savinay kayde bhang reasons : सविनय कायदेभंग चळवळीची कारणे

  • सायमन कमिशन सायमन आयोग 1927-savinay kayde bhang reasons

1919 च्या सुधारणा कायद्यात सुधारणा सुचवण्यासाठी ब्रिटिश सरकारने 8 नोव्हेंबर 1927 मध्ये सर जॉन सायमन यांच्या नेतृत्वाखाली सात सदस्य समितीची स्थापना केली. ज्यामध्ये सर्व सदस्य ब्रिटिश होते.

या आयोगामध्ये एकही भारतीय सदस्य नसल्याने भारतातील प्रमुख राजकीय पक्षांनी सायमन आयोगावर बहिष्कार घालण्याचा निर्णय घेतला.

3 फेब्रुवारी 1928 ला सायमन कमिशनचे मुंबईत आगमन झाले. त्यावेळी भारतीय जनतेने निदर्शने करून “सायमन परत जा” असा नारा दिला व काळे झेंडे दाखवले. सायमन कमिशन चा रिपोर्ट 27 मे 1930 ला जाहीर करण्यात आला.

  • नेहरू अहवाल नेहरू रिपोर्ट 1928

भारतात सायमन कमिशनवर बहिष्कार टाकण्यात आला. त्यामुळे भारतमंत्री लॉर्ड बर्कनहेड यांनी भारतातील जनतेला आवाहन केले की, भारतातील राजकीय संघटनांनी एकत्र येऊन भारतीय राज्यघटनेचा आराखडा तयार करून सरकारकडे सादर करावा.

भारताची भावी राज्यघटना कशी असावी यासाठी 19 मे 1928 ला डॉ. अन्सारी यांच्या अध्यक्षतेखाली मुंबई येथे राष्ट्रीय काँग्रेस हिंदू महासभा व मुस्लिम लीग यांची परिषद भरली.

पंडित मोतीलाल नेहरूंच्या अध्यक्षतेखाली एक सात सदस्य समिती गठीत करण्यात आली.

भारतमंत्री लॉर्ड बर्कनहेड यांनी राज्यघटना तयार करण्याचे केलेले आवाहन स्वीकारून सर्व राजकीय पक्षांनी सर्व राजकीय पक्षाच्या समितीने नेहरू अहवालात भारताला वसाहती स्वराज्य देण्यात यावे, धर्मनिरपेक्ष राज्य स्थापन करण्यात यावे, संघटना स्वातंत्र्य व प्रौढ मताधिकार, स्वातंत्र्य मतदार संघ स्थापन करण्यात यावेत अशा सुधारणा सुचवल्या.

28 ऑगस्ट 1928 ला मोतीलाल नेहरू यांनी राज्यघटनेचा आराखडा तयार करून सादर केला. त्याच “नेहरू रिपोर्ट” किंवा “नेहरू अहवाल” असे म्हणतात.

  • लाहोर अधिवेशन

कलकत्ता अधिवेशनात ब्रिटिश सरकारला देण्यात आलेली 31 डिसेंबर 1929 ही मुदत संपताच राष्ट्रीय सभेने लाहोर अधिवेशनात अध्यक्ष पंडित जवाहरलाल नेहरू म्हणून जाहीर करण्याचे व स्वातंत्र्याची शपथ घेण्याचे आवाहन भारतीय जनतेस करण्यात आले.

पूर्ण स्वातंत्र्याच्या प्राप्तीनंतर गांधीजींच्या नेतृत्वाखाली सविनय कायदेभंगाचे आंदोलन सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला.

31 डिसेंबर 1929 मध्ये लाहोर येथे अधिवेशन भरले या अधिवेशनाचे अध्यक्ष पंडित जवाहरलाल नेहरू होते. 31 डिसेंबर 1929 रोजी लाहोर येथे भरलेल्या राष्ट्रीय सभेच्या अधिवेशनात संपूर्ण स्वातंत्र्याचा ठराव पास करण्यात आला.

  • संपूर्ण स्वातंत्र्याची मागणी

वसाहतीचे स्वराज्य आतापर्यंतचे राष्ट्रीय सभेचे उद्दिष्ट आणि तरुण कार्यकर्त्यांना अमान्य होते. पंडित नेहरू व सुभाषचंद्र बोस संपूर्ण स्वराज्याची मागणी करणारे तरुण नेते होते. त्यांच्यामुळे राष्ट्र सभेच्या लाहोर अधिवेशनामध्ये संपूर्ण स्वराज्याचा ठराव पास करण्यात आला व या ठरावा द्वारे वसाहतीचे स्वराज्य या उद्दिष्टांचा त्याग केला. त्यामुळे भारताचे संपूर्ण स्वातंत्र्य हे राष्ट्रीय चळवळीचे ध्येय बनले

26 जानेवारी 1930 हा दिवस स्वतंत्रता दिवस म्हणून साजरा करण्यात आला. ब्रिटिश सत्तेपासून भारताला मुक्त करण्यासाठी स्वातंत्र्याचा लढा अहिंसक मार्गाने चालवण्याची प्रतिज्ञा 26 जानेवारी 1930 रोजी देशभर करण्यात आली.

tags

सविनय कायदेभंग चळवळीची कारणे, संपूर्ण स्वातंत्र्याची मागणी, लाहोर अधिवेशन, नेहरू अहवाल, नेहरू रिपोर्ट 1928, सायमन कमिशन, सायमन आयोग 1927, सविनय कायदेभंग, सविनय कायदेभंग चळवळ,savinay kayadebhang, savinay kayadebhang chalawal,lahor adhiweshan,neharu ahawal,neharu report,sayaman commission,sayaman aayog, ,Civil disobedience movement,civil disobedience movement in Marathi,

Post Comment

You May Have Missed