Rivers in Maharashtra:महाराष्ट्रातील नद्या

* पश्चिम घाट किंवा सह्याद्री हा महाराष्ट्रातील नद्यांचा प्रमुख उगमस्रोत असून तोच या नद्यांचा प्रमुख जलविभाजक आहे. त्यामुळे राज्यातील नद्यांचे मुख्यतः दोन भागात वर्गीकरण झाले.Rivers in Maharashtra

१) पश्चिम वाहिनी नद्या

२) पूर्ववाहिनी नद्या

३) दक्षिणवाहिनी नद्या

१) पश्चिम वाहिनी नद्या (अरबी समुद्राला मिळणाऱ्या)

* भारतीय पठारी प्रदेशावर वाहणाऱ्या तापी व नर्मदा या पश्चिम वाहिनी नद्या असून त्या महाराष्ट्राच्या उत्तरेकडील प्रदेशातून पश्चिमेकडे वाहतात.

*तापी राज्यातील सर्वाधिक लांबीची पश्चिम वाहिनी नदी आहे.

तापी नदी (Tapi River):Rivers in Maharashtra

*उत्तर महाराष्ट्रातील तापी ही प्रमुख नदी असून महाराष्ट्र राज्यात दोन वेळेस प्रवास करणारी नदी म्हणून ओळखली जाते. ही नदी अमरावती जिल्ह्यात प्रवेश करते व पुन्हा मध्यप्रदेश राज्यात जाते.

*उगमस्थान – मध्यप्रदेश राज्यात सातपुडा पर्वत रांगेत, बैतूल जिल्ह्यात मुलताई येथे उगम पावते व पश्चिमेकडे वाहते. तसेच तापी नदी सातपुडा व सातमाळा अजिंठा डोंगररांगातून वाहते.

*नदीचा प्रवास – मध्यप्रदेश, महाराष्ट्र व गुजरात.

*महाराष्ट्रातील नदीची  लांबी २०८ कि.मी.

*प्रवास – अमरावती- जळगाव-धुळे- नंदुरबार

*प्रवाहाची दिशा : पूर्वेकडून पश्चिमेकडे.

*नदीकाठचे शहर – भुसावळ

*उपनद्या – वाघूर, अंजनी, मोर, शिवा, अनेर, बुराई, गोमाई, अफनावती, पुर्णा, काटेपुर्णा, मोरणा, नळगंगा, माण, गिरणा, पार्झरा, बोरी, अंभोरा इत्यादी.

*तापीची प्रमुख उपनदी पूर्णा नदी आहे .

*तापी खोऱ्यात अमरावती, जळगाव, अकोला, बुलढाणा इत्यादी जिल्ह्याचा समावेश होतो.

*तापी ही राज्यातील प्रमुख पश्चिम वाहिनी नदी असून गुजरात राज्यात सुरत शहराजवळ खंबातच्या आखातात(अरबी समुद्रात) विलीन होते.

 पूर्णा नदी(Purna River):Rivers in Maharashtra

*पूर्णा ही तापीची प्रमुख उपनदी असून तापी-पूर्णा ही उत्तर महाराष्ट्रातील नदी खोर आहेत.

*उगम गाविलगड डोंगररांगा (जि. बैतुल, मध्यप्रदेश)

*उपनद्या – शहानूर, काटेपूर्णा, चंद्रभागा, मोर्णा, उमा, मून, पठार, आस, ज्ञानगंगा, नळगंगा, बाणगंगा

*पूर्णा नदी खानदेशात तापी नदीला डाव्या किनाऱ्यावर मिळते.

*पुर्णा ही तापीची प्रमुख उपनदी असून अमरावती जिल्ह्यात गाविलगड डोंगरात उगम पावून अकोला, बुलढाणा जिल्ह्यातून वाहत जावून जळगाव जिल्ह्यात तापी व पुणेचा संगम चांगदेव येथे होतो.

नर्मदा नदी(Narmada River) :Rivers in Maharashtra

*नर्मदा ही भारतातील सर्वाधिक लांबीची पश्चिम वाहिनी नदी आहे.

*नर्मदा ही महाराष्ट्र राज्याच्या वायव्य सीमेवरुन धडगाव किंवा अक्राणी (जि. नंदुरबार) तालुक्याच्या उत्तर सीमेवरून वाहते.

*उगमस्थान मध्यप्रदेश राज्यात अमरकंटक येथे होतो.

*प्रवाहाची दिशा पुर्वेकडून पश्चिमेकडे.

*महाराष्ट्रातील लांबी ५४ कि.मी.

 *उपनदी – तवा.

