maharashtra transport and communication:महाराष्ट्र वाहतूक व संदेशवहन

महाराष्ट्र राज्य हे भारतातील सर्वाधिक विकसनशील आर्थिक क्षेत्रांपैकी एक आहे. राज्य सुपीक जमीन आणि योग्य हवामान परिस्थितीने संपन्न आहे, ज्यामुळे राहणीमान इतरांना अनुकूल बनते. सर्व प्रमुख शहरांमधून रेल्वे, रस्ते, हवाई अगदी सागरी वाहतूक देखील उपलब्ध आहे आणि देशातील कोणत्याही ठिकाणी सहज पोहोचता येते.

Types of transport:वाहतूकीचे प्रकार

१) रस्ते वाहतूक

२) रेल्वे वाहतूक

३) सागरी वाहतूक

४) हवाई वाहतूक

१. रस्ते वाहतूक

वस्तू किंवा व्यक्तीचे एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी होणारे स्थानांतर म्हणजे वाहतूक होय.

वाहतूक मार्गामुळे आपल्या देशातील लोक आणि परदेशीय लोक संपर्कात येतात.

दुष्काळ, भूकंप, महापूर इत्यादी नैसर्गिक आपत्तींच्या वेळी तसेच राष्ट्राच्या संरक्षणासाठी वाहतुकीचे मार्ग महत्त्वाचे ठरतात.

मानवी शरीरात रक्त वाहिन्यांना जेवढ्या प्रमाणात महत्व आहे, तेवढयाच प्रमाणात देशाच्या विकासात रस्त्यांना  महत्व आहे.

जगात रस्ते वाहतूकीचे सर्वांत मोठे जाळे अमेरिकेत असून दूसरा क्रमांक भारताचा लागतो .

१९२७ साली रस्तेबांधणीच्या संदर्भात त्याती डॉ. जयकर यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमण्यात आली. दुसऱ्या महायुद्धाच्या काळात देशभर महत्त्वाच्या रस्त्यांचा विकास करण्याच्या दृष्टीने नागपूर येथे १९४३ साली एक परिषद भरून पूर्ण देशासाठी २० वर्षांची रस्ते- विकास योजना तयार झाली. ही योजना ‘नागपूर योजना’ म्हणून ओळखली जाते. त्याचा २० वर्षांचा कालावधी पूर्ण होण्यापूर्वी आढावा घेऊन संपूर्ण भारतासाठी ‘१९६१- ८१ योजना’ या नावाने ओळखली जाणारी नवीन रस्ते योजना आखली गेली. १९८१-२००१ कालावधीसाठी सुधारित योजना’ कार्यान्वित झाली.

राष्ट्रीय महामार्ग म्हणजे असे  महामार्ग जे केंद्र सरकार मार्फत तयार केले जातात त्या महामार्गांना राष्ट्रीय महामार्ग असे म्हणतात. विशेष म्हणजे केंद्र सरकार राष्ट्रीय महामार्ग तयार करत असते व त्यांची देखभालहि करत असते.

रस्ते वाहतूकीचे प्रकार :

१ ) द्रुतगती महामार्ग

2) राष्ट्रीय महामार्ग

3) राज्य महामार्ग

४ ) जिल्हा मार्ग

५ ) ग्रामीण रस्ते

द्रुतगती महामार्ग :

 मुंबई-पुणे दरम्यान देशातील प्रथम द्रुतगती महामार्ग निर्माण करण्यात आला असून हा ६ पदरी अतिजलद महामार्ग आहे. या महामार्गाची लांबी ९३ कि.मी. असून यास यशवंतराव चव्हाण द्रुतगती महामार्ग या नावाने ओळखला जाते. या महामार्गावरून दररोज ४३ हजार वाहने प्रवास करतात.

