भारतीय घटनाकारांनी जगातील सुमारे 60 देशांच्या संविधानाचा अभ्यास करून त्यातल्या चांगल्या बाबींचा समावेश भारतीय संविधानात Sources of the Indian Constitution केला आहे. भारतीय राज्यघटनेचे (Indian Constitution) स्रोत विविध देशांच्या राज्यघटनांमधून घेतले गेले आहेत. संविधान समितीने भारताच्या गरजेनुसार विविध देशांच्या सर्वोत्तम घटनात्मक वैशिष्ट्यांचा अभ्यास करून त्यांचा समावेश भारतीय राज्यघटनेत केला.
त्यातील काही बाबी खालील प्रमाणे-
संविधान | भारतीय संविधानात स्वीकारण्यात आलेले तत्व |
भारत सरकार कायदा 1935 | संघराज्य योजना, न्यायव्यवस्था, लोकसेवा आयोग, आणीबाणीच्या तरतुदी, राज्यपालाचे पद, प्रशासकीय तपशील. |
ब्रिटिश(इंग्लंड) राज्यघटना | संसदीय शासन व्यवस्था, कॅबिनेट व्यवस्था,द्विग्रही संसद(लोकसभा, राज्यसभा), फर्स्ट-पास्ट-पोस्ट-सिस्टम, कायद्याचे राज्य, एकेरी नागरिकत्व, संसदीय विशेष अधिकार |
अमेरिकेची(USA) राज्यघटना | मूलभूत हक्क, उपराष्ट्रपती हे पद, न्यायव्यवस्थेचे स्वातंत्र्य,न्यायालयीन पुनर्विलोकन, राष्ट्रपतींवरील महाभियोग पद्धत, सर्वोच्च न्यायालय व उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशास पदावरून दूर करण्याची पद्धत, प्रस्तावनेची भाषा(सरनामा) |
कॅनडाची घटना | प्रभावी केंद्रसत्ता असलेले संघराज्य,शेषाधिकार संसदेकडे(केंद्राकडे) , राज्यपालांची नेमणूक राष्ट्रपती करतात, सर्वोच्च न्यायालयाचे सल्लागार अधिकार क्षेत्र |
आयर्लंडची राज्यघटना | राज्य धोरणाची मार्गदर्शक तत्वे, राष्ट्रपतींच्या निवडणुक पद्धत, राज्यसभेवर काही सदस्यांचे नामनिर्देशन |
ऑस्ट्रेलियाची राज्यघटना | समवर्ती सूची, व्यापार-वाणिज्य व्यवहारांचे स्वातंत्र्य, संसदेच्या दोन्ही ग्रहांचे संयुक्त अधिवेशन, संसदीय सदस्यांचे विशेष अधिकार |
जर्मनीची राज्यघटना | आणीबाणी या दरम्यान मूलभूत हक्क स्थगित होणे. |
जपानची राज्यघटना | कायद्याने प्रस्तावित कार्यपद्धत |
सोव्हियत रशियाची राज्यघटना | मूलभूत कर्तव्य आणि सरनाम्यातील सामाजिक, आर्थिक व राजकीय न्यायाचे आदर्श |
दक्षिण आफ्रिकेची राज्यघटना | घटनादुरुस्ती पद्धत, राज्यसभेच्या सदस्यांची निवडणूक |
फ्रान्सची राज्यघटना | सरनाम्यातील गणराज्य पद्धती आणि प्रस्ताविकेतील स्वातंत्र्य, समता व बंधुता हे शब्द |