*तवा ही नर्मदेची उपनदी असून तवा नदीवर मध्यप्रदेश राज्यात प्रसिद्ध तवा प्रकल्प आहे.

*नर्मदा नदी  मध्यप्रदेश, महाराष्ट्र व गुजरात राज्यातून वाहते .

 *नर्मदा भारतीय उपखंडातील पाचव्या क्रमांकाची मोठी नदी असून सर्वांत मोठी पश्चिम वाहिनी नदी आहे. 

*उगमापासून ते मुखापर्यंत नर्मदा नदीकाठी अनेक तीर्थक्षेत्रे वसलेली असल्याने नर्मदा प्रदक्षिणेला हिंदू धर्मात महत्त्व प्राप्त झाले आहे. यास नर्मदा परिक्रमा असे म्हणतात.

 *गुजरात राज्यात भडोच शहराजवळ नर्मदा खंबातच्या आखातात (अरबी समुद्रात) विलीन होते.

*महाराष्ट्राच्या वायव्य कोपऱ्यातून नंदुरबार जिल्ह्यातून नर्मदा नदी वाहते.

नर्मदा नदी अतिशय खोल घळईतून वाहते.

*आक्राणी टेकड्यांमुळे तापी नदी व नर्मदा नदी अलग झाल्या आहेत .

 कोकणातील नद्या व त्यांची वैशिष्टये :

*कोकणातील सर्व नद्या  सह्याद्री पर्वतात उगम पावतात.

*कोकणातील सर्व नद्या पश्चिम वाहिनी असून त्या अरबी समुद्रास मिळतात.

*कोकणातील सर्व नद्या कमी लांबीच्या असून त्या अति वेगाने वाहतात.

*उल्हास (१३० कि.मी.) ही कोकणातील सर्वाधिक लांबीची पश्चिम वाहिनी नदी आहे.

*वैतरणा (१२४ कि.मी.) ही कोकणातील दुसऱ्या क्रमांकाची पश्चिम वाहिनी नदी आहे .

२) पूर्व  वाहिनी नद्या : (बंगालच्या उपसागरास मिळणान्या नद्या )

*महाराष्ट्र पठारावरून वाहणान्या नद्या पश्चिमेकडून पूर्वेकडे वाहतात. उदा. गोदावरी, भीमा, कृष्णा, प्रवरा, वर्धा, मांजरा, दारणा, सिंदफणा, वैनगंगा, इंद्रावती इत्यादी.

*महाराष्ट्रातील पूर्व वाहिनी नद्या लांब पल्ल्याच्या असून त्या महाराष्ट्र पठारावर वाहतात.

*गोदावरी (१४५० कि.मी.) ही पठारावरील सर्वाधिक लांबीची नदी असून तीच राज्यातील सर्वात लांब नदी आहे.

*पठारावर वाहणाऱ्या नद्या महाराष्ट्र, कर्नाटक व तेलंगणा राज्यात वाहत जावून बंगालच्या उपसागरास मिळतात.

गोदावरी नदी(Godawri River):

*भारतीय द्विपकल्पातील गोदावरी ही सर्वाधिक लांबीची नदी असून हीच महाराष्ट्रातील सर्वाधिक लांबीची नदी आहे.

*दक्षिण भारतातील गंगा म्हणून गोदावरी नदीला ओळखतात. गंगा नदीच्या खालोखाल गोदावरी नदी पवित्र मानली जाते. गंगा नदीनंतर देशातील दुसरी मोठी नदी गोदावरी आहे आणि महाराष्ट्रातील सर्वात मोठी नदी गोदावरी नदी आहे.

*गोदावरी नदीला ‘दक्षिण गंगा’, ‘संतांची भूमी’, ‘वृद्धगंगा’ (प्राचीन व विस्तृत खोरे) व मराठवाड्याची विकासगंगा’ या नावाने ओळखतात.

*गोदावरी नदी खोऱ्यानी भारताचे १० टक्के क्षेत्र व्यापलेले आहे. तर महाराष्ट्रातील एकूण क्षेत्राच्या सुमारे (४९ टक्के) अर्धे क्षेत्र व्यापले आहे.

*दख्खनच्या पठारावर पश्चिम घाटात उगम पावून पूर्व घाटापर्यंत वाहत जावून गोदावरी नदी बंगालच्या उपसागराला मिळते.

*गोदावरी नदीचा पश्चिमेकडील विस्तार अरुंद तर पूर्वेकडील विस्तार रुंद होत गेला म्हणून गोदावरीचे पात्र एखाद्य नरसाळ्यासारखे दिसते.

