मे 1946 मध्ये कॅबिनेट मिशानानुसार (त्रीमंत्री योजना) भारतीय संविधान निर्माण करण्यासाठी एका संविधान (घटना) समितीची निर्मिती करून प्रस्ताव ठेवण्यात आला.
घटना समितीच्या एकूण 22 उपसमित्या होत्या. Major Committees of the Constituent Assembly त्यापैकी मसुदा समिती हि महत्वाची मानली जाते.
घटना समितीच्या काही प्रमुख समित्या व त्यांचे अध्यक्ष खालीलप्रमाणे-
समिती | अध्यक्ष |
मसुदा समिती | डॉ. बाबासाहेब आंबेडकर |
संघराज्य अधिकार समिती | पं. जवाहरलाल नेहरू |
प्रांतीय राज्यघटना समिती | सरदार वल्लभभाई पटेल |
अर्थ व स्टाफ समिती | डॉ. राजेंद्र प्रसाद |
सुकाणु समिती | डॉ. राजेंद्र प्रसाद |
मसुदा राज्यघटना चिकित्सा समिती | सर अलादी कृष्णस्वामी अय्यर |
भाषा समिती | मोटुरी सत्यनारायण |
राज्य घटना समितीचे कार्य | ग. वा. मावळणकर |
मूलभूत हक्क व अल्पसंख्यांक सल्लागार समिती | सरदार वल्लभभाई पटेल |
संघराज्य घटना समिती | पं. जवाहरलाल नेहरू |
राज्य समिती | पं. जवाहरलाल नेहरू |
नियम समिती | डॉ. राजेंद्र प्रसाद |
राष्ट्रध्वजासंबंधी समिती | डॉ. राजेंद्र प्रसाद |
गृह समिती | डॉ. बी. पट्टाभीसितारामय्या |
अधिकारपत्र समिती | सर अलादी कृष्णस्वामी अय्यर |
भाषिक प्रांतांवरील समिती | के. एम. मुन्शी |
मुलभूत हक्क विषयक उपसमिती | जे. बी. कृपलानी |
अल्पसंख्यांक विषयक उपसमिती | एच. सी. मुखर्जी |
ईशान्य राज्य विषयक उपसमिती | गोपीनाथ बार्डोलोई |
असाम व अन्य क्षेत्रातील वगळलेल्या क्षेत्रासाठी उपसमिती | ए. व्ही. ठक्कर |
मसुदा समिती :
26 ऑगस्ट 1947 ला मसुदा समितीची(Drafting Committee) स्थापना करण्यात आली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे मसुदा समितीचे अध्यक्ष होते.
मसुदा समितीची रचना – 1 अध्यक्ष + 6 सदस्य
मसुदा समितीचे सदस्य –
- अलादी कृष्णस्वामी अय्यर
- कन्हैयालाल मानणेकलाल (के. एम.) मुन्शी
- सय्यद मोहम्मद सादुल्ला
- डी.पी. खेतान ( खेतानच्या मृत्यूनंतर) टी. कृष्णाम्माचारी
- एन. गोपालस्वामी अय्यंगार (यांच्या मृत्यूनंतर) एन. माधवराव