राजश्री शाहू महाराज Shahu Maharaj हे भारतीय समाज सुधारक व कोल्हापूर संस्थानाचे छत्रपती होते. ब्रिटिश सत्तेच्या काळामध्ये सामान्य जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी व बहुजन समाजाच्या सामाजिक उन्नतीसाठी शाहू महाराजांनी प्रयत्न केले. सामाजिक परिवर्तनाला गती प्राप्त करून दिली.
सनातनी वर्गाच्या विरोधाला न जुमानता त्यांनी अस्पृश्य व मागासवर्गीय समाजाच्या विकासासाठी महत्त्वाची भूमिका बजावली. त्यांनी कोल्हापूर संस्थानात प्राथमिक शिक्षण सक्तीचे व मोफत केले.
शाहू महाराजांना “राजश्री” ही उपाधी कानपूर मधील क्षत्रिय समाजाने दिली. समता, बंधुता, धर्मनिरपेक्षता, सर्वांना विकासाची समान संधी ही तत्वे शाहू महाराजांनी अमलात आणली. म्हणूनच देशभरात त्यांचा महाराजांचे महाराज असा गौरव होतो.
सामाजिक बंधूत्व,समता, शिक्षण, शेती, उद्योगधंदे, कला, क्रीडा व आरोग्य इत्यादी महत्त्वपूर्ण क्षेत्रात त्यांनी कार्य केले.
पुढे हे हि वाचा MPSC Pre exam 2024 : महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा-२०२४
छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा व कार्याचा वारसा समर्थपणे चालवणारा राजा म्हणून आपली ओळख निर्माण केली महाराजांनी सुमारे २८ वर्ष राज्यकारभार चालवला व महान कार्य केले.
जीवन:
राजश्री शाहू महाराजांचा जन्म २६ जून १८७४ रोजी कोल्हापूर जिल्ह्यातील कागल या गावी घाटगे घराण्यात झाला. त्यांचे वडील जयसिंगराव घाटगे उर्फ आप्पासाहेब हे कागल गावचे प्रमुख होते. तर आई राधाबाई या मुधोळीच्या राजघराण्यातील होत्या.
शाहू महाराजांचे मूळ नाव यशवंत जयसिंगराव घाटगे असे होते. यशवंत लहान असताना त्यांच्या आई राधाबाई यांचा मृत्यू झाला.नंतर त्यांचा सांभाळ वडिलांनी केला. त्यावेळी कोल्हापूर संस्थानाचा कारभार राजे “चौथे शिवाजी” पाहत होते. परंतु, त्यांच्या अकस्मात निधनामुळे त्यांच्या धर्मपत्नी आनंदीबाई यांनी १७ मार्च १८८४ साली यशवंतराव घाटगे यांना दत्तक घेतले व त्यांचे नामकरण “शाहू” असे केले.
राजश्री शाहू महाराजांचे शिक्षण राजकोट आणि धारवड येथे पार पडले. उच्च शिक्षणासाठी राजवाड्यात व्यवस्था करण्यात आली. त्यांची जबाबदारी एका ब्रिटिश अधिकाऱ्यांकडे देण्यात आली.
शाहू महाराजांनी क्रीडा क्षेत्रात देखील आपले वर्चस्व निर्माण केले. शिक्षणासोबतच आपला शारीरिक विकास त्यांनी करून घेतला. त्यांना कुस्तीची आवड असल्याने त्यांनी शैक्षणिक कालखंडात मल्ल विद्येचे शिक्षण घेतले. इंग्लिश शिक्षणाचा शाहू महाराजांच्या जीवनावर कायम प्रभाव होता त्यामुळे त्यांच्या कार्यात अजून एकतेचा आणि दूरदृष्टीचा प्रभाव आढळतो.
Sankhya Aani Sankhyanche Prakar : संख्या व संख्यांचे प्रकार MPSC तयारी साठी लागणारा topic अवश्य वाचा
शिक्षण चालू असतानाच १ एप्रिल १८९१ रोजी बडोद्याच्या गुणाजीराव खानविलकर यांच्या लक्ष्मीबाई या मुलीशी शाहू महाराजांचा विवाह झाला. यावेळी त्यांचे वय १७ वर्षे होते आणि लक्ष्मीबाईंचे वय १२ वर्षाहून कमी होते २ एप्रिल १८९४ मध्ये राजश्री शाहू महाराज कोल्हापूरच्या गादीवर बसले. राज्याभिषेक झाल्यानंतर इ. स. १९२२ पर्यंत म्हणजेच २८ वर्षे ते कोल्हापूर संस्थानाचे राजे होते.