 मुंबई ते नागूपर  दरम्यानचा महामार्ग 701km लांब  व 120 मीटर रुंद आहे. हा महामार्ग 10 जिल्हे, 26 तालुके व 390 गावातून जातो.हा आठपदरी द्रुतगती महामार्ग आहे.हा महामार्ग समृद्धी महामार्ग (हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्ग) या नावाने ओळखला जातो .

राष्ट्रीय महामार्ग :

महाराष्ट्रातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गाची संख्या ३० आहे.

NH-1 दिल्ली ते अमृतसर हा देशातील पहिला राष्ट्रीय महामार्ग आहे

NH 6 (धुळे कोलकत्ता) हा राज्यातील सर्वाधिक लांबीचा राष्ट्रीय महामार्ग आहे. (महा. लांबी ८१३कि.मी.) NH4C (न्हावाशेवा -पळस्पे कोळंबी) हा राज्यातील सर्वात कमी लांबीचा राष्ट्रीय महामार्ग आहे.

राज्य महामार्ग :

महाराष्ट्रात प्रमुख शहरे जोडलेल्या तर रस्त्यांना ‘राज्य महामार्ग’ म्हणतात. त्याची देखरेख, बांधकाम आणि दुरुस्ती महाराष्ट्र सरकार पाहते. राज्य महामार्गाची लांबी बरीच वाढलेली आहे. त्यातील बरेच रस्ते राष्ट्रीय महामार्गास जोडलेली असतात .महाराष्ट्रात १९५१ साली ७,५२० कि.मी. लांबीचे राज्य महामार्ग होते. १९७१ साली त्यामध्ये १४,२८२ कि.मी. पर्यंत वाढ झाली होती. १९९१ साली सुमारे ३१,००० कि.मी., तर २००७-०८ साली सुमारे ३३,६७५ कि.मी. लांबीचे राज्य महामार्ग होते.

जिल्हा मार्ग:

जिल्हा रस्ते जिल्ह्याच्या मुख्यालयाला जिल्ह्याच्या इतर ठिकाणांशी जोडतात . या रस्त्यांची देखभाल ,बांधकाम, दुरुस्ती जिल्हा परिषदेकडून केली जाते

ग्रामीण रस्ते:

 जे रस्ते  ग्रामीण भाग आणि गावे शहरांशी जोडतात ते ग्रामीण रस्ते या वर्गवारीत येतात.

महाराष्ट्र रेल्वे वाहतूक

१८२५युरोप खंडात स्टॉक्सोम ते डार्लिंगटन या  शहरादरम्यान पहिली रेल्वे धावली. १९३६ मध्ये इंडिया कंपनीच्या राजवटीत मद्रास प्रांतात पहिली रेल्वेलाईन टाकण्यात अयशस्वी प्रयत्न झाला.

देशात पहिली रेल्वे १६ एप्रिल १८५३ मध्ये बोरीबंदर ते ठाणे या मार्गावर ३४ कि.मी. धावली.

१६एप्रिल १८५३ च्या पहिल्या रेल्वेत ४०० प्रवासी असून या गाडीला १४ डब्बे  होते. तर याच  रेल्वेत गाडीलासाहीब , सुलतान व सिंध  या तीन रेल्वे इंजिनचा वापर करण्यात आला. लागलेला वेळ १ तास १५ मि.

फेब्रुवारी१९२५ देशातपहिली विद्युत रेल्वे बोरीबंदर (VT) से कुर्ला व बोरीबंदर ते वांदा (१६ कि.मी.) धावली.

महाराष्ट्रात मध्य रेल्वे (CST) (छत्रपती शिवाजी टर्मीनल्स) व पश्चिम रेल्वे चर्चगेट मुंबई येथे आहेत.

महाराष्ट्रातील सर्वाधिक लांबीची  रेल्वे महाराष्ट्र एक्स्प्रेस असून हा रेल्वेमार्ग कोल्हापूर, नागपूर ,गोंदिया असा आहे.

मोनोरेल :१  फेब्रुवारी २०१४ रोजी भारतातील पहिल्या मोनोरेलचे मुंबई येथे उद्घाटन झाले. मोनोरेलचा मार्ग वडाला ते चेंबूर ( ८.९ कि.मी.)

