कृष्ण जन्माष्टमी

कृष्ण जन्माष्टमी ज्याला जन्माष्टमी किंवा गोकुळाष्टमी असेही म्हणतात. कृष्ण जन्माष्टमी हा सण आपल्या संपूर्ण भारत देशात मोठ्या उत्साहाने व आनंदाने साजरा केला जातो. या गोकुळाष्टमीच्या दिवशी भगवान श्रीकृष्णाचा जन्म झाला होता त्यामुळे हा कृष्ण जन्माष्टमीचा-Krushna Janmashtami दिवस आपण मोठ्या आनंदात साजरा करतो.

श्रावण महिन्यात कृष्ण अष्टमी या तिथीला मध्यरात्री रोहिणी नक्षत्रावर मथुरेत कंसाच्या बंदी शाळेत कारागृहात विष्णूचा आठवा अवतार असलेल्या श्रीकृष्णाचा जन्म झाला म्हणून त्या दिवशी आनंद उत्सव साजरा करण्याची प्रथा आहे.

कृष्ण हा देवकी आणि वासुदेव यांचा पुत्र आहे. कृष्णाचा जन्म झाला त्यात काळात छळ मोठ्या प्रमाणावर होता. लोकांचे स्वातंत्र्य नाकारले गेले होते. सर्वत्र वाईट गोष्टी होत्या आणि राजा कंस या त्याच्या मामाकडून त्याच्या जीवाला धोका होता. जन्मानंतर लगेच कृष्णाचे वडील वासुदेव यांनी त्याला यमुना नदी ओलांडून मथुरेतून गोकुळात पालनपोषण करण्यासाठी नेले.

वासुदेवाचा भाऊ नंद आणि वहिनी यशोदा हे कृष्णाचे पालक होते. कृष्णा सोबतचा त्याचा मोठा भाऊ म्हणून सर्पशेष बलराम देखील अवतार घेऊन पृथ्वीवर आला होता. जो वासुदेवाची पहिली पत्नी रोहिणी चा मुलगा होता. ही आख्यायिका जन्माष्टमीला लोक उपवास करून कृष्ण प्रेमाची भक्ती गीते गावून आणि रात्री जागरण करून साजरी करतात.

 कृष्णाच्या मध्यरात्रीच्या जन्मानंतर कृष्णाच्या बाळाच्या रूपाला आंघोळ घालण्यात येते. कपडे घातले जातात नंतर पाळण्यामध्ये ठेवले जाते. त्यानंतर भक्त हे अन्न आणि मिठाई वाटून उपवास सोडतात. स्त्रिया त्यांच्या घराच्या दाराबाहेर आणि स्वयंपाक घराबाहेर लहान पावलांचे ठसे काढतात आणि त्यांच्या घराकडे चालत जातात हे कृष्णाच्या त्यांच्या घरातील प्रवासाचे प्रतीक आहे.

आपण गोकुळाष्टमी या दिवशी संपूर्ण देशात दहीहंडी हा उत्सव साजरा करत असतो. महाराष्ट्रात तर मोठ्या संख्येने दहीहंडीच्या स्पर्धा आयोजित करण्यात येत असतात. भगवान श्रीकृष्णाला वेगवेगळ्या प्रकारची नावे आहेत जसे की कान्हा, गोपाल, केशव, गोविंद, बालगोपाल  इत्यादी. अनेक प्रकारचे कार्यक्रम सुद्धा या गोकुळाष्टमीच्या दिवशी साजरे करण्यात येतात.

भगवान श्रीकृष्णाने पृथ्वीतलावर  धर्माचे रक्षण करण्यासाठी जन्म घेतला होता, तेही एक साधारण मनुष्य म्हणून. त्यामुळे भगवान श्रीकृष्ण हे सृष्टीचे ब्रह्मांडनायक आहेत. भगवान श्रीकृष्णाने त्यांच्या या रूपात अनेक भयानक राक्षसाचा पराभव आणि वध केला.

आपल्या भारत देशात प्रत्येक भागात श्रीकृष्ण जन्माष्टमी ही वेगवेगळ्या प्रकारे साजरी करण्यात येते. गोकुळाष्टमीच्या दिवशी अनेक भागात भगवान श्रीकृष्णाच्या मूर्तीला दही दुधाचा अभिषेक घातला जातो या दिवशी भगवान श्रीकृष्ण यांची भक्ती गीते सुद्धा गायली जातात.

गोकुळाष्टमीच्या दिवशी घरामध्ये चांगले पदार्थ जेवणासाठी करतात देवाला नैवेद्य दाखवतात. गोकुळाष्टमीच्या दिवशी अनेक प्रकारचे कार्यक्रम साजरे करण्यात येतात. गोकुळाष्टमीला काल्याचा विशिष्ट प्रसाद केला जातो त्याला गोपालकाला असे म्हणतात. गोपाल म्हणजे गाईचे पालन करणारा.  कृष्णाच्या या जन्मोत्सवाच्या निमित्ताने काल्याचा प्रसाद केला जातो.