शाहू महाराजांनी २८ वर्षाच्या काळामध्ये अनेक सामाजिक कार्य केले. त्यांच्या कार्याने राजेश्री शाहू महाराजांना लोकांमध्ये लोकप्रिय बनवले. शाहू महाराजांनी उच्च जातीच्या व कमी जातीच्या लोकांमध्ये कधीच भेदभाव केला नाही. त्यामुळे राजश्री शाहू महाराजांनी जातीवाद आणि अस्पृश्यता संपवण्यासाठी अनेक नियम बनवले.
सामाजिक कार्यात त्यांनी अनेक धाडसी निर्णय घेतले आणि ते अमलात देखील आणले. छत्रपती शाहू महाराजांनी सर्व बहुजन समाजातील मुला-मुलींच्या शिक्षणाची मोफत व्यवस्था केली. त्यांच्यासाठी प्राथमिक शाळा, हायस्कूल, कॉलेज, वस्तीग्रह यांची मोठ्या प्रमाणात निर्मिती केली. मुलांना शाळेत न पाठवणाऱ्या पालकांना त्याकाळी शाहू महाराजांनी एक रुपया दंड लावला होता.
शाहू महाराजांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या शिक्षणासाठी तसेच मूकनायक व्रतपत्रासाठी सहकार्य केले होते. बाबासाहेब आंबेडकरांना माणगावच्या परिषदेमध्ये “अखिल भारताचे पुढारी” म्हणून घोषित केले व या पुढील काळामध्ये बाबासाहेबांनी दलित उपेक्षित समाजाचे नेतृत्व करावे असेही महाराजांनी आवाहन केले.
जातीभेद दूर करण्यासाठी त्यांनी आपल्या राज्यात आंतरजातीय विवाहाला मान्यता देणारा कायदा केला इसवी सन १९१७ साली त्यांनी पुनर्विवाहाचा कायदा करून, विधवा विवाहाला कायदेशीर मान्यता मिळवून दिली.
अस्पृश्यता नष्ट करण्यासाठी सवर्ण व अस्पृश्यांच्या वेगळ्या शाळा भरवण्याची पद्धत १९१९ मध्ये बंद केली. शाळा, दवाखाने, पाणवटे, सार्वजनिक विहिरी, सार्वजनिक इमारती या ठिकाणी अस्पृश्यांना समानतेने वागावे असे आदेश त्यांनी कोल्हापूर संस्थानात काढले.
जातीभेद नष्ट व्हावे म्हणून आपल्या संस्थानात आंतरजातीय व आंतरधर्मीय विवाहस कायदेशीर मान्यता दिली. आशा अनेक कार्याच्या माध्यमातून त्यांनी स्त्रियांना सन्मानाची वागणूक व दर्जा मिळवून दिला.
त्याकाळी धर्माच्या नावाखाली देवांना मुले-मुली वाहण्याची विचित्र प्रथा भारतात चालू होती परंतु, राजांनी आपल्या संस्थानात जोगत्या, मुरळी प्रतिबंधक कायदा करून ही पद्धत बंद पाडली.
बहुजन समाजाला राजकीय निर्णय प्रक्रियेत सामावून घेण्यासाठी त्यांनी इसवी सन १९१६साली निपाणी येथे “डेक्कन रयत असोसिएशन” ही संस्था स्थापन केली.
अस्पृश्यांना स्वतंत्र व्यवसाय करण्यास प्रोत्साहन दिले. दुकान, हॉटेल काढण्यास प्रोत्साहन दिले. तसेच आर्थिक मदत देखील केली. अस्पृश्यना शिवायंत्र देऊन स्वतंत्र व्यवसाय करण्यास प्रोत्साहन दिले. राजवाड्यातील कपडे त्यांच्याकडून शिऊन घेण्यास सुरवात केली.
स्वतः उत्तम कुस्तीपटू असल्यामुळे कुस्ती या खेळाला शाहू महाराजांनी राजश्री मिळवून दिला त्यासाठी १८९५ साली मोतीबाग तालमीची स्थापना केली. एवढेच नाही तर खासबाग सारख्या भव्य कुस्ती मैदानाची 1912 साली निर्मिती केली.
शेतकऱ्यांचे प्रश्न, शेतीचे सिंचन, पिण्यासाठी पाण्याची व्यवस्था, वीज निर्मिती यासाठी राधानगरी धरण बांधण्याचा संकल्प केला. १९०९साली या धरणाच्या कामास सुरुवात केली.१९१८ पर्यंत धरणाचे काम पूर्ण झाले.
कोल्हापुरात रेल्वे आणण्यास शाहू महाराजांचा अतिशय महत्त्वाचा वाटा होता. कोल्हापूर शहराचा विकास करताना कोल्हापूरमध्ये अनेक बाजारपेठा निर्माण केल्या.
१९१६ मध्ये राजश्री शाहू महाराजांनी राजकीय निर्णय घेण्याची प्रक्रिया निपाणी मध्ये “डेक्कन रयत संस्था” स्थापन करून केली.