मेट्रो रेल्वे : मुंबई शहरात मेट्रो रेल्वे सेवा सुरु ८ जून २०१४ ला वर्सोवा-अंधेरी – घाटकोपर (२० कि.मी.) अंतरावर  पहिल्यांदा धावली.

* अहमदाबाद – मुंबई – पुणे हा महाराष्ट्रातील बुलेट रेल्वेचा नियोजित मार्ग आहे.

कोकण रेल्वे:

कोकण रेल्वेचा शुभारंभ २६ जानेवारी १९९८

एकूण अंतर – ७६२ किमी,

तसी वेग – १६० किमी. आहे.मुंबई ते मंगलूर – ८४३ किमी 

महाराष्ट्रातील अंतर – ३८२ किमी 

राज्यातील कोकण विभागातील मुंबई शहर, मुंबई उपनगर, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या सहाही जिल्ह्यातून कोकण रेल्वे प्रवास करते

भारतात कोकण रेल्वे महाराष्ट्र, गोवा व कर्नाटक या तीन राज्यातून प्रवास करते.

रेल्वे मार्गाचे प्रकार:

रुंद मार्ग ( ब्रॉड गेज) -या मार्गातील दोन रुळांमध्ये १.६  मीटर अंतर असते.

मध्यम रुंद मार्ग (मीटर गेज) – या मार्गातील दोन रुळांमधील अंतर १  मीटर असते.

अरुंद मार्ग (नॅरो गेज) – या मार्गातील दोन रुळातील अंतर ०.७६२ मीटर असते.

प्रमुख  ब्रॉडगेज रेल्वेमार्ग:  महाराष्ट्र राज्य

मुंबई – दिल्ली (मध्य रेल्वे)

मुंबई – दिल्ली (पश्चिम रेल्वे )

मुंबई – चेन्नई(ग्रांड ट्रक)

दिल्ली – चेन्नई (ग्रांड ट्रक)

मुंबई – दिल्ली (मुंबई – सिकंदराबाद)

मुंबई – कोलकत्ता

मुंबई – कोल्हापूर

महाराष्ट्रातील अंतर्गत ब्रॉडगेज :

पुणे – मिरज, मिरज – कोल्हापूर, मांजरी – वनी – राजुर, मनमाड – औरंगाबाद, दौंड – मनमाड, चाळीसगाव – धुळे, तदळी – घुगुस ,औरंगाबाद – जालना, परळी वैजनाथ – उदगीर, जलंब – खामगाव, कन्हान – रामटेक, दौंड – बारामती, कर्जत – खोपोली, बडनेरा – अमरावती, तुमसर रोड –तिरोडा, नरखेड – अमरावती ,पूर्णा – खंडवा.

 महाराष्ट्रातील नॅरो गेज रेल्वेमार्ग :

 नेरळ – माथेरान, मूर्तिजापूर – अचलपूर – यवतमाळ, पाचोरा – जामनेर, लातूर – चंद्रपूर, पुलगाव – आर्वी.

महाराष्ट्र – सागरी वाहतूक

महाराष्ट्राला ७२० किमी  लांबीचा समुदकिनारा लाभला आहे  अंदाजे मुंबई व मुंबई  उपनगर  ११४ कि.मी., ठाणे १२७ कि.मी., रायगड १२२ कि.मी., रत्‍नागिरी २३७ कि.मी. आणि सिंधूदूर्ग १२० कि.मी. अशी ही किनारपटटी पसरलेली आहे. या किनारपटटीशी संलग्न ४८ लहान बंदरे असून रत्‍नागिरी व रेडी ही दोन मध्यम स्वरूपाची बंदरे आहेत. या किनारपटटीच्या जवळून वाहणा-या नदया व खाडया या किनारपटटीला येऊन मिळतात. हा प्रदेशही अत्यंत दूर्गम व अवघड आहे. वाहतूकीसाठी दूर्गम भूप्रदेश असलेल्या भागातील वाहतूकीची गरज ही किनारपटटी पूर्ण करते.