*नदीचा उगम सह्यादी पर्वतात नाशिक जिल्हयात त्र्यंबकेश्वर येथील ब्रम्हागिरी येथे होतो.

*गोदावरीचे उगमस्थान अरबी समुद्रापासून पूर्वेकडे ८० कि.मी. अंतरावर आहे .

*नदीची महाराष्ट्रातील लांबी नदीची एकूण लांबी ६६८ कि.मी. आहे .

*नदीचा प्रवास -महाराष्ट्र तेलंगणा, आंध्रप्रदेश

*प्रवाहाची दिशा- पश्चिमेकडून पूर्वेकडे

*नदीच्या उपनद्या – मांजरा, दारणा, मुळा, वर्षा वैणगंगा, पैनगंगा, सिंदफणा, प्रवरा, दबावती, इरई, प्राणहिता,कादवा, दुधना, दक्षिणपूर्णा, कुंडलिका इ . *नदीकाठची शहरे – नाशिक, कोपरगाव, राक्षसभूवन, शहागड, पैठण, गंगाखेड, नांदेड, सिरोंचा इत्यादी.

*गोदावरी नदीचा प्रवास महाराष्ट्र राज्यातील ८ जिल्ह्यांतून होतो. त्यात नाशिक, अहमदनगर, औरंगाबाद, जालना, बीड, परभणी, नांदेड व दक्षिण विदर्भातील गडचिरोली जिल्ह्यातून तेलंगणा राज्यात प्रवेश करते.

*गोदावरी नदीवरील प्रकल्प :

१) गंगापूर धरण -गोदावरी नदीवर नाशिक जिल्ह्यात गंगापूर धरण असून ते देशातील पहिले मातीचे धरण आहे. या धरणाचा वापर नाशिक शहराला पाणीपुरवठ्यासाठी केला जातो.

२) जायकवाडी धरण -औरंगाबाद जिल्ह्यात पैठणजवळ जायकवाडी हे राज्यातील सर्वात मोठा बहुउद्देशीय प्रकल्प आहे. जायकवाडी धरणात साठलेल्या जलाशयाला ‘नाथसागर'(Nathsagar) म्हणतात. नाथसागरातील जलाशयापासून पैठण येथे सूरच्या वृंदावन गार्डनच्या धरतीवर ज्ञानेश्वर उद्यानाची निर्मिती करण्यात आली.

३) विष्णुपुरी धरण -नांदेड जिल्ह्यात विष्णुपुरी धरण आहे. धरणातील जलाशयाला शंकरसागर(Shankarsagar) असे म्हणतात. विष्णुपुरी हा आशिया खंडातील सर्वांत मोठा उपसा सिंचन प्रकल्प आहे. या धरणातील पाणी नांदेड शहराला पिण्यासाठी पुरविले जाते.

४) बाभळी धरण -गोदावरी  नदीवर नांदेड जिल्ह्यात धर्माबाद तालुक्यात आहे. हे धरण महाराष्ट्र व तेलंगणा राज्यात वादग्रस्त आहे.

५) दारणा धरण -गोदावरीच्या दारणा या उपनदीवर नाशिक जिल्ह्यात दारणा धरण आहे.

६) भंडारदरा धरण- अहमदनगर जिल्ह्यात गोदावरीची उपनदी प्रवरा नदीवर भंडारदरा धरण आहे. हे भारतातील सर्वात मोठे दगडी धरण असून यास ‘आर्थर सरोवर'(Orther sarowar) असे म्हणतात.

७) मुळा धरण- अहमदनगर जिल्ह्यात मुळा नदीवर आहे.

८) माजलगाव धरण – बीड जिल्ह्यात सिंदफणा नदीवर माजलगाव धरण आहे सिंदफणेची उपनदी बिंदुसरा नदीवर बीड जिल्ह्यात बिंदुसरा धरण आहे.

*प्राणहिता ही गोदावरीची प्रमुख उपनदी असून गडचिरोली जिल्ह्यात सिरोंचा येथे संगम होतो.

*गोदावरी नदी खोऱ्यात अनेक रांजणखळगे निर्माण झाली आहेत.

गोदावरी नदी आंध्रप्रदेश राज्यात राजमहेंद्री या शहराजवळ बंगालच्या उपसागरात विलीन होते

 भीमा नदी(Bhima River):

*भीमा खोरे राज्यातील दुसऱ्या क्रमांकाचे खोरे आहे.

*नदीचा उगम भीमाशंकर (पुणे जिल्हा) येथे होतो. भीमाशंकर हे महाराष्ट्रातील पाच ज्योर्तिलिंगापैकी एक आहे.