१९१९ मध्ये आंतरजातीय विवाह कायद्यास मंजुरी दिली.
१९१३ मध्ये शाहू महाराजांच्या आदेशानुसार खेड्यांमध्ये चावडी, धर्मशाळा, मंदिरे होती या इमारतीमधील शाळा सुरू झाल्या.
१९२० मध्ये त्यांनी घटस्फोटाचा कायदा केला.
महारोगांसाठी “विक्टोरिया लेप्रसी” या हॉस्पिटलची स्थापना शाहू महाराजांनी केली.
२६ जुलै १९०२ रोजी शाहू महाराजांनी कोल्हापूर संस्थानातील मागासवर्गीय लोकांसाठी ५०% जागा राखीव ठेवल्या.
१९०६ मध्ये शाहू महाराजांनी “छत्रपती शाहू स्पिनिंग व जिनिंग मिल” स्थापन केली.
१९०६ मध्ये शाहू शाळा महाराजांनी कोल्हापूर संस्थानात रात्र शाळा सुरू केल्या.
१९०७ साली दाजीपूर जवळ भोगावती नदीवर धरण बांधून त्याच्या जलाशयास महाराणी लक्ष्मीबाई हे नाव देण्यात आले. या धरणाच्या शेजारी शाहू महाराजांच्या मुलीच्या नावावर राधानगरी हे गाव बसवण्यात आले.
१९११साली शाहू महाराजांनी शिंपी समाजाच्या मुलांसाठी नामदेव वस्तीग्रह सुरू केले.
शाहू महाराजांनी औद्योगिक विकासासाठी मोठ्या बाजारपेठा निर्माण केल्या. त्यांनी भारतामधील प्रसिद्ध गुळ बाजारपेठ स्थापन केली.
शाहू महाराजांनी केलेल्या असंख्य प्रयत्नांमुळे शाहू महाराजांना केंब्रिज विद्यापीठातून “एल.एल.बी.” ही पदवी प्राप्त झाली. त्यांनी क्वीन विक्टोरियाकडून “ग्रँड कमांडर ऑफ द ऑर्डर” “ग्रँड क्रॉस ऑफ द रॉयल व्हिक्टोरिया ऑर्डर” व “ग्रँड कमांडर ऑफ द ऑर्डर ऑफ द इंडियन एम्पायर” या पदव्या सुद्धा त्यांना प्राप्त झाल्या.
१९०२ मध्ये शाहू महाराजांना “किंग एडवर्ड कोरेनेशन मेडल” मिळाले.
कोल्हापूरच्या शाहू महाराजांना “राजर्षी शाहू महाराज” व “शाहूजी महाराज” या नावाने संबोधले जाते. राजश्री शाहू महाराज मराठा प्रांताचे राजा होते. म्हणून त्यांना “छत्रपती शाहू महाराज” असे सुद्धा संबोधले जाते.
राजश्री शाहू महाराजांना मधुमेह होता. त्यात त्यांची प्रकृती बिघडली व ६ मे १९२२ रोजी वयाच्या अवघ्या 48 वर्षांमध्ये मुंबईमध्ये रुदयविकाराने राजश्री शाहू महाराज यांनी जगाचा निरोप घेतला.
त्यांच्या निधनाची बातमी वृत्तपत्रातून सर्वत्र पसरली. शाहू महाराजांचा अंत्यविधी कोल्हापुरात करण्यात आला. त्यावेळी अत्यंत गर्दी जमली होती. आपल्या राजाचं कायमचं असं अचानक सोडून जाणं तिथल्याच ते जनतेला अत्यंत दुःख देणार होतं. समस्त कोल्हापूर संस्थान या दु:खात सहभागी झाले.
कायम जनतेच्या मनावर अधिराज्य गाजवणारा हा आगळावेगळा राजा खरंच महान होता. शाहू महाराज हे सर्व सामान्य जनतेचे राजे होते. त्यांनी आपल्या उभ्या आयुष्यात कधीच कुणावर अन्याय केला नाही.
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्यांच्या स्मरणार्थ लिहितात की “शाहू महाराज हे सामाजिक लोकशाहीचे आधारस्तंभ होते, त्यांनी कायम जनतेच्या हिताचे कार्य केले”.
शाहू महाराजांच्या नावाने आजही अनेक पुरस्कार व सन्मान दिले जातात. त्यांच्या जीवन चरित्रावर अनेकअनेक साहित्यिकांनी पुस्तक लीहले आहेत. तर आनेक कलाकारांनी चित्रपट व मालिका देखील प्रसारित केल्या आहेत.
शाहू महाराजांचा जन्मदिवस हा “सामाजिक न्याय दिवस” म्हणून साजरा केला जातो.