आंतरराष्ट्रीय बंदरांच्या संख्येत तामिळनाडूचा प्रथम क्रमांक लागतो. तर छोटा बंदराच्या संख्येत महाराष्ट्राचा प्रथम क्रमांक लागतो. महाराष्ट्रातील पालघर, ठाणे, मुंबई उपनगर, मुंबई शहर, रायगड, रत्नागिरी व सिंधुदुर्ग या ७ जिल्ह्यांना समुद्रकिनारा लाभला

आहे.

मुंबई बंदर (नैसर्गिक बंदर) :

मुंबई बंदराला ‘भारताचे पूर्वेकडील प्रवेशद्वार’ म्हणतात. मुंबई हे देशातील प्रमुख आंतरराष्ट्रीय नैसर्गिक बंदर आहे. व

सर्वात जास्त मालाची वाहतूक केली जाते.

मुंबई बंदरातून खनिज तेल, रसायने, कापूस, इलेक्ट्रॉनिक वस्तू, कागद, धातू खनिजे, तेलबिया, लोकर, हाडे, यंत्रे, दागदागिने इत्यादी वस्तूची आयात निर्यात चालते. मुंबई हे बारमाही सुरु राहणारे बंदर आहे.

२) जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट (JNPT) नाव्हा – शेवा बंदर (रायगड):

मुंबई बंदरावरील ताण कमी करण्यासाठी मुंबई जवळ नाव्हा – शेवा (जि. रायगड) येथे जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट (JNPT) बंदराची उभारणी करण्यात आली.

JNPT हे अत्याधुनिक आंतरराष्ट्रीय बंदर असून ते संपूर्ण संगणीकृत व उपग्रहाद्वारे जोडण्यात आलेले देशातील पहिलेच

बंदर असून से हायटेक चंदर असून हे भारतातील सर्वात मोठे कंटेनर वाहतूक करणारे बंदर आहे.

ठाणे जिल्ह्यातील मुंब्रा हे रेतीबंदर आहे.

महाराष्ट्रातील पहिले खाजगी बहुउददेशिय बंदर कान्होजी आंग्रे बंदर.

रेडी बंदर हे लोहखनिजाच्या निर्यातीसाठी प्रसिध्द आहे.

महाराष्ट्र हवाई वाहतूक :- (विमान वाहतूक)

हवाई वाहतूक हा वाहतूकीचा अतिवेगवान व खर्चिक असा प्रकार आहे.

आकाशातून हवाई जहाज वा हवाई वाहनांद्वारे केली जाणारी मुलकी वाहतूक. हवाई वाहन उद्योगांचे मुलकी व लष्करी असे दोन मुख्य भाग आहेत. लष्करी वाहन व्यवहार हा पूर्णतः लष्करी गरजांनुसार चालविला जातो. त्याची ध्येये व उद्दिष्टे सैन्य दलांशी संबद्ध असून त्याचे व्यवस्थापन लष्करातर्फे चालते.

मुलकी हवाई वाहन व्यवहार हा मुख्यतः प्रवासी, टपाल व इतर मालाची ने-आण करण्याकरिता असतो त्याचा खर्च ही महत्त्वाची बाब असते. बहुतेक मालवाहतुकीची विमाने महाग व वजनाने हलका असलेला माल (उदा., इलेक्ट्रॉनीय उपकरण सामग्री व यंत्रभाग) वाहून नेतात. ही विमाने त्वरित पोहोचविणे आवश्यक असलेल्या नाशवंत मालाचीही (उदा., फुले, फळे व भाजीपाला) वाहतूक करतात. सर्वांत मोठी मालवाहू विमाने बांधकाम सामग्री व लष्करी सामग्री यांसारखा जास्त अवजड मालही वाहून नेऊ शकतात. कित्येक मालवाहू विमाने धातूच्या मोठ्या पेटाऱ्यांतून माल वाहून नेतात. हे पेटारे या विमानांत सुलभपणे व त्वरित चढविणारी यंत्रसामग्री वापरण्यात येते.

