Ramjaan Eid-रमजान हा सण इस्लाम धर्मातील मुस्लिम बांधव साजरा करतात. रमजान हा एक इस्लामी सण आहे. रमजान हा इस्लाम धर्मातील सर्वात मोठा सण आहे. भारतामध्ये अनेक वेगवेगळ्या जातीचे आणि धर्माचे लोक राहतात हे वेगवेगळ्या जातीचे आणि धर्माचे लोक आपआपले वेगवेगळे सण साजरा करतात. तसेच रमजान ईद हा एक प्रकारचा सण आहे जो इस्लाम धर्माचे लोक साजरा करतात.
रमजान हा सण रमजानच्या पवित्र महिन्याच्या शेवटच्या दिवशी साजरा केला जातो आणि या रमजान महिन्यात मुस्लिम लोक पहाटेपासून संध्याकाळपर्यंत निर्जळी उपवास करतात.
पवित्र रमजान महिन्यात चंद्र दर्शन होईपर्यंत दररोज उपवास म्हणजेच रोझे पाळले जातात. यामध्ये सूर्योदयापूर्वी अन्नग्रहण केले जाते व सूर्यास्तापर्यंत उपवास पाळला जातो. सूर्यास्तानंतर नमाज अदा केल्यानंतर हा उपवास सोडला जातो. असे दररोज महिनाभर रोजे पाळले जातात.
या काळात कुराण ग्रंथाचे वाचन, चिंतन आणि मनन केले जाते. रमजान महिन्यातील रोजे संपल्यानंतर ईद येते. ईदच्या दिवशी सर्वजण मुस्लिम बांधव मशिदीमध्ये एकत्र येऊन त्यांच्या प्रगतीसाठी आणि कल्याणासाठी प्रार्थना करतात.
ईद हा सण मुस्लिम लोकांच्या मध्ये कुटुंबासाठी एकत्र येण्यासाठी आणि प्रार्थना करण्यासाठी स्वतःला समर्पित करण्याची वेळ असते आणि या दिवशी मुस्लिम बांधव प्रार्थनेसाठी मशिदींना भेट देतात तसेच या दिवशी मुस्लिम बांधवामध्ये नवीन पोशाख घालण्याची प्रथा आहे. रमजान हा सण नवीन चंद्राच्या पहिल्या दर्शनाने सुरू होतो.
ईदला सर्वजण नवीन वस्त्र परिधान करून मुस्लिम बांधव ईदगाह किंवा मशिदीमध्ये नमाज अदा करायला जातात. अल्लाच्या प्रति नमाज अदा केल्यानंतर मुस्लिम बांधव एकमेकांना अलिंगन देऊन ईद मुबारक म्हणून ईदच्या शुभेच्छा देतात.
या दिवशी मित्र असो वा शत्रू ते दोघांची गळाभेट घेऊन शुभेच्छा देतात. ईदच्या दिवशी मुस्लिम धर्मातील महिला वर्गात मोठा उत्साहात दिसून येतो. पहिल्या दुसऱ्या रोजापासून घरात शेवया तयार करायला लागतात. ईदला आपल्या घराला रंगरंगोटी करतात, घराची साफसफाई करतात.
ईदच्या दिवशी आप्तजनांना व मित्र परिवाराला आपल्याकडे शीरखुर्मा, गुलगुले खाण्यासाठी आमंत्रित करतात. दुसरा दिवस हा बासी ईद या नावाने ओळखला जातो. रमजान ईद या दिवशी सर्व मुस्लिम लोक मशिदीमध्ये समाजासाठी उपस्थित राहतात आणि त्या ठिकाणी त्यांच्या प्रगतीसाठी कल्याणासाठी प्रार्थना करतात.
मुस्लिम लोक नवीन कपडे घालतात तसेच मशिदीच्या वाटेवर खजूर सारखे गोड पदार्थ वाटण्याची व खाण्याची पद्धत आहे. त्याचबरोबर ईदच्या प्रार्थनेपूर्वी प्रत्येक मुस्लिमांनी गरिबांना खायला मदत करतात,धर्मदाय संस्थेला देणगी देखील देतात. ईदच्या दिवशी देशांमध्ये सार्वजनिक सुट्टी देखील असते आणि या दिवशी सर्व लोक या सणाचा आनंद घेतात.
आपल्याला माहित आहे की आपण बहुतेक सणांना आपल्या प्रियजनांना भेट म्हणून छोटी-मोठी भेट वस्तू देतो तसेच ईद या सणांमध्ये देखील मुस्लिम लोक आपल्या प्रियजनांना छोट्या मोठ्या वाईट वस्तू देतात या भेटवस्तू सोबत ईद मुबारक अशा शुभेच्छा देतात.
ईद सणाविषयी आणि रमजान महिन्याविषयी इस्लाम लोकांच्या मते असे मानले जाते की, त्यांचे पवित्र करून प्रेषित मोहम्मद हे रमजान महिन्यांमध्ये अवतरले होते आणि म्हणून इस्लाम लोक हा महिना पवित्र मानतात आणि या महिन्यांमध्ये मुस्लिम बांधव पहाटेपासून संध्याकाळपर्यंत कडक उपवास करतात असे ते महिनाभर रोज करतात आणि संध्याकाळी फळे खातात.
इस्लाम धर्माचे संस्थापक प्रेषित हजरत मोहम्मद पैगंबर यांचा जन्म इसवी सन 571 मध्ये सौदी अरेबियाच्या मक्का या गावी झाला जन्मानंतर मोहम्मद पैगंबर यांचे पितृछत्र हरपले होते. वयाच्या सहाव्या वर्षी त्यांच्या मातोश्रींना पण देवाज्ञा झाली.
लहानपणीस माता पिताचे छत्र हरपलेल्या अशा या एकाकी पडलेल्या बालकाचे त्याच्या चुलत्याने संगोपन केले. पुढे ते धर्माचे संस्थापक बनले. आपल्या जीवनकाळात हजरत मोहम्मद यांनी समस्त मानव जीवनाला उदारता, समता, विश्वबंधुत्व, सामाजिक न्याय आणि समरसतेची शिकवण दिली. त्यांची शिकवण केवळ काही विशिष्ट जाती-धर्मापुरतीच मर्यादित नव्हती तर संपूर्ण मानव जातीच्या कल्याणासाठी होती.