MPSC PRE GROUP-C 2024
जाहिरात क्रमांक : ०४९/२०२४-MPSC PRE GROUP-C 2024
महाराष्ट्र शासनाच्या विविध विभागांतर्गत खालील संवर्गातील एकूण १३३३ पदांच्या भरतीकरीता महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत महाराष्ट्र गट- क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा-२०२४, रविवार, दिनांक ०२ फेब्रुवारी २०२५ रोजी महाराष्ट्रातील एकूण ३७ जिल्हा केंद्रांवर घेण्यात येईल
क्र.
१
उद्योग निरीक्षक,
विभाग-उद्योग उर्जा व कामगार विभाग
वेतनश्रेणी-S-१३ : रु. ३५४००-११२४०० अधिक महागाई भत्ता व नियमाप्रमाणे देय भत्ते.
एकूण पदे-३९
२
कर सहायक
वित्त विभाग
s-८ : रु. २५५००-८११०० अधिक महागाई भत्ता व
नियमाप्रमाणे देय इतर भत्ते
एकूण पदे-४८२
३
तांत्रिक सहायक,
वित्त विभाग
S-१०: रु. २९२००-९२३००
अधिक महागाई भत्ता व
नियमाप्रमाणे देव इतर भत्ते
एकूण पदे-०९
४
बेलिफ व लिपिक, गट-क, नगरपाल (शेरीफ), मुंबई यांचे कार्यालय
विधी व न्याय विभाग
S-६ : रु. १९९००-६३२०० अधिक महागाई भत्ता व नियमाप्रमाणे देय इतर भत्ते
एकूण पदे-१७
५
लिपिक-टंकलेखक
मंत्रालयीन प्रशासकीय विभाग तसेच राज्य शासनाची महाराष्ट्रातील विविध कार्यालये
S-६ : रु. १९९००-६३२०० अधिक महागाई भत्ता व नियमाप्रमाणे देय इतर भत्ते
एकूण पदे-७८६
२. प्रस्तुत परीक्षेमधून भरावयाच्या विविध संवर्गातील सर्व पदांचा सविस्तर तपशील सोबतच्या परिशिष्ट-एक मध्ये नमूद केल्याप्रमाणे आहे:-
३. संयुक्त पूर्व परीक्षेच्या निकालाधारे मुख्य परीक्षेच्या प्रवेशासाठी पात्र ठरलेल्या उमेदवारांकरीता मुख्य परीक्षेचा दिनांक स्वतंत्रपणे जाहीर करण्यात येइल. ३.१ प्रस्तुत जाहिरातीमध्ये विहित केलेल्या अटी व शर्तीची पुर्तता करणा-या उमेदवारांकडून आयोगाच्या ऑनलाईन अर्ज प्रणालीद्वारे अर्ज मागविण्यात येत आहेत.
अर्ज सादर करण्याची प्रक्रिया/कालावधी :-
तपशील
अर्ज सादर करण्याचा कालावधी:-दिनांक १४ ऑक्टोबर, २०२४ रोजी १४.०० पासून दिनांक ०४ नोव्हेंबर २०२४ रोजी २३:५९ वाजेपर्यंत
ऑनलाईन पद्धतीने विहित परीक्षा शुल्क भरण्याचा अंतिम दिनांक:-दिनांक ०४ नोव्हेंबर, २०२४, २०२४ रोजी २३:५९ वाजेपर्यंत
भारतीय स्टेट बँकेमध्ये चलनाद्वारे परीक्षा शुल्क भरण्यासाठी चलनाची प्रत घेण्याचा
दिनांक ०६ नोव्हेंबर, २०२४ रोजी २३:५९ वाजेपर्यंत
चलनाद्वारे परीक्षा शुल्क भरण्याचा अंतिम दिनांक:- दिनांक ०७ नोव्हेंबर, २०२४ रोजी बँकेच्या कार्यालयीन वेळेमध्ये
सविस्तर जाहिरातीसाठी येथे MPSC PRE GROUP-C 2024 click करा