्तीस तारणा दाखल रुपये 100 व दोन जामीन द्यावे लागतात.
- कोतवालावर नजीकचे नियंत्रण तलाठ्याचे असते.
- कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीने कोतवालावर पोलीस पाटील नियंत्रण ठेवतो.
- पूर्वीच्या वतनी ग्राम नोकरांना कोतवाल पदी नेमण्यास प्राधान्य दिले जाते.
- राज्यातील वंशपरंपरागत किंवा वतनी गाव कामगारांची नियुक्ती 1959 यावर्षी रद्द करण्यात आली.
- महाराष्ट्र ग्राम पोलीस अधिनियम 1967 प्रारंभापासूनच मुंबई शहर व मुंबई उपनगर या जिल्ह्यांना लागू नाही.
- कोतवालास आठ दिवसांची किरकोळ रजा देण्याचे अधिकार तलाठ्यास आहेत.
- कोतवालास अर्जित रजा मंजूर करण्याचे अधिकार तहसीलदारांना आहेत.
- गावचे दप्तर वरिष्ठ कार्यालयात ने आण करण्याची जबाबदारी कोतवालावर असते.
- गावातील जन्म-मृत्यू, विवाह इत्यादींच्या नोंदणीची माहिती ग्रामसेवकास देण्याची जबाबदारी कोतवालावर आहे.
- आवश्यक त्यावेळी गावकऱ्यांना चावडी किंवा सजा येथे बोलवण्याचे कार्य कोतवाल करतो. गावात दवंडी पिटवून सरकारी आदेश जाहीर करणे, गावात घडलेल्या गुन्ह्यांसंबंधी पोलीस पाटलास माहिती देणे इत्यादी काम कोतवाल करतो.
- पोलीस पाटलाच्या रखवालीतील कैद्यांवर कोतवाल पहारा ठेवतो.
- गावची चावडी व सजा साफसफाई करण्याचे काम कोतवाल करतो.
- कोतवालास निलंबित करण्याचे अधिकार तहसीलदारांना आहेत.
- गाव पातळीवर तलाठ्याच्या हाताखाली महसुलाचे काम करण्यासाठी कोतवालाची नेमणूक केलेली असते.
- 1 ऑगस्ट या दिवशी महाराष्ट्राच्या महसुली वर्षाची सुरुवात होते.
- कोतवालाच्या रजेच्या काळात शेजारच्या गावचा कोतवाल हा त्याचे कामकाज पाहतो.
- कोतवालास वयाची 60 वर्षे पूर्ण होईपर्यंत पदावर राहता येते.
- वेतन- पूर्वी कोतवालांचे वेतन दर महा रुपये 5,000 इतके होते. 8 जानेवारी 2019 रोजी ते दरमहा रुपये 7,500 इतके झाले.
- 1 एप्रिल 2023 पासून कोतवालांचे वेतन दरमहा रू. 15,000 इतके करण्यात आले आहे.
पुढे हे हि वाचा
महाराष्ट्र हवामान | https://mpsc.pro/maharashtra-climate-gk/ |
महाराष्ट्रातील वने व त्यांचे उपयोग | https://mpsc.pro/forests-in-maharashtra/ |
महाराष्ट्र राष्ट्रीय उद्याने | https://mpsc.pro/maharashtra-national-park/ |
महाराष्ट्रातील अभयारण्य:wild sanctuary in maharashtra | https://mpsc.pro/wild-sanctuary-in-maharashtra/ |
महाराष्ट्र-खनिजसंपत्ती | https://mpsc.pro/mineral-resources-in-maharashtra/ |
Industries in Maharashtra:महाराष्ट्र उद्योगधंदे | https://mpsc.pro/industries-in-maharashtra/ |