Revenue Administration
- तहसीलदार हा तालुका दंडाधिकारी म्हणून काम करतो. तालुक्यातील कायदा व सुव्यवस्था सांभाळण्याची जबाबदारी तहसीलदारावर असते.
- जिल्हा दंडाधिकारी म्हणून जिल्हाधिकारी काम करतो.
- जिल्हाधिकारी हा निवडणूक अधिकारी व जनगणना अधिकारी असतो.
- रस्ते बांधणे व जिल्हा परिवहन समितीचा पदसिद्ध अध्यक्ष जिल्हाधिकारी असतो.
- महाराष्ट्र ग्राम पोलीस अधिनियम मुंबई शहर व मुंबई उपनगर दोन जिल्ह्यांना लागू नाही.
- महसूल खात्याचे ग्राम स्तरावरील दप्तर तलाठ्याकडे असते.
- तहसीलदारास पोलीस पाटील यास रजा देण्याचे अधिकार आहेत.
- पोलीस पाटलाची हंगामी नेमणूक तहसीलदार करतो.
- जिल्हाधिकारी हा प्रशासनातील जिल्ह्याचा सर्वोच्च अधिकारी आहे.
- पालकमंत्री हा जिल्हा नियोजन मंडळाच्या अध्यक्ष असतो.
- महापौर पदाची मुदत अडीच वर्ष आहे.
- पोलीस पाटील हा मुलकी (महसूल) प्रशासनातील शेवटचा घटक आहे.
- 1963 मध्ये वंश परंपरेनुसार भरली जाणारी पोलीस पाटील पद रद्द करण्यात आले.
- पोलीस खात्यावर ग्रह खात्याचे नियंत्रण असते.
- जिल्हा परिषद महिलांसाठी 50 टक्के जागा राखीव असतात.
- जिल्हा परिषदेला 70 टक्के जमीन महसुलाच्या अनुदान राज्य सरकारकडून मिळते.
- तलाठ्याच्या कार्यालयाला सजा म्हणतात.
- उपजिल्हाधिकारी किंवा प्रांताधिकारी पोलीस पाटलास निलंबित करतो.
- देशातील पहिले महिला पोलीस पथक मुंबईमध्ये सुरू झाले.
- 1955 कर्नाटक, तामिळनाडू, दादरा नगर हवेली येथे द्विस्तरीय पंचायत राज पद्धती आहे.
- गाव पातळीवर तलाठ्याच्या हाताखाली महसुलाचे काम करण्यासाठी कोतवाल असतो.
- जिल्हा नियोजन मंडळाचा पदसिद्ध सचिव जिल्हाधिकारी असतो.
- राज्य शासनाच्या अधिकाऱ्याच्या योग्य क्रम पुढीलप्रमाणे
कमिशनर
कलेक्टर
तहसीलदार
- तालुक्यात पिकांची आणेवारी तहसीलदार पाठवतो.
- शासकीय जमिनीवर झालेली अतिक्रमणे तहसीलदारास तलाठी कळवतो.
- प्रत्येक गावातील जमीन धारकांच्या नोंदी तलाठी ठेवतो.
- मंत्रिमंडळातील खात्याचा प्रशासकीय प्रमुख सहाय्यक सचिव असतो.
- जमीन महसुलाचा मुख्य आधार जमिनीचा अभिलेख असतो.
- कोतवालाची नेमणूक तहसीलदार करतो.
- रोजगार हमी योजनेचा प्रमुख जिल्हाधिकारी असतो.
- कोतवाल पोलीस पाटलाच्या कार्यात मदत करतो.
- कार्यकारी प्रमुख, उपविभाग दंडाधिकारी, उपविभाग निवडणूक प्रमुख प्रांताधिकारी असतो.
- शेत जमिनीचा फेरफार उतारा तलाठ्याशी संबंधित आहे.
- खेड्यात जन्म-मृत्यूची नोंद ग्रामसेवक ठेवतो.
- आर्थिक विकेंद्रीकरण चा ठराव लॉर्ड मेओने मांडला.
- सरपंच आपल्या पदाचा राजीनामा पंचायत समिती सभापतीकडे देतो.