स्वातंत्र्यपूर्व काळात ब्रिटिशांनी विमान वाहतुकीच्या संदर्भात दोन महत्त्वपूर्ण कायदे केले होते. ते १९३४ व १९३७ चे विमानविषयक कायदे म्हणून प्रसिद्ध आहेत.

१ एप्रिल १९५५ ला भारतीय विमानतळ प्राधीकरणाची स्थापना करण्यात आली.

एअर इंडियाची स्थापना १९५३ ला करण्यात आली त्याचे मुख्यालय मुंबईला आहे

इंडियन एअर लाईनाचे मुख्यालय नवी दिल्ली येथे आहे.

भारत देशातून प्रवासी व मालाची वाहतूक करण्यासाठी ‘एअर इंडिया’ ही कंपनी विमान सेवा पुरविते.

१९४५ मध्ये ‘इंटरनॅशनल एअर ट्रान्सपोर्ट असोसिएशन’ (आय्. ए. टी. ए.) ही हवाई वाहतूकदारांची जागतिक संघटना स्थापन करण्यात आली. महायुद्धानंतरचे संभाव्य अडथळे टाळणे आणि हवाई वाहतूक सुलभ करणे, ही या संघटनेची उद्दिष्टे होती.

महाराष्ट्रातून आंतरराष्ट्रीय व राष्ट्रीय वाहतूक हवाई मार्गाने चालते.

मुंबई हे (सहारा ) भारतातील सर्वात मोठे आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे.

महाराष्ट्रात मुंबई, पुणे, औरंगाबाद, नागपूर या शहरातून अंतरराष्ट्रीय वाहतूक होते.

नवी मुंबई (ठाणे जिल्हा ) येथे आतरराष्ट्रीय दर्जाचे विमानतळ आहेत.

पुणे येथून शेजारील राष्ट्रात हवाई मार्गाने जाता येते ते औरंगाबाद येथून हज यात्रेस जाण्यासाठी प्रवास करता येतो.

नांदेड,अमरावती ,नागपूर ,लातूर,कराड,जळगाव ,अहमदनगर ,सोलापूर,सांगली ,कोल्हापूर,भंडारा, नाशिक ,धुळे इ. शहरात हवाई वाहतूक चालते .

महाराष्ट्र संदेशवहन

 व्यक्ती-व्यक्ती किंवा समूह यांचा परस्परांशी साधला जाणारा संपर्क किंवा विचारांची देवाण-घेवाण,ज्ञान, माहिती किंवा तंत्र यांचे संक्रमण म्हणजे संदेशवहन होय. 

दूरध्वनी  ,भ्रमणध्वनी सेवा , दूरदर्शन प्रसारण ,आकाशवाणी प्रसारण  आणि इंटरनेट यासारख्या कोणत्याही माध्यमाद्वारे संदेशवहन  केले जाते.

आधुनिक संदेशवहन साधनांमुळे देशातील तसेच जगातील कोणत्याही ठिकाणी अल्पावधीत संपर्क साधणे शक्य झाले आहे. आपत्तीच्या वेळी, विशेष प्रसंगी जलद संदेशवहनाचे काम तार विभाग करतात.

पारंपरिक संदेशवहनाची साधने :-

(i) पूर्वीच्या काळी संदेशवहनासाठी प्राणी, पक्षी, मानव यांच्या माध्यमांमार्फत संदेश वहन केल्या जात असे. त्यांना पारंपरिक संदेशवहनाची साधने असे म्हणतात. 

(ii) पारंपरिक संदेशवहनाच्या साधनांच्या वेगाला मर्यादा आहेत.