*महाराष्ट्रातील एकूण लांबी ४५१ कि.मी. (नदीची एकूण लांबी ८६१ कि.मी.)

*नदीकाठचे शहर :पंढरपूर

*नदीचा प्रवास- पुणे व सोलापूर या दोन जिल्ह्यातून वाहते.

*प्रवाहाची दिशा- पश्चिमेकडून पूर्वेकडे.

 *नदीचे क्षेत्र-७०६१४ चौ.कि.मी.

 *प्रवास- महाराष्ट्र व कर्नाटक

*उपनद्या – भामा, इंद्रायणी, मुळा, मुठा, निरा, पवना, माण, सीना, वेळ, मीना, घोड, कता, कुकडी, बोर, कागणी इ .

*भीमा नदी ही उत्तरेला बालाघाट व दक्षिणेला शंभू महादेव डोगररांगा दरम्यान वाहते .

*उजनी धरण भीमा नदीवर सोलापूर जिल्ह्यात (माढा तालुका)  आहे . उजनी धरणात साठलेल्या पाण्याला ‘यशवंतसागर'(Yashwant sagar) या नावाने ओळखतात. 

*भीमा नदी पंढरपूर शहराजवळ पाहताना चंद्रकोरेचा  आकार धारण करते,म्हणून भीमा नदीला ‘चंद्रभागा’ या नावाने ओळखतात. भीमा नदीकाठी महाराष्ट्राचे आराध्यदैवत असणारे ‘पंढरपूर’ शहर आहे.

*भीमा नदीखोऱ्यात पुणे, अहमदनगर, सोलापूर, उस्मानाबाद या जिल्ह्यांचा समावेश होतो.

*भीमा ही पुणे व सोलापूर जिल्हयातून कर्नाटक राज्यात प्रवेश केल्यानंतर रायचूर जिल्ह्यात कुरगुडी येथे कृष्णेत विलीन होते.

*भीमा-सीना नदीचा संगम सोलापूर जिल्ह्यात कुंडल येथे होतो..

कर्नाटकातील रायपुर जवळ कुरुगुड्डी येथे कृष्णा व भीमा नदयांचा संगम होतो. कृष्णा नदीची प्रमुख उपनदी म्हणजे भीमा नदी होय.

 कृष्णा नदी(Krushna River):

*कृष्णा खोरे राज्यातील तिसऱ्या  क्रमांकाचे खोरे असून कृष्णा खोऱ्याने महाराष्ट्राचा १७ टक्के भाग व्यापला आहे.

*कृष्णा नदीचा उगम सातारा जिल्ह्यात महाबळेश्वर येथे होतो. महाबळेश्वर येथे याच ठिकाणी कृष्णा, वैण्णा, कोयना,गायत्री, सावित्री या पाच नद्यांचा उगम होतो.

*कृष्णा नदी महाराष्ट्र, आंध्रप्रदेश व कर्नाटक राज्यातून वाहते. कृष्णा नदी मच्छली पट्टणमजवळ बंगालच्या उपसागराला मिळते.

*महाबळेश्वर येथे कृष्णा, कोयना, वेण्णा, सावित्री, गायत्री या नद्यांचाही उगम होतो.

*महाराष्ट्रातील एकूण लांबी २८२ कि.मी. आहे.

*प्रवाहाची दिशा : पश्चिमेकडून पूर्वेकडे वाहते.

*नदीचा प्रवास- सातारा, सांगली, कोल्हापूर जिल्ह्यातून कर्नाटक राज्यात प्रवेश करते.

*नदीच्या उपनद्या कोयना, वारणा, येरळा ,पंचगंगा, दुधगंगा, वेदगंगा, वेण्णा, घटप्रभा इत्यादी.

*नदीकाठची शहरे -वाई, कराड, सांगली, मिरज, औदूंबर, नरसोबाची वाडी इ.

*नदीचा प्रवास- कृष्णा ही महाराष्ट्र, कर्नाटक, तेलंगणा व आंध्रप्रदेश राज्यातून वाहते.

*कृष्णा नदीवर सातारा जिल्ह्यात वाईजवळ प्रसिद्ध धोम प्रकल्प आहे.

*कृष्णा नदी आंध्रप्रदेश राज्यात बंगालच्या उपसागरात विलीन होते.

कोयना नदी(Koyana River):

*कोयना या कृष्णेच्या उपनदीवर सातारा जिल्ह्यात हेळवाक गावाजवळ प्रसिद्ध कोयना धरण आहे.

*कोयना नदी व धरणास ‘महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी’ असे म्हणतात.