काला म्हणजे एकत्र मिळवणे पोहे, ज्वारीच्या लाह्या, धन्याच्या लाह्या, लिंबू, आंब्याचे लोणचे, दही, ताक, चण्याची भिजवलेली डाळ, साखर, फळांच्या फोडी इत्यादी घालून केलेला एक खाद्यपदार्थ म्हणजेच गोपालकाला. हा कृष्णास फार प्रिय होता असे मानले जाते कि, श्रीकृष्ण व त्यांचे सवंगडी मिळून यमुनेच्या तीरावर हा तयार करत असे व वाटून खात असे असे म्हणतात.

जन्माष्टमीच्या दुसऱ्या दिवशी गोपाळकाला सेवन करून उपवास सोडला जातो व गोविंदा आला रे आला गोकुळात आनंद झाला असे गाणे गात अनेक लहान थोर पुरुष घरोघरी नाचायला जातात व दहीहंडी फोडतात. कित्येक ठिकाणी गोपाळकाला करून कृष्ण चरित्रातील सोंग आणण्याची ही प्रथा आहे. या दिवशी महाराष्ट्रात विशेषतः मुंबईत उंच मडक्यात दही, दूध आणि भरलेला हंडा ठेवून तिथपर्यंत मानवी मनोरा वरून पोहोचून तो हंडा फोडण्याचा गोविंदा हा खेळ होतो.

श्रीकृष्ण आपल्या गाई चारताना आपण व आपले सवंगडी या सर्वांच्या शिदोऱ्या एकत्र करून त्या खाद्यपदार्थाचा काला करायचे व सर्वजण मिळून ते खायचे या कथेला अनुसरून गोकुळाष्टमीच्या दिवशी एका सजवलेल्या मडक्यात काला करून ते दोरीच्या साह्याने उंचावर बांधून  व मानवी मनोरे रचून ती दहीहंडी फोडण्याची प्रथा आहे. जास्तीत जास्त उंचीवर जाऊन हंडी फोडणाऱ्या गोविंदा पथकाला आकर्षक बक्षीस दिले जाते. यावेळेस गाणी नृत्य विविध कार्यक्रम साजरी केले जातात आणि बघण्याची जल्लोषासहित मोठी गर्दी जमलेली असते.

कृष्ण जन्माष्टमीच्या मागे एक पौराणिक कथा आहे श्रीकृष्णाचा जन्म झाला होता त्यावेळेस मथुरेत कंसाचे राज्य होते. कंस हा जुलमी तसेच पापी होता. त्याने अनेक निष्पाप लोकांवर अत्याचार केले होते. त्याच्या पापाने संपूर्ण मथुरा नगरी त्रस्त झाली होती. एवढेच नाही तर त्याने त्याच्या बहिण देवकीला सुद्धा तुरुंगात टाकले होते. त्याचप्रमाणे कंसाने देवकीच्या पतीला सुद्धा तुरुंगात दाबून ठेवले होते.

कंसाने देवकीच्या सात मुलांना मारून टाकले होते. भगवान श्रीकृष्णाच्या जन्माच्या आधी आकाशा मधून आकाशवाणी झाली होती आणि त्या आकाशवाणी मध्ये देवकीचा आठवा पुत्र कंसाचा वध करेल असे सांगण्यात आले होते. त्यामुळे कंस हा देवकीच्या आठव्या पुत्राला मारण्याचा सुद्धा प्रयत्न करीत होता भगवान श्रीकृष्णाच्या जन्माच्या वेळी संपूर्ण कारागृहाच्या पहारेकऱ्यांना बेशुद्ध झाली होती, त्यानंतर वासुदेव यांनी भगवान श्रीकृष्ण यांना एका टोपलीमध्ये ठेऊन तुडुंब भरलेली यमुना नदी पार करून सुरक्षित ठिकाणी म्हणजे गोकुळात आपल्या भावाजवळ ठेवले.

वासुदेव यांनी भगवान श्रीकृष्णाला यशोदा माता जवळ नेऊन ठेवले आणि यशोदा माता यांची कन्या घेऊन ते परत आले होते त्यानंतर भगवान श्रीकृष्णाचे पालन पोषण हे यशोदा माता यांनी केले. भगवान श्रीकृष्ण यांना जन्म हा देव की माता यांनी दिला आणि त्यांचे पालन पोषण यशोदा मातेने केले होते अशा प्रकारे भगवान श्रीकृष्ण यांच्या जन्माची कथा आहे.

कृष्ण जन्माष्टमीला शाळा,महाविद्यालये व सार्वजनिक ठिकाणी दहीहंडी फोडली जाते व जल्लोष साजरा केला जातो.

Leave a comment