(iii) उदा. आरोळी किंवा दवंडी, आग किंवा संकेत वर हावभाव, वादये वाजविणे किंवा ध्वज पताका फडकविणे, कबूतर, प्राणी, दूत, जहाज, रेल्वे, मोटारी ही पारंपरिक संदेशवहनाची साधने आहेत.

आधुनिक संदेशवहनाची साधने  :-

(i) उपग्रह संदेशवहन यंत्रणेमुळे जी साधने विकसित झाली. या विकसित साधनांच्या मार्फत होणाऱ्या संदेशवहनास आधुनिक संदेशवहनाची साधने असे म्हणतात. 

(ii) विज्ञानाच्या प्रगतीमुळे आधुनिक संदेशवहन साधनांच्या वेगाला मर्यादा नाहीत.

(ii) उदा. टपालसेवा, तार, दूरध्वनी,सागरी तारा, आकाशवाणी, वर्तमानपत्रे, दूरचित्रवाणी, बिनतारी संदेश यंत्रणा , टेलिफोन, टेलिग्राफ, एलसिडी, लॅपटॉप, व्हिडिओ ऑडियो टेप, सिनेमा, मोबाईल, टेलेक्स, उपग्रह, इंटरनेट इ. आधुनिक संदेशवहनाची साधने आहेत.

१९२७ ला मुंबई रेडिओ ची सुरुवात झाली. 

१९५७ ला आकाशवाणी विविधभारती सुरु झाली.

२ ऑक्टोबर १९७२ ला मुंबई येथे दुरदर्शन सुरु झाले. तर १५ सप्टेंबर १९५९ ला दिल्ली येथे पहिल्यांदा दुरदर्शन प्रसारण झाले व १९८० पासून रंगीत दुरदर्शन सुरु झाले.

१९८२ पासून दूरदर्शनवर राष्ट्रीय आशियाई खेळांचे राष्ट्रीय प्रसारण सुरु झाले. १९९१ पासून खाजगी वाहिनी सुरु झाल्या तर १६ डिसेंबर २००४ पासून DTH सेवा सुरु झाली

देशात १८५१ मध्ये कोलकत्ता ते डायमंड हार्बर या दरम्यान पहिली टेलीफोन लाईन सुरु झाली मुंबई व दिल्ली या दोन महानगरामध्ये ‘महानगर टेलीफोन निगम लिमिटेड’ टेलीफोन सेवा पुरविते

विदेशी टेलीफोन सेवा पुरवण्यासाठी ‘विदेश संचार निगम लिमिटेड’ ची स्थापना करण्यात आली ती सध्या टाटा मार्फत चालविली जाते.

4-जी ही वायरलेस मोबाईल सेवेची चौथी पिढी आहे.

१५ ऑगस्ट १९९५ पासून भारतात इंटरनेट सुविधा सुरु झाली .

 दूरसंदेश वहनासाठी देशातील सर्वांत मोठे उपग्रह सेवा केंद्र आर्वी (ता. जुन्नर, जि. पुणे) येथे आहे.

मुंबई दूरदर्शनची दुसरी वाहिनी १९८५ मध्ये सुरु झाली.

देशातील सर्वात मोठी टपालकचेरी मुंबई येथे आहे. टेलिफोन सेवा म्हणजे सेल्युलर सेवा होय. भारत संचार निगम लिमिटेड ची स्थापना १ ऑक्टोबर २००० मध्ये करण्यात आली.

१९८६ मध्ये महानगर टेलिफोन निगम लिमिटेड व विदेश संचार निगम लिमिटेडची स्थापना करण्यात आली. 5 महाराष्ट्रात सर्वात प्रथम १९२७ मध्ये मुंबई येथे आकाशवाणी केंद्र सुरु करण्यात आले.

भारतात स्वातंत्र्यापूर्वी केवळ ६ आकाशवाणी केंद्र होती..

भारतात सध्या ३००च्या दरम्यान आकाशवाणी केंद्र आहेत..

Leave a comment