*कोयना धरणात साठलेल्या पाण्याला ‘शिवाजी सागर’ असे म्हणतात.

*कृष्णा व कोयनेचा संगम कराड येथे होतो. त्या ठिकाणास प्रितीसंगम असे म्हणतात.

*प्रितीसंगम (कराड) येथे महाराष्ट्र राज्याचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांची समाधी आहे.

*लेक टॅपिन हे सर्वप्रथम कोयना प्रकल्पायर करण्यात आले.

*पंचगंगा नदीला ‘कोल्हापूरची जीवनवाहिनी’ असे म्हणतात.

*पंचगंगा ही कुंभी, कासरी, तुलसी, भोगावती व सरस्वती या पाच नद्यांच्या संगमापासून बनते.

*भोगावती नदीवर कोल्हापूर जिल्हात प्रसिद्ध राधानगरी धरण आहे.

राधानगरी धरणात साठलेल्या पाण्याला ‘लक्ष्मीसागर’ असे म्हणतात:

*वारणा या कृष्णेच्या उपनदीवर सांगली जिल्ह्यात चांदोली धरण आहे.

 *दुधगंगा नदीवर दुधगंगा धरण असून या धरणात साठलेल्या पाण्याला ‘शाहूमहाराज जलाशय’ नावाने ओळखतात.

पैनगंगा नदी ( Painganga River):

*पैनगंगा ही विदर्भातील सर्वाधिक लांबीची नदी असून ती वर्धेची उपनदी आहे.

*उगम -अजिंठा डोंगररांगा (बुलढाणा जिल्हा) येथे होतो.

*दिशा – पश्चिमेकडून – पूर्वेकडे वाहते.

*प्रवास – दक्षिण विदर्भातून बुलढाणा, हिंगोली, वाशिम, नांदेड, यवतमाळ, चंद्रपूर जिल्ह्यात .

*लांबी ४९५ कि.मी. आहे.

*उपनद्या – कयाधू, पूस, अरुणावती, विदर्भा, खुनी, वाघाडी, आडाण इ. नदी काठचे शहरे – मेहेकर, कोपेश्वर

*धरणे- पैनगंगा नदीवर ईसापूर धरण, पूस नदीवर पूस धरण तर वाखाडी नदीवर वाखाडी धरण आहे.

*पैनगंगा नदीवर उमरखेड तालुक्यात(जि. यवतमाळ) मुरली गावाजवळ सहस्त्रकुंड धबधबा असून ते पर्यटनाचे स्थळ आहे.

*पैनगंगा नदी चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्याच्या सीमेवरून वाहते.

३)दक्षिण वाहिनी नद्या

  वैनगंगा नदी (Vainganga River):

*महाराष्ट्रात वैनगंगा हि  दक्षिण वाहिनी नदी असून ती विदर्भाच्या पूर्व भागातून वाहते .

*उगम- मध्यप्रदेश राज्यात शिवणी जिल्ह्यात मैकल टेकड्यात होतो.

*नदीची लांबी २९५ कि.मी. आहे.

*दिशा- उत्तरेकडून दक्षिणेकडे

*नदीकाठची शहरे- भंडारा, काटी, चपराळा.

*उपनद्या- कन्हान, सूर, बादणवडी, मूल, पांगोली, वाघ, चुलबंद, गाढवी, दीना इ.

*वैनगंगा ही गडचिरोली जिल्ह्यात चपराळा येथे वर्धेला मिळते व पुढे वर्धा -वैनगंगा प्रवाह प्राणहिता नावाने ओळखला जातो.

 वर्धा नदी(Vardha River):

*वर्धा  विदर्भातील प्रमुख दक्षिणवाहिनी नदी आहे.

*उगम- सातपुडा पर्वतरांगेत बैतुल जिल्ह्यात मध्यप्रदेश राज्यात होतो.

नदीची लांबी : ४५५ कि.मी….

*दिशा -उत्तरेकडून दक्षिणेकडे

*नदीकाठची शहरे- कोपेश्वर, पुलगाव

*उपनद्या: पैनगंगा, रामगंगा, वेवळा, ईकाई, वेण्णा, वाकली. यशोदा

*वर्धा व वैनगंगा नद्यांचा संगम गडचिरोली जिल्ह्यात चपराळा येथे होतो.

*वर्धा वैनगंगा-पैनगंगा नद्यांच्या प्रवाहापासून प्राणहिता नदीचा प्रवाह सुरु होतो.

 *वर्धा नदीकाठी बल्लारपूर, घुघुत, सास्ती, राजोरा ही शहरे वसली आहेत.

Leave a comment